सणवार असो की, फंक्शन जेवणाचा स्पेशल बेत म्हटलं की त्यात पुरी हवीच. खासकरून महाराष्ट्रीयन थाळीमध्ये पुरी श्रीखंड हमखास असते. पुरीसोबत बटाट्याची भाजी, छोले, श्रीखंड खाल्ले जाते. पण आपण कधी विचार केला आहे का की, पुरी किती प्रमाणात तेल अॅब्सॉर्ब करते? यासंदर्भात, पोषणतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी पुरी किती प्रमाणात तेल शोषते, व यातून शरीरात फॅट्स किती प्रमाणात जमा होते, याबद्दल माहिती दिली आहे.
यासंदर्भात, किरण कुकरेजा म्हणतात, ''आज मी साधारण एक पुरी किती तेल शोषते हे मोजण्याचा प्रयत्न केला. ६ पुऱ्या तळण्यासाठी मी कढईत २०४ ग्रॅम तेल वापरले. यात मी ६ पुऱ्या तळल्या. पुऱ्या तळल्यानंतर १५९ ग्रॅम उरले. म्हणजेच ६ पुऱ्यांना ४५ ग्रॅम तेल लागले. एका पुरीने ७.५ ग्रॅम तेल अॅब्सॉर्ब केले''(Ever wondered how much oil a poori absorbs?).
एका पुरीमध्ये किती कॅलरीज असतात?
पोषणतज्ज्ञ म्हणतात, ''7.5 ग्रॅम तेलात 67.5 कॅलरीज असतात. तर, तळलेल्या एका पुरीतून 90 कॅलरीज मिळतात. म्हणजेच - "1 पुरी 90 + 67.5 = 157.5 इतके कॅलरीज एक पुरी अॅब्सॉर्ब करते, म्हणजेच एक अर्धा चमचा तेल.''
सतत स्मार्ट फोन स्क्रोल करकरुन अंधूक दिसू लागले? ४ व्हिटॅमिन्सचा डोस वाढवा, नजर राहील शाबूत
मग, पुरी खावी की नाही?
नियमित पुरी खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यात अनसॅच्युरेडेट फॅट्स असतात. त्यामुळे फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी पुरी खा. दोन ते तीन महिन्यासातून एकदा आपण पुरी खाऊ शकता.
बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे स्वयंपाकघरातले ४ जिन्नस, स्वस्तात मस्त नैसर्गिक उपाय
पुरी करताना कोणती चूक करू नये?
गोदरेज मेमोरियल हॉस्पिटलचे आहारतज्ज्ञ योगिता चव्हाण सांगतात, ''कणिक तयार करताना जास्त पाणी घातल्यास, पुरी जास्त तेल शोषून घेते. त्यामुळे पीठ घट्ट मळावे. एका पुरीमध्ये साधारण १२० कॅलरीज असू शकतात. डीप फ्राईड पदार्थ तेल जास्त शोषून घेतातच, म्हणून दोन ते तीन महिन्यातून एकदा पुरी खाल्ले तर चालते.''