Join us  

सतत थकवा येतो, एनर्जी पुरतच नाही? रोज सकाळी प्या हे १ एनर्जी ड्रिंक, दिवसभर वाटेल फ्रेश, थकवा गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2023 9:13 AM

Dry Fruit Banana Smoothie Recipe: सतत थकवा येत असेल तर रोज सकाळी हे एनर्जी ड्रिंक प्या.... दिवसभर ताकद टिकून राहील.

ठळक मुद्देहे एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर दुसरा काही नाश्ता नाही केला तरी चालेल.

काही जणींना सतत खूप थकवा आलेला असतो. रोजच्या कामाव्यतिरिक्त इतर कामं करणं तर सोडाच, पण रोजच्याच कामाने त्या खूप गळून जातात. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आहारातून पुरेसं पोषण न मिळणं. शरीराला योग्य पोषण मिळालं नाही, तर एनर्जी पुरत नाही आणि खूप थकवा येतो. म्हणूनच हा थकवा घालविण्यासाठी हे एक एनर्जी ड्रिंक (Energy drink recipe) रोज सकाळी आठवणीने प्या. हे एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर दुसरा काही नाश्ता नाही केला तरी चालेल. एनर्जी ड्रिंक म्हणजे भरपूर सुकामेवा, दूध आणि केळी घालून केलेलं एक पौष्टिक पेय आहे. किंवा याला तुम्ही ड्रायफ्रुट- बनाना स्मुदीही म्हणू शकता. ते कसं करायचं ते आता पाहूया (How to make dry fruit banana smoothie)...

 

एनर्जी ड्रिंक किंवा ड्रायफ्रुट स्मूदी करण्याची रेसिपी

ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या mykitchennndiary या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

१ कप दूध

२ ते ३ खजूर

दिवाळीत १ ग्रॅम सोन्याची ठुशी- मोहनमाळ अशा पारंपरिक दागिन्यांची खरेदी करायची? बघा हे सुंदर पर्याय...

३ ते ४ बदाम

३ ते ४ काजू

५ ते ६ पिस्ता

२ ते ३ अक्रोड

१ केळी

 

कृती

१. सगळ्यात आधी दूध गरम करा आणि गरम दुधात वरील सगळा सुकामेवा साधारण एक तासासाठी भिजत घाला. 

२. आता सुकामेवा चांगला भिजला की तो मिक्सरमध्ये टाका. त्यात एका केळाचे तुकडे आणि दूध टाका.

तब्बल दिड लाखांचा चमचमता अनारकली ड्रेस! बघा परिणिती चोप्राच्या पहिल्या करवा चौथचा थाट

३. सगळं मिश्रण मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून बारीक करा. त्यात हवं तर थोडं दूध किंवा पाणी टाका.

४. भरपूर पौष्टिक अशी ड्रायफ्रुट- बनाना स्मुदी झाली तयार. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती