Lokmat Sakhi >Food > ज्वारी-बाजरी-नागलीची भाकरी करता येत नाही? मग करा झटपट फुलके, करायला सोपे आणि पौष्टिक.

ज्वारी-बाजरी-नागलीची भाकरी करता येत नाही? मग करा झटपट फुलके, करायला सोपे आणि पौष्टिक.

Finger Millet & Pearl Millet Phulka Recipe : नाचणी व बाजरीमधील पोषक तत्व हवी असतील पण त्यासाठी भाकरी खायची नसेल तर तुम्ही झटपट होणारे नाचणी व बाजरीचे फुलके तयार करू शकता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2023 02:23 PM2023-01-06T14:23:45+5:302023-01-06T14:30:38+5:30

Finger Millet & Pearl Millet Phulka Recipe : नाचणी व बाजरीमधील पोषक तत्व हवी असतील पण त्यासाठी भाकरी खायची नसेल तर तुम्ही झटपट होणारे नाचणी व बाजरीचे फुलके तयार करू शकता.

Finger Millet & Pearl Millet Phulka Recipe...easy to make and nutritious. | ज्वारी-बाजरी-नागलीची भाकरी करता येत नाही? मग करा झटपट फुलके, करायला सोपे आणि पौष्टिक.

ज्वारी-बाजरी-नागलीची भाकरी करता येत नाही? मग करा झटपट फुलके, करायला सोपे आणि पौष्टिक.

उत्तर भारतात जास्त बनविला जाणारा फुलका हा पोळीचा प्रकार ताजा व गरम गरम खायला खूपच छान लागतो. कोणत्याही कोरड्या किंवा ओल्या भाज्यांबरोबर किंवा उसळी व डाळीबरोबर फुलका हा झटपट बनविता येणारा पदार्थ आहे. फुलका हा प्रामुख्याने गहू किंवा मैदा यांच्या पीठाने बनतो.  बदलत्या जीवनशैली नुसार आपल्यापैकी काहीजण हेल्थ कॉन्शियस झाले आहेत. असे लोक आपल्या खाण्याचा बाबतीत काटेकोर असतात. आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गहू किंवा मैदा यांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना नाचणी व बाजरी हे उत्तर पर्याय आहेत. नाचणी व बाजरीची भाकरी ही एकेकाळी आपल्या जेवणाचा मुख्य भाग होती. पण, आता भाकरी म्हणजे फार दिवसांनी एकदा होणारा पदार्थ असे म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही. भाकरी पेक्षा पोळी किंवा फुलका लवकर बनतो म्हणून आपण सरसकट रोजच्या स्वयंपाकात फुलका व पोळीच बनवायला  लागलो. नाचणी व बाजरीच्या सेवनाने आपल्या शरीरास  मॅग्नेशियम, फॉस्फरस सारखे अनेक पोषक घटक मिळतात. जर तुम्हाला नाचणी व बाजरीमधील पोषक तत्व हवी असतील पण त्यासाठी भाकरी खायची नसेल तर तुम्ही झटपट होणारे नाचणी व बाजरीचे फुलके तयार करू शकता. हे फुलके अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या आणि वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक ठरतात. नाचणी व बाजरीचे फुलके कसे बनवायचे याची साहित्य व कृती समजून घेऊयात(Finger Millet & Pearl Millet Phulka Recipe).

a.l.i.g.n_ या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत, नाचणी व बाजरीचा फुलका कसा बनवायचा याचे साहित्य व कृती दिले आहे. 

नाचणीचा फुलका बनविण्याचे साहित्य - 

१. नाचणीचे पीठ - १ टेबलस्पून 
२. अळशीच्या बियांची पावडर -  १ टेबलस्पून 
३. गरम पाणी - १/८ कप 
४. मीठ - चवीनुसार 

बाजरीचा फुलका बनविण्याचे साहित्य - 

१. बाजरीचे पीठ - १ टेबलस्पून 
२. अळशीच्या बियांची पावडर -  २ टेबलस्पून 
३. गरम पाणी - १/८ कप 
४. मीठ - चवीनुसार 

कृती - 

१. एका भांड्यात नाचणीचे पीठ व अळशीच्या बियांची पावडर एकत्रित करून घ्या. यात चवीनुसार मीठ घाला. गरजेनुसार पाणी घालून कणीक मळून घ्या. 
२. कणीक मळून झाल्यानंतर त्याचे गोल फुलके लाटून घ्या. फुलके लाटून घेताना बटर पेपर किंवा अल्युमिनियम फॉईलवरच लाटा. यामुळे ते खाली चिटकणार नाहीत.  
३. गरम तव्यावर पोळीप्रमाणे भाजून घ्या. 

टीप :- नाचणीचे फुलके बनविण्याची जी कृती आहे तीच कृती वापरून आपण बाजरीचे फुलके बनवू शकतो. 

सर्व्ह करताना - 
१. नाचणी व बाजरीचे फुलके सर्व्ह करताना त्यावर आवडीनुसार तुपाची धार सोडा. 
२. थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भाजी ऐवजी गुळासोबत हे फुलके खाऊ शकता.

नाचणी आणि बाजरीचे फुलके अजून वेगळे साहित्य आणि वेगळ्या कृतीने सुद्धा बनवता येतात. त्यासंदर्भातील व्हिडीओ पाहुयात. 

 

Web Title: Finger Millet & Pearl Millet Phulka Recipe...easy to make and nutritious.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न