Join us  

शिदोरीत बांधून दिलेली गावरान कांद्याची चटणी, चमचमीत इतकी की मळ्यातल्या जेवणाची येईल आठवण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2024 12:31 PM

Farmer Favourite Spicy Onion Chutney-You will Definitely Loved it : शेतकऱ्याची शेतावर नेण्याची शिदोरी सोडून पाहा आणि खाण्याचा आस्वाद घ्या..

जगाचा पोशिंदा अर्थात बळीराजामुळे आपल्याला दोन वेळचं अन्न खायला मिळतं. ते बाराही महिने कबाडकष्ट करतात. ज्यामुळे आपण सुखाने दोन घास खातो. आपण पाहिलं असेल बऱ्याचदा शेतकरी दुपारच्या वेळेस झाडाखाली शिदोरी उघडून भाकरी-भाजी, कांदा आणि ठेचा खातो. पण भाकरीसोबत कोणती भाजी असते? आपल्याला ती भाजी तयार करून खायची असेल तर, एकदा ही रेसिपी पाहाच. कांद्याचीही चविष्ट चटणी आपल्याला नक्कीच आवडेल.

आपण ही चटणी भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता (). शिवाय ही चटणी अधिक वेळ फ्रेश टिकून राहते. शेतकरी खातो ती गावरान कांद्याची चटणी करून खायची असेल तर, एकदा ही रेसिपी करून पाहाच(Farmer Favourite Spicy Onion Chutney-You will Definitely Loved it).

गावरान कांद्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

कांदा

तेल

वजन कमी करायचं आहे? मग गव्हाच्या पोळ्याऐवजी खा 'या' पिठाच्या चपात्या; वेट लॉससाठी उत्तम

लाल तिखट

मीठ

हळद

कृती

रात्री 'या ' वेळी जेवण केले तर वजन घटणारच, वजन कमी करायचे तर पाहा जेवायची वेळ

सर्वप्रथम, गॅसवर भाडं गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात ३ बारीक चिरलेले कांदे घालून भाजून घ्या. कांद्याचा रंग सोनेरी रंगात बदलल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर त्यात एक चमचा लाल तिखट, चिमुटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. कांदा ४ ते ५ मिनिटांसाठी वाफेवर शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर भुरभुरून मिक्स करा. अशा प्रकारे भाकरीसोबत गावारान चमचमीत चटणी खायला द्या. चविष्ट चटणी आवडेल प्रत्येकाला.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स