Join us  

कमळ काकडी चिप्स खाल्लेत कधी? मलायका अरोराला आवडणाऱ्या ‘नादरू चिप्स’ची खास पारंपरिक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 5:51 PM

‘मी काय खात आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता का’असा प्रश्न मलायकाने तिच्या चाहत्यांना विचारला आहे.

ठळक मुद्देचहासोबत किंवा एरवीही वेफर्ससारखे खायला हे वेफर्स अतिशय छान लागतात.  वजन कमी करण्यासाठी, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे मूळ खाण्याचा फायदा होतो. पचनक्रिया सुधारण्यासाठी, ताणतणाव कमी करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो

अभिनेत्री फिट अँड फाईन असतात म्हणजे त्या फिटनेस आणि आहाराबाबत जागरुक असतात हे खरं आहे. पण म्हणून त्या फूडी नसतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. मलायका अरोरा (Malaika Arora) सारखी फिगरमध्ये असणारी अभिनेत्रीही खूप फूडी आहे. मलायकाला स्वत:ला खाण्याच्या बाबतीत काही ना काही प्रयोग करायला तर आवडतातच पण तिला चमचमीत आणि हेल्दी खायलाही खूप आवडतं. मलायका आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सतत काही ना काही अपडेट करत असते. यामध्ये फूड विषयातील पोस्टचाही समावेश असतो. मध्यंतरीच तिने दहीभात हे तिचे फेवरिट फूड असल्याचे सांगत दहीभाताचा छानसा फोटो पोस्ट केला होता. आता तिने आणखी एका नव्या पदार्थाचा फोटो शेअर केला आहे. 

(Image : Google)

मलायका अरोरा सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह आहे. त्यावर पोस्टमध्ये किंवा स्टोरीमध्ये ती सतत काही ना काही पोस्ट करत असते. यावर तिचे १५ लाखांहून अधिक फॉलोअर्स असल्याने आपल्या या चाहत्यांना अपडेट करण्यासाठी ती सतत काही ना काही पोस्ट शेअर करत असते. यामध्ये तिच्या ट्रिप्सपासून ते शूटींगपर्यंत आणि प्रेरणादायी कोटसपासून ते फूडपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असतो. आता पोस्ट केलेल्या एका आगळ्यावेगळ्या पदार्थाचा फोटो शेअर करत ‘मी काय खात आहे याचा तुम्ही अंदाज लावू शकता का’ असा प्रश्न मलायकाने विचारला आहे.

यामध्ये ती खात असलेल्या पदार्थाचे नाव नादरु (Nadaru) किंवा कमल काकडी (Kamal Kakdi) चिप्स असे आहे. कमळाच्या मूळापासून तयार केला जाणारा हा पदार्थ वेफर्ससारखाच लागतो. कमळाच्या फूलामध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक गुणधर्म असतात. वजन कमी करण्यासाठी, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे मूळ खाण्याचा फायदा होतो. पचनक्रिया सुधारण्यासाठी, ताणतणाव कमी करण्यासाठी तसेच शरीर डीटॉक्स करण्यासाठी या कमळ काकडी खाण्याचा फायदा होतो. दिसायला हा पदार्थ अतिशय चविष्ट दिसत असला तरी तो कसा करायचा ते आपण आज पाहणार आहोत. 

साहित्य 

१. कमळाचे मूळ/ कमळ काकडी - पातळ काप करुन घ्यायचे

२. तेल - १ वाटी

३. मीठ - चवीपुरते

४. चाट मसाला - चवीपुरता

(Image : Google)

कृती 

१. कमळाच्या मूळाचे पातळ काप करुन घ्यायचे.

२. हे काप थोडे वाळवून मग सोनेरी रंगावर तेलात तळायचे.

३. एका डिशमध्ये घेऊन त्यावर मीठ आणि चाट मसाला घालायचा. 

४. चहासोबत किंवा एरवीही वेफर्ससारखे खायला हे वेफर्स अतिशय छान लागतात.    

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.मलायका अरोरा