Lokmat Sakhi >Food > लसूण सोलणं किचकट वाटतं? चमचाभर मिठाचा करा 'असा' वापर; किलोभर लसूण सोलण्याची हटके ट्रिक

लसूण सोलणं किचकट वाटतं? चमचाभर मिठाचा करा 'असा' वापर; किलोभर लसूण सोलण्याची हटके ट्रिक

Fastest Way To Peel Garlic Using Salt : तासनतास सोलताय लसूण तर वापरा २ ट्रिक्स; स्वयंपाक होईल भरभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2024 02:51 PM2024-04-15T14:51:56+5:302024-04-15T14:54:56+5:30

Fastest Way To Peel Garlic Using Salt : तासनतास सोलताय लसूण तर वापरा २ ट्रिक्स; स्वयंपाक होईल भरभर

Fastest Way To Peel Garlic Using Salt | लसूण सोलणं किचकट वाटतं? चमचाभर मिठाचा करा 'असा' वापर; किलोभर लसूण सोलण्याची हटके ट्रिक

लसूण सोलणं किचकट वाटतं? चमचाभर मिठाचा करा 'असा' वापर; किलोभर लसूण सोलण्याची हटके ट्रिक

भारतीय स्वयंपाकघरांमध्ये लसणाचा वापर अधिक प्रमाणात होतो (Garlic). डाळीला फोडणी देणं असो, किंवा वाटण. पदार्थात लसूण घालताच, त्याची चव दुपट्टीने वाढते. भाजी असो किंवा मसाला त्यात जर लसूण नसेल तर, काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. लसणाचा स्वाद आणि सुगंध दोन्हीची गरज भासते (Kitchen Tips). मात्र लसूण पाकळ्या सोलण्यासाठी खूप वेळ जातो आणि कंटाळाही येतो.

लसूण खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत (Social Viral). पण लसूण सोलणे हे अत्यंत कंटाळवाणे काम असल्याकारणाने, आपण लसूण खाणं बऱ्याचदा टाळतो. जर आपल्याला लसूण सोलणे हे अत्यंत किचकट आणि वेळखाऊ काम वाटत असेल तर, एका युक्तीचा वापर करून पाहा. या युक्तीचा वापर केल्याने लसूण सोलणे सोप्पं होईल. शिवाय काही मिनिटात निदान किलोभर लसणाच्या पाकळ्या सोलून निघतील(Fastest Way To Peel Garlic Using Salt).

लसूण सोलण्याची सोपी ट्रिक

लसूण सोलत असताना नखांना जळजळ होते, शिवाय लहान पाकळ्या सोलण्यात बराच वेळ जातो. जर आपल्याला सोप्या पद्धतीने लसूण सोलायच्या असतील तर, एका ट्रिकचा वापर करून पाहा. यासाठी लसणीच्या मोठ्या पाकळ्या वेगवेगळ्या करा.

म्हशीचं की गायीचं? कोणत्या दुधाचं दही चांगलं लागतं? विकतसारखं घट्ट दही हवं तर..

नंतर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या घाला. गॅस मध्यम आचेवर ठेवा. लसणाच्या पाकळ्या भाजून घ्या, आणि मग त्यात एक चमचा मीठ घालून मिक्स करा. मिठात लसूण निदान ४ ते ५ मिनिटांसाठी भाजून घ्या.

आता एक सुती कापड घ्या. त्यावर लसणाच्या पाकळ्या पसरवा आणि सुती कापडाची गाठ बांधा. नंतर हाताने लसणाच्या पाकळ्या एकमेकांवर चोळा. जेणेकरून सहजरित्या लसणाच्या पाकळ्या निघतील. या ट्रिकमुळे काही मिनिटात लसूण सोलून होतील. शिवाय एक एक लसूण सोलण्याचं टेन्शनही कमी होईल.

खाऊन झाले की वजन वाढण्याचं टेन्शन येतं? ४ हेल्दी पदार्थ; वजन वाढणार नाही-खा बिनधास्त

सुरीने सोला लसूण

सर्वात आधी लसणीच्या सर्व पाकळ्या काढून घ्या. नंतर लसणाच्या पाकळ्या चॉपिंग बोर्डवर ठेवा आणि सुरी अथवा चाकूने त्याच्या टोकाचा टणकदार भाग कापून घ्या, नंतर पाकळ्या सोलून काढा. यामुळे लसणीच्या पाकळ्या झटपट सोलून मोकळ्या होतील.

Web Title: Fastest Way To Peel Garlic Using Salt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.