डिंकाचे लाडू, सुकामेव्याचे लाडू, मेथ्याचे लाडू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक लाडूंची हिवाळ्यात चांगलीच रेलचेल असते. त्यात आता अनेक जणी अंजीर लाडू, खजूर लाडू, मखाना लाडू असे वेगवेगळे लाडूही करून बघत आहेत. आपण जी रेसिपी बघणार आहोत, ती देखील अशीच पारंपरिक लाडू रेसिपीला (immunity booster ladoo for winter) थोडासा ट्विस्ट देऊन केलेली आहे. हा लाडू तयार करण्यासाठी पौष्टिक सुकामेवा वापरण्यात आल्यामुळे हिवाळ्यासाठी ते खरोखरच एनर्जी आणि इम्युनिटी (healthy ladoo recipe for winter) बुस्टर ठरतील. शिवाय चवदार असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने खातील.
हिवाळ्यासाठी एनर्जी बुस्टर लाडू
ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या winningedge22 या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
साहित्य
५० ग्रॅम मखाने
२ टेबलस्पून बदाम
२ टेबलस्पून शेंगदाणे
सतत स्क्रिन पाहून डोळ्यांवर ताण येतो, ड्रायनेस जाणवतो? १ सोपा उपाय, डोळ्यांना चटकन मिळेल आराम
२ टेबलस्पून तीळ
२ टेबलस्पून काजू
२ टेबलस्पून अक्रोड
२ टेबलस्पून सुर्यफुलाच्या बिया
अर्धा कप खोबरं
२ अंजीर बारीक चिरलेले
पाव टीस्पून वेलची पूड
अर्धा कप गूळ
पाव कप पाणी
कसे करायचे लाडू?
१. लाडू करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि सगळ्यात आधी मंद आचेवर मखाने भाजून घ्या.
२. त्यानंतर एकेक करून शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड, तीळ, सुर्यफुलाच्या बिया हे सगळेच साहित्य मंद आचेवर भाजून घ्या.
पांढरे केस ‘डाय’ करायची भीती वाटते? मग हा नॅचरल डाय एकदा वापरून बघा.. सोपा घरगुती उपाय
३. हे सगळे साहित्य थंड झाले की मग ते मिक्सरमधून बारीक करून घ्या. खूप जास्त पावडर करू नका.
४. त्यानंतर कढईमध्ये गूळ आणि पाणी टाकून गुळाचा पाक करून घ्या.
५. आता भाजलेल्या सुकामेव्याची पावडर एका भांड्यात काढून घ्या. त्यात अंजीर, वेलची पावडर आणि गुळाचा पाक घाला. सगळे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या. आणि तुम्हाला आवडेल त्या आकाराचे लाडू वळा.
६. मिश्रण जर कोरडं वाटलं आणि लाडू नीट वळता येत नसतील, तर त्यात गरजेनुसार तूप गरम करून घालू शकता.