Join us  

सुरणाचे वडे कधी खाल्ले आहेत? हिवाळ्यात खायलाच हवे असे पौष्टिक वडे, रेसिपी अगदी सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2024 12:24 PM

Elephant Foot Yam Vada, Check out breakfast Unique Recipe : ना डाळी भिजवण्याची झंझट, ना वाटणघाटण कुरकुरीत वड्यांची मस्त रेसिपी

नवीन वर्ष (New Year 2024) नवे संकल्प सर्वत्र नवीन वर्षाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. वैश्विक महारामारी कोरोनानंतर अनेक जण सतर्क झालेत. प्रत्येक जण आपल्या फिटनेसची काळजी घेत आहे. योग्य आहार आणि स्वतःसाठी वेळ काढत व्यायाम देखील करत आहे. बरेच जण नवीन वर्षाची वाट पाहतात. जेणेकरून नवीन वर्ष सुरु झाल्यानंतर व्यायाम करण्यास सुरुवात करतील. फिट राहण्यासाठी व्यायामासह आहाराकडे लक्ष द्यायला हवे. नाश्ता, लंच आणि डिनर हे योग्य वेळेत व्हायला हवे. नाश्त्यामध्ये आपण पोहे, उपमा, चपाती-भाजीसह दाक्षिणात्य पदार्थ आवडीने खातो.

डाळींचा वापर करून आपण मेदू वडा (Medu Vada) तयार करतो. पण आपण कधी सुरणाचे मेदू वडे खाऊन पाहिलं आहे का? सुरण खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याची भाजी आपण खाल्लीच असेल. पण जे सुरण (Elephant Foot Yam) खाताना नाक मुरडत असतील, तर त्यांना सुरणाचे मेदू वडे तयार करून द्या (Cooking Tips). चविष्ट क्रिस्पी रेसिपी काही मिनिटात तयार होते(Elephant Foot Yam Vada, Check out breakfast Unique Recipe).

सुराणाचे मेदू वडे करण्यासाठी लागणारं साहित्य

सुरण

चणा डाळ

लिंबाचा रस

मीठ

दही

वाटीभर उडीद - मूग डाळीची करा पौष्टीक-लुसलुशीत इडली, प्रोटीनयुक्त डाळींचा बेस्ट नाश्ता

रवा

आलं

कोथिंबीर

कढीपत्ता

हिरवी मिरची

जिरं

पिठी साखर

हिंग

बेकिंग सोडा

तेल

कृती

सर्वप्रथम, एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात सुरणाचे काप, एक वाटी चणा डाळ, एक चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यावर १० ते १५ मिनिटांसाठी झाकण ठेवा, जेणेकरून सुरण व्यवस्थित शिजेल.

हिवाळ्यात खायलाच हवी गावरान कारळ्याची खमंग पौष्टीक चटणी, आरोग्यासाठी उत्तम-करायलाही सोपी

१५ मिनिटानंतर सुरण शिजलं आहे की नाही, हे झाकण उघडून बघा. शिजलेले सुरण आणि डाळ एका बाऊलमध्ये काढून घ्या. थंड झाल्यानंतर पाव भाजी मॅशरने सुरण आणि चणा डाळ मॅश करून घ्या. नंतर त्यात एक वाटी दह्यात भिजवलेला रवा. बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं, कढीपत्ता, हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा पिठी साखर, चिमुटभर हिंग, अर्धा चमचा बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून चमच्याने मिक्स करा.

दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. नंतर हाताला थोडे तेल लावून मिश्रणाला मेदू वड्याचा आकार द्या. गरम तेलात मेदू वडा सोडून दोन्ही बाजूने तळून घ्या. तयार सुरणाचे मेदू एका प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे सुरणाचे कुरकुरीत मेदू वडे खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स