आपल्या भारतीय परंपरेत जेवणाच्या ताटांत तोंडी लावण्यासाठी म्हणून काही खास पदार्थ असतात. लोणचं, पापड, चटणी, कोशिंबीर, असे वेगवेगळे प्रकार जेवणाच्या पानात तोंडी लावण्यासाठी म्हणून हमखास (How To Make Farsan Chutney At Home) वाढले जातात. खरंतर, या तोंडी लावण्याच्या पदार्थांमुळेच जेवणाला खरी रंगत येते. ताटात काहीवेळा आवडती भाजी नसली की काहीजण अगदी या तोंडी लावायच्या पदार्थांसोबतच सारे जेवण फस्त करतात(Farsan Chutney Recipe).
याच तोंडी लावायच्या पदार्थांमध्ये आपण चक्क मिक्स फरसाणाची चटपटीत, झणझणीत चटणी देखील करून खाऊ शकतो. चटणी करण्यासाठी आपल्या घरात काहीवेळा खोबरं किंवा कोथिंबीर असेलच असे नाही, अशावेळी आपण मिक्स फरसाणची पटकन होणारी इन्स्टंट चटणी तोंडी लावायला करु शकतो. एरवी आपण चहासोबत खाण्यासाठी म्हणून फरसाण विकत आणतोच, याच फरसाणाची मस्त झणझणीत चवीची चटपटीत चटणी करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. मिक्स फरसाण - २ कप२. हिरव्या मिरच्या - ८ ते ९ मिरच्या (भाजून घेतलेल्या)३. लसूण पाकळ्या - ८ ते १० पाकळ्या ४. कांदा - १ कप (भाजून घेतलेला)५. मीठ - चवीनुसार ६. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)७. चाट मसाला - चिमूटभर८. तेल - चमचाभर
फक्त ३ पदार्थांत करा १० मिनिटांत दहीकांडी, - बालपणीची आठवण सांगणारा गोड थंडगार पदार्थ...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका पॅनमध्ये चमचाभर तेल घेऊन त्यात हिरव्या मिरच्या, आणि उभा चिरलेला कांदा हलका भाजून घ्यावा. २. आता मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि कांदा व लसूण घालून मिक्सर फिरवून त्याची जाडसर भरड करून घ्यावी.
३. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मिक्स फरसाण आणि चाट मसाला घालावा. आता मिक्सर बंद - चालू करत मिश्रण एकदम बारीक न करता भरड होईल असे वाटून घ्यावे. तयार चटणीवर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घालावी.
फरसाणाची चटपटीत चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणून घेऊ शकता. चपाती, भाकरी, भातासोबत देखील आपण ही चटणी खाऊ शकता.