आजकाल सोशल मीडियावर खाण्यापिण्याच्या पदार्थांमधील वेगवेगळे प्रयोग व्हायरल होत असतात. काही प्रयोग इतके विचित्र असतात की ते पाहताच किळस वाटते. सध्या फॅन्टा मॅगीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा फोटो पाहून तुम्हालाही नवल वाटेल. यूट्यूब पेज फूडी इनकार्नेटचे फूड ब्लॉगर अमर सिरोही यांनी व्हिडिओ पोस्ट केला होता. यात गाझियाबादमधील एक स्ट्रीट फूड विक्रेता हा अत्यंत सोपी पण आगळी वेगळी डीश बनवताना दिसून येत आहे. (Fanta Maggi)
या व्हिडीओमध्ये ब्लॉगर इतर फ्यूजन पदार्थांची नावे देखील देतो जे लोक पचवू शकत नाहीत. तो गमतीने पुढे म्हणतो की ‘लोक ओरियो बरोबर फ्रिटर बनवतात, कोका कोलामध्ये दूध मिसळतात आणि फॅन्टासह मॅगी तयार करतात, जगाचा अंत जवळ आला आहे.
फॅन्टा मॅगीचा हा व्हिडीओ 18 नोव्हेंबरला शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओला सुमारे 2.8 दशलक्ष व्हिव्हज मिळाले आहेत. तर या व्हिडीओवर लोकांनी खूप कमेंट्सचा वर्षावही केला आहे. काही फूड ब्लॉगर्सनी सहमती दर्शवली आणि डिश चांगली चव येईल असे वाटले, तर इतरांनी असहमत दर्शवली
त्यानं सांगितलं की, हे खूप विचित्र वाटतंय पण अनेक रेस्टॉरंट्समध्ये ही पद्धत मॅगी नव्हे तर चिकनसाठी वापरतात. कोका कोला किंवा पेप्सीचा वापर केला जातो. “एका YouTube वापरकर्त्याने लिहिले.” Thanos बद्दलचा माझा आदर दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर संतापजनक कमेंट्स केल्या आहेत.