दिवसभर आपली खूप धावपळ सुरू असते. त्यामुळे मग जसाजसा दिवस पुढे सरकत जातो, तशीतशी आपली एनर्जी लेव्हल कमी कमी होत जातो. बऱ्याचदा तर दुपारचं जेवण झालं की खूप सुस्ती येते. अंगातली ताकद निघून गेल्यासारखी वाटते. मग त्यानंतर काहीच काम करावसं वाटत नाही. सकाळचा उत्साह दुपारपर्यंतही टिकत नाही. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर तुम्हाला खरोखरच या एनर्जी बॉल्सची गरज आहे. हा एनर्जी बॉल म्हणजे काय आणि तो कसा तयार करायचा, याविषयीचा एक व्हिडिओ सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा यांनी शेअर केला आहे. हा एनर्जी बॉल (Energy balls or healthy laddoo) लहान मुलांसाठीही अतिशय पौष्टिक आहे. शिवाय चटकन तोंडात टाकायलाही अगदी सोपा. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स भरपूर प्रमाणात आहे. (Best food for boosting your energy level)
एनर्जी बॉल किंवा पौष्टिक लाडू तयार करण्याची रेसिपीसाहित्य१ कप भोपळ्याच्या बिया
१ कप सुर्यफुलाच्या बिया
रोज फक्त १० मिनिटं करा २ व्यायाम, पोटावरची चरबी झरझर होईल कमी- मिळेल फिटनेससह उत्तम फिगर
प्रत्येकी १- १ कप काळे आणि पांढरे तीळ
१० ते १२ खजुराच्या बिया
पी नट बटर
रेसिपी१. सगळ्यात आधी एकेक करून भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया, काळे तीळ आणि पांढरे तीळ भाजून घ्या.
२. त्यानंतर खजुराच्या बिया काढून ते मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट करून घ्या.
३. आता भाजून घेतलेल्या बिया थंड झाल्या की मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्या.
बाळंतपणानंतर PCOD चा त्रास खरंच कमी होतो का? काय नेमकं खरं? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
४. नंतर बियांची पावडर, पी नट बटर आणि खजूराची पेस्ट एका भांड्यात एकत्र करा, हाताने कालवून ते मिश्रण एकजीव करा आणि पेढ्याच्या आकाराचे त्याचे लहान लहान लाडू करा.
५. नंतर हे लाडू काळ्या आणि पांढऱ्या तिळामध्ये घोळून घ्या. पौष्टिक लाडू झाले तयार..