Lokmat Sakhi >Food > लवकर थकून जाता? एनर्जीच उरत नाही? फक्त १ 'एनर्जी बॉल' खा- दिवसभर फ्रेश रहाल, बघा रेसिपी

लवकर थकून जाता? एनर्जीच उरत नाही? फक्त १ 'एनर्जी बॉल' खा- दिवसभर फ्रेश रहाल, बघा रेसिपी

Food And Recipe: लवकर थकून जात असाल, कोणत्याही कामात उत्साह वाटत नसेल तर हा एनर्जी बॉल खाऊन बघाच... असं सांगत आहेत सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा (Pooja Makhija).

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2023 09:07 AM2023-08-19T09:07:17+5:302023-08-19T09:10:02+5:30

Food And Recipe: लवकर थकून जात असाल, कोणत्याही कामात उत्साह वाटत नसेल तर हा एनर्जी बॉल खाऊन बघाच... असं सांगत आहेत सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा (Pooja Makhija).

Energy balls recipe by Pooja Makhija, Best food for boosting your energy level, super healthy laddoo recipe | लवकर थकून जाता? एनर्जीच उरत नाही? फक्त १ 'एनर्जी बॉल' खा- दिवसभर फ्रेश रहाल, बघा रेसिपी

लवकर थकून जाता? एनर्जीच उरत नाही? फक्त १ 'एनर्जी बॉल' खा- दिवसभर फ्रेश रहाल, बघा रेसिपी

Highlightsहा एनर्जी बॉल लहान मुलांसाठीही अतिशय पौष्टिक आहे.यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स भरपूर प्रमाणात आहे.

दिवसभर आपली खूप धावपळ सुरू असते. त्यामुळे मग जसाजसा दिवस पुढे सरकत जातो, तशीतशी आपली एनर्जी लेव्हल कमी कमी होत जातो. बऱ्याचदा तर दुपारचं जेवण झालं की खूप सुस्ती येते. अंगातली ताकद निघून गेल्यासारखी वाटते. मग त्यानंतर काहीच काम करावसं वाटत नाही. सकाळचा उत्साह दुपारपर्यंतही टिकत नाही. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर तुम्हाला खरोखरच या एनर्जी बॉल्सची गरज आहे. हा एनर्जी बॉल म्हणजे काय आणि तो कसा तयार करायचा, याविषयीचा एक व्हिडिओ सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा यांनी शेअर केला आहे. हा एनर्जी बॉल (Energy balls or healthy laddoo) लहान मुलांसाठीही अतिशय पौष्टिक आहे. शिवाय चटकन तोंडात टाकायलाही अगदी सोपा. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स भरपूर प्रमाणात आहे. (Best food for boosting your energy level)

 

एनर्जी बॉल किंवा पौष्टिक लाडू तयार करण्याची रेसिपी
साहित्य

१ कप भोपळ्याच्या बिया

१ कप सुर्यफुलाच्या बिया

रोज फक्त १० मिनिटं करा २ व्यायाम, पोटावरची चरबी झरझर होईल कमी- मिळेल फिटनेससह उत्तम फिगर

प्रत्येकी १- १ कप काळे आणि पांढरे तीळ

१० ते १२ खजुराच्या बिया

पी नट बटर

 

रेसिपी
१. सगळ्यात आधी एकेक करून भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया, काळे तीळ आणि पांढरे तीळ भाजून घ्या.

२. त्यानंतर खजुराच्या बिया काढून ते मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट करून घ्या.

३. आता भाजून घेतलेल्या बिया थंड झाल्या की मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्या. 

बाळंतपणानंतर PCOD चा त्रास खरंच कमी होतो का? काय नेमकं खरं? वाचा तज्ज्ञ काय सांगतात 

४. नंतर बियांची पावडर, पी नट बटर आणि खजूराची पेस्ट एका भांड्यात एकत्र करा, हाताने कालवून ते मिश्रण एकजीव करा आणि पेढ्याच्या आकाराचे त्याचे लहान लहान लाडू करा.

५. नंतर हे लाडू काळ्या आणि पांढऱ्या तिळामध्ये घोळून घ्या. पौष्टिक लाडू झाले तयार..

 

 

Web Title: Energy balls recipe by Pooja Makhija, Best food for boosting your energy level, super healthy laddoo recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.