Lokmat Sakhi >Food > कच्च्या आणि पिकलेल्या केळीची चटणी कधी खाल्ली आहे? घ्या रेसिपी - जेवणाची वाढेल लज्जत!

कच्च्या आणि पिकलेल्या केळीची चटणी कधी खाल्ली आहे? घ्या रेसिपी - जेवणाची वाढेल लज्जत!

करा कच्च्या आणि पिकलेल्या केळीच्या चटपटीत चटण्या.. जेवणाला चव येणारच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 07:09 PM2022-06-03T19:09:21+5:302022-06-03T19:11:46+5:30

करा कच्च्या आणि पिकलेल्या केळीच्या चटपटीत चटण्या.. जेवणाला चव येणारच!

Ever eaten raw and ripe banana chutney? Take the recipe - These chutney are increase the flavour of meal | कच्च्या आणि पिकलेल्या केळीची चटणी कधी खाल्ली आहे? घ्या रेसिपी - जेवणाची वाढेल लज्जत!

कच्च्या आणि पिकलेल्या केळीची चटणी कधी खाल्ली आहे? घ्या रेसिपी - जेवणाची वाढेल लज्जत!

Highlightsकच्च्या आणि पिकलेल्या केळीच्या चटण्या चविष्ट तर लागतातच सोबतच आरोग्यास गुणकारीही आहेत. केळीच्या चटण्यांमुळे पचनक्रिया सुलभ होते. 

कच्च्या आणि पिकलेल्या केळीच्या चटण्या चविष्ट तर लागतातच सोबतच आरोग्यास गुणकारीही आहेत. केळीच्या चटण्यांमुळे पचनक्रिया सुलभ होते.
जीवनसत्व आणि फायबरयुक्त केळ हे आरोग्यासाठी लाभदायक फळ आहे. कच्च्या आणि पिकलेल्या केळाचे विविध पदार्थ करता येतात.  केळाचे जसे पराठे, चिप्स, पॅनकेक, भाजी कोशिंबीर करता येते तशीच पोळी पराठ्यासोबत खाण्यासाठी केळाच्या चटपटीत चटण्यादेखील करता येतात. कच्च्या आणि पिकलेल्या केळीच्या चटण्या चविष्ट तर लागतातच सोबतच आरोग्यास गुणकारीही आहेत. केळीच्या चटण्यांमुळे पचनक्रिया सुलभ होते. 

Image: Google

कच्च्या केळाची तिखट चटणी

कच्च्या केळाची चटणी करण्यासाठी 1 कच्चं केळ, 1 मोठा कांदा, 10-12 पाकळ्या लसूण, 1 चमचा बडीशेप, 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा उडदाची डाळ, 5 लाल मिरच्या, 1 टमाटा, चवीपुरती चिंच, मूठभर कढीपत्ता,, थोडी पुदिन्याची पानं,  1 छोटा चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घ्यावं. 

Image: Google

कच्च्या केळाची चटणी करताना केळाचं साल काढून केळ कुस्करुन घ्यावं. कांदा, टमाटा चिरुन घ्यावा. लाल मिरची, लसूण, चिंच आणि बडीशेप यांची मिक्सरमधून बारीक पेस्ट करावी. कढईत थोडं तेल गरम करावं. तेल गरम झालं की त्यात मोहरी, उडदाची डाळ आणि कढीपत्ता फोडणीस घालावा. नंतर यात चिरलेला कांदा घालून तो परतून घ्यावा. नंतर टमाटा आणि मीठ घालावं. टमाटा मऊ होईपर्यंत परतावा. टमाटा परतला गेला की यात कुस्करलेलं केळ,  मिरची लसणाची पेस्ट आणि थोडं पाणी घालून सर्व जिन्नस नीट एकत्र करावं.  चटणीतील पाणी सुकून चटणी दाटसर होईपर्यंत परतावी. गॅस बंद केल्यानंतर चटणीवर चिरलेली कोथिंबीर घालावी.

Image: Google

पिकलेल्या केळाची चटपटीत चटणी

पिकलेल्या केळाची चटपटीत चटणी करण्यासाठी 4-5 पिकलेल्या केळी, पाव चमचा दालचिनी पूड, अर्धा चमचा लाल तिखट, 2 चमचे मीठ, पाव कप साखर, 2 लवंगाची पूड, 2 मोठे चमचे व्हिनेगर घ्यावं.  घ्यावं.

 Image: Google

चटणी करण्यासाठी केळाचे बारीक काप करावेत.  कढईत व्हिनेगर घालावं. त्यात केळाचे काप घालावेत.. नंतर यात साखर घालून थोडा वेळ मिश्रण गरम करावं. मिश्रणाला चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. नंतर यात मीठ, लाल तिखट, लवंगाची पूड आणि दालचिनीची पूड घालावी. हे सर्व नीट मिसळून घेतल्यावर मिश्रण चांगलं थंडं होवू द्यावं. केळाची ही चटपटीत चटणी पराठ्यांसोबत छान लागते. 


 

Web Title: Ever eaten raw and ripe banana chutney? Take the recipe - These chutney are increase the flavour of meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.