एकादशीचा उपवास अनेकजण करतात. त्यातही महिलावर्गाचे प्रमाण जास्त आहे. आता उपवास म्हटलं की आपल्याकडे भगर, साबुदाणा खिचडी, भाजणीचे थालिपीठ, बटाट्याचा किस असे तेच ते पदार्थ केले जातात. जे कधीतरीच उपवास करतात, त्यांना हे पदार्थ खायला आवडतात. पण ज्यांना नेहमीच उपवास असतात, त्यांना तेच ते उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. म्हणूनच आता चवीमध्ये थोडा बदल म्हणून मखाना भेळ करून पाहा (Ekadashi Fast Special Makhana Bhel). ज्या महिलांचा उपवास करण्यामागे वजन कमी करणे हा एक उद्देशही असतो (how to make makhana bhel?), त्या महिलांसाठीही मखाना भेळ हा पदार्थ खूपच उपयुक्त ठरू शकतो.(easy and simple recipe of makhana bhel)
मखाना भेळ करण्याची रेसिपी
साहित्य
२ ते ३ कप मखाना
१ मध्यम आकाराची काकडी
अर्ध्या लिंबाचा रस
चष्मा-गॉगलच्या काचांना लगेच स्क्रॅचेच पडतात? २ टिप्स, चष्मा जुना झाला तरी काचा राहतील नव्यासारख्या
२ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
१ टीस्पून जिरेपूड
१ टीस्पून साखर
चवीनुसार मीठ आणि लाल तिखट
१ टेबलस्पून भिजवलेले शेंगदाणे
कृती
सगळ्यात आधी एका वाटीमध्ये थोडं गरम पाणी करा आणि त्यात शेंगदाणे भिजायला टाकून द्या. साधारण अर्धा ते एक तास तरी शेंगदाणे भिजायला हवे.
त्यानंतर कढई गॅसवर गरम करायला ठेवा आणि तिच्यामध्ये तूप टाकून मखाना परतून घ्या. मखान्याचा रंग थोडा सोनेरी झाला आणि ते कुरकुरीत झाले की गॅस बंद करा.
हिवाळ्यात दही खाल्ल्यावर सर्दी होईल असं वाटतं? वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला- दही खायचं तर...
भाजून थंड झालेले मखाना एका भांड्यात घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेला उकडलेला बटाटा, जिरेपूड, मीठ, तिखट, साखर, शेंगदाणे असं सगळं घाला. सगळ्यात शेवटी लिंबू पिळा आणि सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घ्या. चटपटीत, कुरकुरीत मखाना भेळ झाली तयार.
प्रियांका चोप्रासारखी चमकदार त्वचा पाहिजे? तिचा सगळ्यात आवडीचा स्वस्तात मस्त बॉडी स्क्रब वापरा
ज्यांच्याकडे उपवासाला चिंच चालते ते लिंबाच्या रसाऐवजी चिंचगुळाचा कोळ टाकू शकतात. तसेच लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्टही वापरू शकता. ही कुरकुरीत भेळ फक्त उपवासाच्या दिवशीच नाही तर एरवीही नाश्त्यासाठी उत्तम आहे.