Lokmat Sakhi >Food > सगळ्यांचा फेवरिट बटाटा, तो भारतात आला कसा? कुणी आणला?

सगळ्यांचा फेवरिट बटाटा, तो भारतात आला कसा? कुणी आणला?

बटाटा म्हणजे आपत्तीतला देवदूत, हा बटाटा नेमका आपल्या स्वयंपाक घरात रुळला कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 03:35 PM2021-06-02T15:35:33+5:302021-06-02T15:50:01+5:30

बटाटा म्हणजे आपत्तीतला देवदूत, हा बटाटा नेमका आपल्या स्वयंपाक घरात रुळला कसा?

Everyone's favorite potato, how did it come to India? Who brought it? Origin of potato? | सगळ्यांचा फेवरिट बटाटा, तो भारतात आला कसा? कुणी आणला?

सगळ्यांचा फेवरिट बटाटा, तो भारतात आला कसा? कुणी आणला?

Highlightsभारतीय स्वयंपाकातही हळूहळू का होईना त्याने हक्काची जागा निर्माण केली.

मेघना सामंत

स्वयंपाकघरातले काही जिन्नस हमखास आपल्याला मदतीचा हात देत असतात. बटाटा हा त्यांतला प्रमुख. बाहेर
मंडया बंद आहेत? भाज्या मिळेनाशा झाल्यात? डब्यात द्यायला पटकन काही करायचंय? जेवणात एखादा पदार्थ
कमी पडतोय? ऐन वेळेला पाहुणे आलेत? रश्श्यात मीठ जास्त पडलेय? सगळ्या समस्यांवर उत्तर म्हणून बटाटा
हाजिर है! भारतीय पाकशास्त्राच्या इतिहासात तसा अगदी अलीकडे दाखल झालेला हा आगंतुक आज सर्वाधिक
खपाचा शेतमाल बनलाय, बापड्याचं सेवाकार्य अव्याहत चालू असतं, बदल्यात काही न मागता.
दक्षिण अमेरिकेतल्या पेरू देशाचा मूळ रहिवासी असलेल्या बटाट्याला इ.स. १५७०च्या सुमारास स्पॅनिश
आक्रमकांनी प्रथम हेरलं आणि स्वतःसोबत युरोपात नेलं. 

पण किती गैरसमज होते त्याच्याबद्दल-- पराजित राष्ट्रांतल्या गरीब जनतेचं अन्न, जमिनीच्या खाली उगवणारं ‘सैतानाचं सफरचंद’ म्हणून युरोपीय उमरावांनी नाकारलंच बटाट्याला. पण नंतर परिस्थिती बदलली. 
१७७०च्या आसपास युरोपचं हवामान विचित्र व्हायला लागलं.
भरवशाची पिकं साथ देईनात तेव्हा विश्वासू आणि टिकाऊ बटाटाच मदतीला धावून आला. फ्रान्स, जर्मनी अशा
देशांतल्या शेतकऱ्यांनी छोट्याछोट्या वाफ्यांत त्यांची लागवड करून नेटाने त्याचा प्रसार केला; शास्त्रज्ञांनी त्याच्या सगळ्या गुणांचा अभ्यास केला; नवी कृषिधोरणं आखली गेली, मग त्याचं बस्तान चांगलंच बसलं. पुढच्या
शतकभरात तऱ्हेतऱ्हेच्या पाककृतींमध्ये बटाट्याला मानाचं स्थान मिळालं. 
आयर्लंडमध्ये तर जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यांनी बटाट्याचंच पीक घ्यायला सुरुवात केली.
आता आपल्याला माहितीच असतं की भारतात बटाटा पोर्तुगीजांचं बोट धरून आला. बटाटा हा शब्द पोर्तुगीज. पण खऱ्या अर्थाने या भूमीत त्याला रुजवलं ब्रिटिशांनी. राज्यकर्त्यांना जाऊ त्या देशात आपल्या आवडीचं जेवण लागतं, ते काय युरोपवरून बोटी भरून बटाटा आणणार होते? मग जिथे डोंगरउतार तिथे बटाट्याची लागवड व्हायला लागली. शांततापूर्ण आक्रमणच ते. कारण बटाट्याच्या झपाट्याने कित्येक स्थानिक पिकांनी मान टाकली. असो.

बटाट्याचं आगमन हे भारतीय खाद्यविश्वातलं अत्यंत महत्त्वाचं नवपर्व एवढं खरं. साठवण करता येण्याजोगा,
पोटभरीचा, स्वस्त, आणि कशाहीसोबत आपलं मैत्र सहजपणे जमवणारा; कधी एकट्यानेच किल्ला लढवणारा नेता तर कधी इतरांच्या खांद्याला खांदा देणारा इमानी कार्यकर्ता अशा दोन्ही भूमिका सांभाळत भारतीय स्वयंपाकातही हळूहळू का होईना त्याने हक्काची जागा निर्माण केली.

(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

Web Title: Everyone's favorite potato, how did it come to India? Who brought it? Origin of potato?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न