थंडी म्हटल्यावर गरमागरम चहा नाहीतर कॉफी हवीच. यातही स्ट्रॉंग कॉफीची मजा काही औरच. घशाला आराम मिळण्यासाठी आणि शरीराला थोडा वेळ का होईना ऊब मिळावी यासाठी कडक कॉफी प्यायल्यावर हायसे वाटते. ऐन थंडीत तरतरी देणाऱ्या या कॉफीत फिल्टर कॉफी, इन्स्टंट क़ॉफी आणि ब्लॅक कॉफीसारखे इतरही अनेक प्रकार असतात. तुम्हीही नियमित कॉफी घेत असाल आणि या कॉफीचा शरीराला फायदा व्हावा असे वाटत असेल तर त्यात काही गोष्टी आवर्जून घालायला हव्यात. पाहूयात कॉफी कोणत्या गोष्टींबरोबर घेतल्यास त्याचा नेमका काय फायदा होतो...
१. दालचिनी - कॉफी सर्व्ह करण्याआधी त्यावर थोडी दालचिनीची पूड भुरभुरल्यास तुम्हाला मस्त सुटीचा आनंद मिळेल. तुम्ही कॉफीच्या बिया ग्राईंड करुन ताजी कॉफी करणार असाल तर त्यातच थोडी कच्ची दालचिनी घातल्यास कॉफीला मस्त फ्लेवर येईल. यामुळे दालचिनीचा मस्त स्वाद तर येईलच पण कॉफी स्मूद होण्यासही मदत होईल.
२. चॉकलेट - थंडीच्या दिवसात कोको फ्लेवर म्हणजे सुख. कॉफी विथ चॉकलेट हा कॉलेजगोईंग तरुणतरुणींमध्ये अतिशय लोकप्रिय असणारा प्रकार. त्यामुळे कॉफीमध्ये सिल्की मिल्क चॉकलेट घातल्यास कॉफीला झकास फ्लेवर येईल. हे चॉकलेट तुमच्या कॉफीत हळूहळू मेल्ट होईल आणि त्याचा मस्त फ्लेवर उतरेल. त्यामुळे तुम्हाला थंडीच्या दिवसांत मूड फ्रेश करायचा असेल तर कॉफी विथ चॉकलेट नक्की ट्राय करा.
३. आलं - चहामध्ये आलं घातल्यानंतर जसा त्याचा छान फ्लेवर येतो. त्याचप्रमाणे कॉफीमध्येही आल्याचा फ्लेवर अतिशय मस्त लागतो. आलं उष्ण असून त्यामध्ये एनर्जी देणारे गुणधर्म असतात ज्यामुळे थंडीच्या दिवसांत शरीराला गरम ठेवण्यासाठी त्याची मदत होते. आलं हा सहज उपलब्ध होणारा पदार्थ असून तुम्ही आलं घातलेली कॉफी नक्की ट्राय करु शकता. आरोग्यासाठीही थंडीच्या दिवसांत आलं अतिशय चांगले काम करत असल्याने ते फायदेशीर ठरते.
४. पेपरमिंट - हिवाळ्यात कँडी कॅनसारखा दुसरा घटक नाही. कॉफीमध्ये तुम्ही पेपरमिंट घातले तर कॉफीच्या एका आगळ्यावेगळ्या फ्लेवरचा तुम्ही नक्कीच आनंद घेऊ शकाल. यात कॉफी, क्रिम आणि पुदिन्याची पाने घातल्यास तुमची कॉफी आणखीच मस्त होईल. तेव्हा अशाप्रकारची कॉफी तुम्ही नक्की ट्राय करुन बघा.