प्रत्येक शहराची खाद्य संस्कृती वेगवेगळी असते. त्यानुसार त्या त्या भागातले काही पदार्थ कमालीचे लोकप्रिय होतात. त्या शहरातले खवय्ये तर आपापल्या शहरातील प्रसिद्ध पदार्थांचा आस्वाद घेतातच, पण बाहेरून येणारे खवय्येही कोणत्या शहरात गेल्यावर काय खायचं याचा शोध घेतच असतात. असंच जर तुम्ही पर्यटनासाठी किंवा काही कामासाठी गुजरातमधीलअहमदाबादला जाणार असाल तर तिथे गेल्यावर तिथल्या मानेक चौकात मिळणारं पायनॅपल सॅण्डविच खायला विसरू नका. हे सॅण्डविच स्मृती इराणी यांचं अतिशय आवडीचं असून त्यांचा याविषयीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे (Smriti Irani's favorite paineapple sandwich with icecream). सध्याच अहमदाबादला जाण्याचा विचार नसेल तर त्यांनी या सॅण्डविचची रेसिपीसुद्धा सांगितली आहे. ती बघा आणि घरच्याघरी सुटीच्या दिवशी किंवा नाश्त्यासाठी गारेगार पायनॅपल सॅण्डविचचा बेत करून पाहा...(famous pineapple sandwich recipe of Ahmedabad)
अहमदाबादच्या प्रसिद्ध पायनॅपल सॅण्डविचची रेसिपी
साहित्य
ब्रेड स्लाईस
चीज
हरबरे, राजमा खाल्ल्याने पोट फुगतं- गॅसेस होतात? १ सोपी ट्रिक- बिंधास्त खा, त्रास होणार नाही
चोकोचिप्स
अननस
आईस्क्रिम
पायनॅपल क्रश किंवा पायनॅपल जॅम
कृती
सगळ्यात आधी ब्रेडच्या स्लाईसचे चारही बाजुंचे चॉकलेटी काठ काढून घ्या. तुम्हाला ते आवडत असतील तर तसेच ठेवू शकता.
नारळ जास्तीतजास्त दिवस फ्रेश राहावं, सुकून त्याचं खोबरं होऊ नये म्हणून १ सोपी ट्रिक...
यानंतर ब्रेडच्या एका स्लाईसला पायनॅपल जॅम किंवा पायनॅपल क्रश लावून घ्या. त्यावर अननसाच्या बारीक चिरलेल्या फोडी ठेवा.
त्यानंतर त्यावर चीज किसून टाका किंवा चीज स्लाईस ठेवून द्या. त्यावर थोडे चोकोचिप्स टाका.
डब्यांचे झाकण, त्यांचे रबर पिवळट- तेलकट झाले? १ खास उपाय, रबर- झाकण होईल नव्यासारखं चकाचक
सगळ्यात शेवटी आणखी एका ब्रेड स्लाईसला व्हॅनिला किंवा ड्रायफ्रुट्स असणारं एखादं आईस्क्रिम लावा आणि नंतर असंच गारेगार सॅण्डविज खाण्याचा आनंद घ्या. हे सॅण्डविच खाण्याचा फिल, त्याची चव अतिशय वेगळी आहे, असं स्मृती इराणी सांगतात.