Lokmat Sakhi >Food > दसरा स्पेशल : हलवाईकडे मिळतो तसा फाफडा करा घरी-अस्सल गुजराथी फाफडा करण्याची सोपी रेसिपी...

दसरा स्पेशल : हलवाईकडे मिळतो तसा फाफडा करा घरी-अस्सल गुजराथी फाफडा करण्याची सोपी रेसिपी...

Gujarati Fafda :How to make Gujarati Fafda at home : गुजरातचा स्पेशल फाफडा घरीही सहज करता येईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 07:23 PM2024-10-11T19:23:42+5:302024-10-11T19:32:57+5:30

Gujarati Fafda :How to make Gujarati Fafda at home : गुजरातचा स्पेशल फाफडा घरीही सहज करता येईल.

Fafda Recipe How To Make Fafda How to make Gujarati Fafda at home | दसरा स्पेशल : हलवाईकडे मिळतो तसा फाफडा करा घरी-अस्सल गुजराथी फाफडा करण्याची सोपी रेसिपी...

दसरा स्पेशल : हलवाईकडे मिळतो तसा फाफडा करा घरी-अस्सल गुजराथी फाफडा करण्याची सोपी रेसिपी...

मूळची गुजराथी डिश असलेला फाफडा देशभर प्रसिद्ध आहे. फाफडा हा खाद्यपदार्थ जरी गुजरात राज्यातला असला तरी आता अनेक ठिकाणी आवडीने खाल्ला जातो. फाफडा हा चण्याच्या पिठापासून बनवलेला कुरकुरीत, तळलेला नाश्त्याचा प्रकार आहे. आपल्याकडे बरेचदा रोजच्या त्याच त्याच नाश्त्याचा कंटाळा आला की, आपण काहीतरी वेगळे नक्की खातो. आपल्यापैकी बरेचजण सकाळच्या नाश्त्याला जिलेबी, फाफडा, ढोकळा असे पदार्थ खाणे पसंत करतात. कुरकुरीत मसालेदार फाफड्याचा एक तुकडा खाऊन त्यावर गोड जिलेबीचा एक घास खाणे, याहून मोठे स्वर्गसुख नाही. फाफडा हा पारंपरिक पद्धतीने तळलेली मिरची किंवा कोरड्या पपईच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह केला जातो(Fafda Recipe - How To Make Fafda).

'दसरा' हा सण अनेक राज्यांत वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. 'फाफडा' हा गुजरातचा मूळ खाद्यपदार्थ आहे. दसऱ्याच्या दिवशी फाफडा खाऊन शक्यतो नवरात्रीचे उपवास सोडले जातात. गुजरातमध्ये अनेक सणांदरम्याने फराळाला सर्वाधिक पसंती याच खास पदार्थाला दिली जाते. दसऱ्याच्या दिवशी सकाळी गुजरातमधील प्रत्येक फरसाण दुकानाबाहेर फाफडा (How to make Gujarati Fafda at home) खरेदी करण्यासाठी मोठ्या रांगा लागलेल्या असतात. असा हा गुजरात स्पेशल फाफडा घरच्या घरी झटपट तयार करण्यासाठीची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Gujarati Fafda).     
   
साहित्य :- 

१. बेसन - १ कप 
२. पापड खार - १/२ टेबलस्पून 
३. बेकिंग पावडर - १/४ टेबलस्पून 
४. हळद - १/४ टेबलस्पून 
५. पाणी - २ टेबलस्पून 
६. ओवा - १/२ टेबलस्पून 
७. मीठ - चवीनुसार 
८. हिंग - १/८ टेबलस्पून 
९. तेल - तळण्यासाठी  

कटलेट्स-पॅटिस क्रिस्पी -कुरकुरीत आणि चविष्ट हाेण्यासाठी ६ उपाय, गार झाल्यावरही मऊ पडणार नाहीत...


दसरा स्पेशल : तासंतास दूध न आटवता पटकन होणाऱ्या इन्स्टंट बासुंदीची सोपी रेसिपी, दाटसर - गोड बासुंदीचा परफेक्ट बेत...

कृती :- 

१. सर्वप्रथम एक कप बेसन घेऊन ते चाळणीत ओतून बारीक चाळून घ्यावे. 
२. आता एका छोट्या बाऊलमध्ये पापड खार, बेकिंग पावडर, हळद घेऊन त्यात थोडेसे पाणी ओतून हे सगळे जिन्नस पाण्यासोबत मिसळून घ्यावे. 
३. त्यानंतर बारीक चाळून घेतलेल्या बेसन पिठामध्ये ओवा, हिंग, चवीनुसार मीठ घालून घ्यावे. 
४. आता मगाशी तयार करून घेतलेले पाणी हळूहळू यात ओतून पीठ मळून घ्यावे. पीठ मळताना ते जास्त घट्ट किंवा अगदीच पातळ मळू नये. 

५. पीठ मळून झाल्यानंतर त्याचे छोटे - छोटे चपटे लंबगोलाकार आकारात गोळे करुन घ्यावेत. 
६. आता एक लाकडी चॉपिंग बोर्ड घेऊन एक - एक गोळा घेऊन आपल्या तळहाताच्या मनगटाच्या बाजूने त्याच्यावर दाब देऊन तो पसरवत फाफड्याच्या आकारात लांब करून घ्यावा. 
७. त्यानंतर चॉपिंग बोर्डवर चिकटलेला हा फाफडा सुरीच्या मदतीने काढून घ्यावा. 
८. आता एका कढईत तेल घेऊन त्यात एक एक फाफडा सोडून तो दोन्ही बाजुंनी तळून घ्यावा. 

अशाप्रकारे चविष्ट असा फाफडा खाण्यासाठी तयार आहे. हिरवी चटणी, लोणचं, मिरची किंवा कोरड्या पपईच्या चटणीसोबत हा गरमागरम  फाफडा खाल्ला की अजून मजा येते.

Web Title: Fafda Recipe How To Make Fafda How to make Gujarati Fafda at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.