Lokmat Sakhi >Food > कांदा - बटाटा न वापरता करा पारंपरिक गोळा भजी, भर पावसात झणझणीत मेजवानी...

कांदा - बटाटा न वापरता करा पारंपरिक गोळा भजी, भर पावसात झणझणीत मेजवानी...

Goli Baje Recipe - Udupi & Managlore Favorite Snack : आपण मैदा व दह्याचा वापर करून अगदी कमी साहित्यात तयार होणारी ही गोळी भजी बनवू शकतो....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2023 02:16 PM2023-08-16T14:16:00+5:302023-08-16T14:35:36+5:30

Goli Baje Recipe - Udupi & Managlore Favorite Snack : आपण मैदा व दह्याचा वापर करून अगदी कमी साहित्यात तयार होणारी ही गोळी भजी बनवू शकतो....

Famous Tea Time Snack 5 Minute Recipe : Instant Mysore Goli Baje Recipe at home. | कांदा - बटाटा न वापरता करा पारंपरिक गोळा भजी, भर पावसात झणझणीत मेजवानी...

कांदा - बटाटा न वापरता करा पारंपरिक गोळा भजी, भर पावसात झणझणीत मेजवानी...

धो - धो कोसळणारा मुसळदार पाऊस आणि भजी हे समीकरण म्हणजे अनेक लोकांचे प्रेम. पावसाळ्यात भजी खाण्याचा आनंद काही औरच असतो. मग ती भजी कांद्याची असो किंवा इतर कशाचीही. मुसळदार पाऊस सुरु झाला की भजी खाण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. आता पर्यंत आपण भजी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर कांदा, बटाटा, किंवा इतर मोजकेच भज्यांचे प्रकार येत असतील. परंतु आपल्याला या भज्या खाऊन कंटाळा आला असेल तर आपण झटपट होणारी गोळा भजी देखील घरच्या घरी करु शकतो. 

पाऊस सुरु झाला किंवा कधी ऐनवेळी रोजच्या जेवणाचा कंटाळा आला आणि काहीतरी चटपटीत खावंसं वाटलं, तर गोळा भजी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. ही भजी बनवायला अतिशय सोपी व झटपट होणारी रेसिपी आहे. भजी खायची म्हटली आणि घरात जर कांदा, बटाटा उपलब्ध नसेल तर आपण मैदा व  दह्याचा वापर करून अगदी कमी साहित्यात तयार होणारी ही गोळा भजी बनवू शकतो. गोळा भजी बनविण्याचे साहित्य व कृती समजून घेऊयात(Famous Tea Time Snack 5 Minute Recipe : Instant Mysore Goli Baje Recipe at home).     

साहित्य :- 

१. दही - १ कप 
२. पाणी - १/२ कप 
३. जिरे - १/२ टेबलस्पून 
४. मैदा - १, १/२ कप 
५. मीठ - चवीनुसार 
६. बेकिंग सोडा - १ टेबलस्पून 
७. तेल - ५ ते ६ टेबलस्पून (तळण्यासाठी)

सकाळचा पहिला चहा बिघडला-पांचट झाला तर मूड जातोच, ४ टिप्स- चहा होईल फक्कड...

गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!

कृती :- 

१. सर्वप्रथम एक मोठा बाऊल घेऊन त्यात दही घालून मग गरजेनुसार पाणी, जिरे, मैदा, चवीनुसार मीठ घालून घ्यावे. 
२. आता हे सगळे मिश्रण चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावे. 
३. हे मिश्रण अधिक पातळ किंवा गरजेपेक्षा जास्त घट्ट असू नये, मध्यम कन्सिस्टंन्सीचे मिश्रण बनवून घ्यावे. 
४. त्यानंतर हे तयार मिश्रण किमान ४ ते ५ तास झाकून फुलून येण्यासाठी ठेवावे, हे तयार पीठ आपण रात्रभरासाठी देखील फुलून येण्यासाठी ठेवू शकता. 

फोडशीची रानभाजी खायला नाक मुरडणारे देखील फोडशीची भजी चवीने खातील, चमचमीत व पौष्टिक रेसिपी...

घरच्याघरी करा परफेक्ट ढोकळा प्रिमिक्स, १० मिनिटांत लुसलुशीत ढोकळा तयार ! पीठ टिकते ६ महिने...

५. जेव्हा हे मिश्रण फुलून तयार होतील व आपण भजी बनवायला घ्याल तेव्हा या मिश्रणात १ टेबलस्पून बेकिंग सोडा घालावा. 
६. हे मिश्रण पुन्हा चमच्याच्या मदतीने व्यवस्थित ढवळून घ्यावे. 
७. आता एका कढईत तेल तापवून घ्यावे. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात एक एक करून भजी चमच्याच्या मदतीने गोल आकारात तेलात सोडून घ्यावी. 
८. ही गोळी भजी तेलात दोन्ही बाजुंनी खरपूस तळून घ्यावी. 

दीर्घकाळ टिकणारी आलं - लसणाची झटपट पेस्ट बनवण्याची सोपी कृती, पाहा पेस्ट बनवण्याची योग्य पद्धत...

आपली गरमागरम, सॉफ्ट, खुसखुशीत गोळी भजी खाण्यासाठी तयार आहे. ही भजी हिरवी चटणी किंवा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावी.

Web Title: Famous Tea Time Snack 5 Minute Recipe : Instant Mysore Goli Baje Recipe at home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.