Lokmat Sakhi >Food > Viral Video : स्वयंपाक करताना भाजीत पडलेलं जास्त तेल काढून टाकण्याची अनोखी ट्रिक; पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral Video : स्वयंपाक करताना भाजीत पडलेलं जास्त तेल काढून टाकण्याची अनोखी ट्रिक; पाहा व्हायरल व्हिडिओ

Extra oil from food removed by man : हा व्हिडिओ शेअर करताना एका व्यक्तीने लिहिले की, तेल काढण्यासाठी बर्फाचा वापर कसा केला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 03:34 PM2022-10-05T15:34:17+5:302022-10-06T14:48:19+5:30

Extra oil from food removed by man : हा व्हिडिओ शेअर करताना एका व्यक्तीने लिहिले की, तेल काढण्यासाठी बर्फाचा वापर कसा केला जातो.

Extra oil from food removed by man withg ice pepole said its amazing viral on social  | Viral Video : स्वयंपाक करताना भाजीत पडलेलं जास्त तेल काढून टाकण्याची अनोखी ट्रिक; पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral Video : स्वयंपाक करताना भाजीत पडलेलं जास्त तेल काढून टाकण्याची अनोखी ट्रिक; पाहा व्हायरल व्हिडिओ

आजच्या काळात प्रत्येकाला निरोगी राहावे आणि टवटवीत दिसावे असे वाटते. यासाठी अनेकजण व्यायाम करतो. तर अनेकांचा भर चांगलं खाण्यावर असतो. दुसरीकडे, डॉक्टर अनेकदा म्हणतात की तेलापासून बनवलेल्या गोष्टी कमी खाव्यात, तरी काही लोकांना तेलकट आणि स्निग्ध पदार्थ खाणे आवडते. दरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका व्यक्तीने जेवणातून अतिरिक्त तेल कसे काढले हे दिसत आहे. (Extra oil from food removed by man withg ice pepole said its amazing viral on social)

वास्तविक, अनेकांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना एका व्यक्तीने लिहिले की, तेल काढण्यासाठी बर्फाचा वापर कसा केला जातो. या व्‍हिडिओमध्‍ये या व्‍यक्‍तीने तरंगणारे  अतिरिक्त तेल काढून टाकण्‍याचा  मार्ग शोधल्‍याचे दिसत आहे. ही व्यक्ती गोल आकाराच्या बर्फाचा मोठा तुकडा वापरून अन्नावर तरंगणारे तेल हळूवारपणे काढून टाकते.

त्यासाठी आधी तो बर्फाचा तुकडा तेलात बुडवतो. बर्फ त्यामध्ये गेल्यावर अन्नाच्या वर तरंगणारा ग्रीसचा जाड थर बर्फाच्या क्यूबला चिकटतो. मग ती व्यक्ती ते तेल बर्फापासून वेगळे करते. त्यानंतर तो त्याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करतो. हा जुगाड पाहून लोक हैराण झाले आणि मजेशीर प्रतिक्रिया देऊ लागले.

हा व्हिडीओ देखील मजेदार आहे कारण काही लोक अन्नामध्ये जास्त तेलाच्या बाबतीत खूप सावध असतात. हे तंत्रज्ञान भारताबाहेर जाऊ नये, असे उत्तर देताना एका युजरने खिल्लीही उडवली. काही युजर्स हा फॉर्म्युला ढाब्यांवर नेण्याचे आवाहनही करत आहेत. अवघ्या 18 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 16 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

Web Title: Extra oil from food removed by man withg ice pepole said its amazing viral on social 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.