Lokmat Sakhi >Food > कपभर गव्हाचे पीठ आणि गूळ, करा पारंपरिक गोड कडाकण्या, अष्टमीला खास नैवेद्य

कपभर गव्हाचे पीठ आणि गूळ, करा पारंपरिक गोड कडाकण्या, अष्टमीला खास नैवेद्य

Festival Special Sweet Kadakani recipe using wheat flour and Jaggery : नवरात्रीत गुळाच्या कडाकण्यांचा दाखवा देवीला नैवैद्य, पाहा सोपी कृती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2023 11:31 AM2023-10-20T11:31:24+5:302023-10-20T11:32:33+5:30

Festival Special Sweet Kadakani recipe using wheat flour and Jaggery : नवरात्रीत गुळाच्या कडाकण्यांचा दाखवा देवीला नैवैद्य, पाहा सोपी कृती..

Festival Special Sweet Kadakani recipe using wheat flour and Jaggery | कपभर गव्हाचे पीठ आणि गूळ, करा पारंपरिक गोड कडाकण्या, अष्टमीला खास नैवेद्य

कपभर गव्हाचे पीठ आणि गूळ, करा पारंपरिक गोड कडाकण्या, अष्टमीला खास नैवेद्य

नऊ दिवस जल्लोषात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे नवरात्र (Navratri). या नऊ दिवसात देवीला नऊ प्रकारचे नैवद्य तयार करून अर्पण केले जाते. नवरात्रीत सातव्या किंवा आठव्या दिवशी कडकण्यांचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. कडकण्यांची माळ तयार करुन ती माळ काही लोक घटाला देखील बांधतात. या कडाकण्या चवीला खुसखुशीत - कुरकुरीत लागतात.

आपण साखरेच्या गोड कडाकण्या खाल्ल्याच असतील, पण कधी गुळाच्या कडाकण्या करून पाहिलं आहे का? गुळाच्या कडाकण्या चवीला तर भन्नाट लागतातच, शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर असते. या कडाकण्या डायबिटिजग्रस्त रुग्ण देखील खाऊ शकता. चला तर मग गुळाच्या कडाकण्या कशा करायच्या पाहूयात(Festival Special Sweet Kadakani recipe using wheat flour and Jaggery).

गुळाच्या कडाकण्या करण्यासाठी लागणारं साहित्य

२ वाटी गव्हाचं पीठ

अर्धा कप बेसन

अर्धा कप गुळ

अर्धी वाटी पाणी

तेल

अर्धा कप मैदा-रव्याच्या करा पारंपारिक कडाकण्या, नवरात्रात कडाकण्यांचा पारंपरिक नैवैद्य

मीठ

हळद

कृती

सर्वप्रथम, एका भांड्यात अर्धी वाटी कोमट पाणी घ्या, त्यात अर्धी वाटी गुळ घालून पाण्यात मिक्स करा. कोमट पाण्यामुळे गुळ त्यात पटकन विरघळतो. नंतर चहाच्या गाळणीत गुळाचे पाणी गाळून घ्या. एका परातीत २ कप गव्हाचं पीठ घ्या, त्यात अर्धा कप बेसन, चवीनुसार मीठ आणि चिमुटभर हळद घालून साहित्य एकत्र मिक्स करा.

रवा बटाट्याची इडली कधी खाल्ली आहे? डाळ तांदूळ न भिजवता - न आंबवता करा झटपट इडली

नंतर त्यात ४ चमचे तेल घालून चमच्याने मिक्स करा. सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर त्यात गुळाचे पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ मळताना आपण त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता. पीठ मळून झाल्यानंतर त्यावर एक चमचा तेल घालून ग्रीस करा. ३० मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा. जेणेकरून कणकेच्या कडाकण्या खुसखुशीत तयार होतील. ३० मिनिटानंतर हाताला थोडे तेल लावून पुन्हा कणिक मळून घ्या. त्यानंतर कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करा. व पातळ पुरीप्रमाणे लाटून घ्या.

दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात पुरी सोडून दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे गुळाच्या कडाकण्या खाण्यासाठी रेडी.

Web Title: Festival Special Sweet Kadakani recipe using wheat flour and Jaggery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.