श्रावण महिनाच्या प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी अनेकजण उपवास करतात. या उपवासाच्या दिवसात आपली प्रतिकारशक्ती आणि पचनशक्ती देखील कमी होत असते. यासाठी पचण्यास सोपे असलेले पदार्थ आपल्या आहारात समावेश करणे महत्त्वाचे असते. बरेचजण प्रत्येक सोमवारी व शनिवारी निर्जळी उपवास करतात तसेच काही न खाता फक्त पूर्ण दिवस पाणी पिऊन देखील उपवास करतात. बहुतेकवेळा उपवास म्हटला की, आपण साबुदाणा बटाटा यांपासून तयार केलेले खिचडी, वडे, थालीपीठ असे पचनाला जड असणारे व तेलकट पदार्थ (Fasting Recipe) खातो. परंतु उपास करताना आपण आधीच उपाशी असतो, पोटात काही नसते अशावेळी लगेच आपण जर काही जड पदार्थ खाल्ले तर ते पचण्यास त्रास होतो. इतकेच नाही तर असे तेलकट, हेव्ही पदार्थ खाल्ल्याने उपवासाच्या(Fasting Recipe) दुसऱ्या दिवशी पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
उपवासाच्या पदार्थांमध्ये पचायला हलका, कमी तेलकट, खायला चविष्ट असा झटपट होणारा पदार्थ म्हणजे वरीचा पुलाव (Vari Pulao Recipe). नेहमी आपण वेगवेगळ्या भाज्या मसाले घालून पुलाव बनवतो. परंतु उपवासाला अगदी कमी साहित्यात चटकन (Quick Fasting Vari Pulao Recipe) तयार होणारा आणि खायला साबुदाणा आणि बटाट्यापेक्षा वेगळं काहीतरी म्हणून वरीचा पुलाव (Vari Pulao) हा उत्तम पर्याय ठरु शकतो. साधा - सोपा वरीचा पुलाव (Vari Pulao) बनवण्याची सोपी कृती पाहूयात(Fasting Recipe : How To Make Vari Pulao Recipe At Home).
साहित्य :-
१. साजूक तूप - १ टेबलस्पून २. जिरे - १ टेबलस्पून ३. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ (बारीक चिरून घेतलेल्या) ४. कडीपत्ता - ४ ते ५ पाने ५. बटाटा - १ मोठा बटाटा (लहान तुकडे करून घेतलेला)६. भिजवलेले शेंगदाणे - १/२ कप ७. वरीचे तांदूळ - २ ते ३ कप (२ ते ३ तास पाण्यांत भिजवून घेतलेले)८. मीठ - चवीनुसार ९. पाणी - गरजेनुसार
उकडलेले गरम बटाटे सोलण्याची १ सोपी ट्रिक, हात न पोळता साल काढा झटपट...
श्रावण स्पेशल : उपवासाची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का ? मऊसूत गोड उपवास पुरणपोळीची सोपी रेसिपी...
कृती :-
१. सर्वप्रथम एका भांड्यात साजूक तूप घेऊन त्यात फोडणीसाठी जिरे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कडीपत्ता घालून खमंग फोडणी द्यावी. २. आता त्यात बटाट्याचे लहान तुकडे, भिजवून घेतलेले शेंगदाणे घालावेत. ३. हे सगळे जिन्नस घालून तुपावर खमंग परतून घ्यावे. ४. सर्वात शेवटी यात भिजवलेले वरीचे तांदूळ, चवीनुसार मीठ व पाणी घालून भांड्यावर झाकण ठेवून वरीचा पुलाव शिजवून घ्यावा.
मिक्सर न वापरता करा हिरवीगार इन्स्टंट हिरवी चटणी, एक आयडिया भन्नाट मिनिटांत चटणी रेडी...
आपला उपवासाचा वरीचा पुलाव खाण्यासाठी तयार आहे. हा गरमागरम वरीचा पुलाव दही किंवा शेंगदाण्याच्या उसळ सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.