Lokmat Sakhi >Food > उपवासाचं फळ हवं, तब्येतीत सुधारणा हवी? राजगिऱ्याचा शिरा खा- श्रावणातल्या उपवासानंतर वाटेल हलकं-फ्रेश...

उपवासाचं फळ हवं, तब्येतीत सुधारणा हवी? राजगिऱ्याचा शिरा खा- श्रावणातल्या उपवासानंतर वाटेल हलकं-फ्रेश...

Farali Rajgira Sheera : Farali Rajgira Sheera Easy to Make Upwas Recipe : राजगिऱ्यामध्ये भरपूर पोषणमूल्य असतात, यासाठीच्या उपवासाच्या दिवशी राजगिरा आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ खावेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2024 03:44 PM2024-08-13T15:44:53+5:302024-08-13T15:55:47+5:30

Farali Rajgira Sheera : Farali Rajgira Sheera Easy to Make Upwas Recipe : राजगिऱ्यामध्ये भरपूर पोषणमूल्य असतात, यासाठीच्या उपवासाच्या दिवशी राजगिरा आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ खावेत.

Farali Rajgira Sheera Farali Rajgira Sheera Easy to Make Upwas Recipe Rajgiryacha Sheera Recipe | उपवासाचं फळ हवं, तब्येतीत सुधारणा हवी? राजगिऱ्याचा शिरा खा- श्रावणातल्या उपवासानंतर वाटेल हलकं-फ्रेश...

उपवासाचं फळ हवं, तब्येतीत सुधारणा हवी? राजगिऱ्याचा शिरा खा- श्रावणातल्या उपवासानंतर वाटेल हलकं-फ्रेश...

श्रावण महिना नुकताच सुरु झाला आहे. श्रावण महिन्यात अनेक सण येतात. या सणांदरम्यान अनेकजण उपवास करतात. त्याचबरोबर श्रावण महिन्यात येणारे  श्रावणी सोमवार आणि शनिवार या दोन दिवशी बरेचजण उपवास करतात. उपवास म्हटलं की उपवासाचे अनेक पदार्थ आपल्याला आठवतात. उपवास असला की प्रत्येक घरात उपवासाच्या वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते. उपवासाला आपण काही मोजकेच पदार्थ खाऊ शकतो. या मोजक्याच पदार्थांमध्ये साबुदाणा, बटाटा, दही, दूध, रताळे, राजगिरा (Farali Rajgira Sheera) असा अनेक पदार्थांचा समावेश असतो. उपवासाच्या या पदार्थांपैकी काही पदार्थ खाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आणि शरीराला पौष्टिक असते(Rajgira Sheera Recipe).

उपवासाचा त्रास होऊ नये, शिवाय उपवासाच्या पदार्थांतून पोषण मिळून त्याचा तब्येतीला फायदा व्हावा या उद्देशाने राजगीरा आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे फायदेशीर ठरते. उपवास आणि (Rajgiryacha Sheera Recipe) पोषण या दोन्ही गोष्टी एकत्र साधता आल्या तर कधीही  उत्तम, आणि ते राजगिरा खाऊन शक्य होऊ शकते. राजगिऱ्यामध्ये भरपूर पोषणमूल्य असतात. यासाठीच्या उपवासाच्या दिवशी राजगिरा आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ खावेत. राजगिऱ्याच्या लाडू, चिक्की हे तर आपण उपवासाला खातोच पण यंदाच्या उपवासाला राजगिऱ्याच्या पौष्टिक शिरा (Vrat special Rajgira sheera) करुन तर पाहा, त्याचीच सोपी रेसिपी पाहूयात(Farali Rajgira Sheera Easy to Make Upwas Recipe).  

साहित्य :- 

१. राजगिऱ्याचे पीठ - १ कप 
२. गरम पाणी - २.५ कप
३. तूप - ४ चमचे 
४. साखर - १/२ कप 
५. वेलची पूड - १/४ टेबलस्पून 
६. ड्रायफ्रुटस काप - १/२ कप 
७. बारीक रवा - १/२ कप  

उपवास करताना तुम्हीही करताच ' या ' ५ चुका, तब्येत सुधारण्याऐवजी बिघडेल -  पडाल आजारी... 


श्रावण स्पेशल : श्रावणात पुरणाचे पदार्थ तर करायचे पण पुरणच बिघडतं? परफेक्ट पुरण करण्यासाठी खास टिप्स...

कृती :-

१. एका मोठ्या कढईमध्ये तूप घेऊन ते व्यवस्थित वितळवून गरम करून घ्यावे. 
२. तूप व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात राजगिऱ्याचे पीठ घालावे. राजगिऱ्याचे पीठ तुपात खरपूस भाजून घ्यावे. 
३. हे पीठ तुपात मिक्स करुन थोडे पातळसर करून घ्यावे. हे पीठ व्यवस्थित शिजल्यानंतर यात गरम पाणी ओतावे. 

४. गरम पाणी ओतल्यावर हे सारखे चमच्याने हलवत राहावे. जर गुठळ्या झाल्या असतील तर त्या गुठळ्या फोडून घ्याव्यात. 
५. आता यात रवा, साखर, वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे   
६. सगळ्यात शेवटी यात आपल्या आवडत्या ड्रायफ्रुटसचे काप घालावेत. 

आपला उपवासाचा राजगिऱ्याचा शिरा खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Farali Rajgira Sheera Farali Rajgira Sheera Easy to Make Upwas Recipe Rajgiryacha Sheera Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.