मलायका अरोरा ही फिटनेसबाबत तरुणींची, महिलांची आयकॉन बनली आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर मलायकानं व्यायामाबाबतची कोणती पोस्ट टाकली यासाठी फॉलोअर्सना प्रचंड उत्सुकता असते. फिटनेसबद्दल शिस्तशीर असलेली मलायका खाण्याबाबतही किती नियम पाळत असेल असं एखाद्याला वाटू शकेल. पण मलायकाच्या इन्स्टाग्रामवरील फिटनेसबाबतच्या पोस्ट जशा व्हायरल होतात तशाच फूडसंबंधीच्या पोस्टही व्हायरल होतात. आपल्या खाण्या पिण्याच्या आवडीबद्दल मलायका सतत काहीना काही पोस्ट करत असते. या तिच्या फूडवरील पोस्टवरुनच मलायका ही खवय्यी आहे हे कळतं. मलायकाला खाण्याबाबत वेगन फूडबद्दल लळा आहे. पण एक फूडी म्हणून ती विविध पदार्थांचा आस्वाद घेते आणि त्याबद्दलच्या पोस्ट आपल्या 14 मिलियन फॉलोअर्ससोबत नियमित शेअर करते.
Image: Google
मलायकाला काय आवडत?
शनिवार रविवार मलायका डोनेटस आणि केकचा मनमुराद आनंद घेते. सुशी हा जपानी पदार्थ (सुशी म्हणजे व्हिनेगारयुक्त भाताचे बॉल्स किंवा रोल्स असतात आणि त्यासोबत भाज्या आणि सी फूड असतं.) तिला आवडतो. त्यामुळे सुशी खाल्लाशिवाय मलायकाचा विकेण्ड साजरा होतच नाही. मुळातच मलायकाची जीवनशैली अतिशय र्शीमंत आहे. ही श्रीमंती तिच्या खाण्याच्या आवडीमधे डोकावतेच. त्यामुळे ऐकणार्याला विचित्र वाटतील, महागडे वाटतील असे पदार्थ मलायकाच्या आवडत्या पदार्थांच्या यादीत असतात . पण याचा अर्थ असा नाही की मलायकाला घरंचं जेवण आवडतंच नाही. भलेही तिच्या आवडीच्या पदार्थांमधे इतरांना अनोळखी वाटतील असे पदार्थ असले तरी तिच्या या यादीची सुरुवात मात्र ती ‘घर का खाना’ यानेच करते. घरी तयार केलेलं जेवण हे तिचं सर्वात आवडतं फूड आहे. या पदार्थांमधे पौष्टिक रोल पासून आईच्या पध्दतीच्या आमटीपर्यंत अनेक पदार्थांंचा समावेश आहे. मलायकाच्या आवडीच्या घरगुती पदार्थांंमधे दाक्षिणात्य पदार्थांंचाही समावेश आहे. एखाद्या वीकेंण्डला संपूर्ण केरळी पदार्थांंचा समावेश तिच्या जेवणात असतो. अनेक वेगळ्या पण सोप्या पदार्थांची ओळखही मलायका करुन देते. त्यामुळे मलायका आपल्या फूडच्या पोस्टमधे काय टाकते याकडेही खवय्या मलायका ही तिची ओळख माहित असणार्यांची नजर असते.
Image: Google
मलायकाचा घरचा डबा
मलायकाने इन्स्टावर नुकतीच तिच्या होममेड डब्याची पोस्ट टाकली. त्या पोस्टमधील फोटोत जे दिसतं ते पाहून सुशी खाण्याची आवड असणारी हीच का ती मलायका? असा प्रश्न पडतो. या फोटोत. मलायकाच्या डब्यात चार पदार्थ दिसतात. एक म्हणजे कोबीची भाजी. कोबीची भाजी ही हिवाळ्यातली तिची आवडीची भाजी आहे. एकतर या भाजीत फायबरचं प्रमाण जास्त असून कॅलरीज कमी असतात. शिवाय जीवनसत्त्वं आणि अँण्टिऑक्सिडण्टस असलेल्या या भाजीला मलायका 'सूपर फूड' म्हणते.
मलायकाच्या डब्यात दुसरा पदार्थ दिसतो तो म्हणजे चवळीची आमटी. चवळीमध्ये कॅल्शिअम आणि लोह हे घटक तर असतातच पण चवळीची अंगभूत चव मलायकाला आवडते. मसालेदार जेवणाचा फील आणण्यासाठी ही आमटी मसालेदार करुन भातासोबत आस्वाद घेता येतो असं मलायका म्हणते. मलायकासोबतच इतर सर्व खवय्ये किंवा खवय्ये नसलेल्यांचीही आवडती भाजी म्हणजे बटाट्याची भाजी, हा मलायकाच्या डब्यातला तिसरा पदार्थ. मलायका म्हणते घरुन डबा आणायचा असेल तर डब्यात बटाट्याची भाजी असायलाच हवी. मलायकाच्या डब्यातला चौथा पदार्थ म्हणजे भाज्यांचा पुलाव. आपला घरचा डबा हा चव आणि पौष्टिकता यांचा मेळ घालणारा असल्याने तो आपल्याला पूृर्वीही आवडायचा, आताही आवडतो आणि पुढेही आवडेल असं मलायका सांगते.
Image: Google
मलायका आणि स्वयंपाक?
खाण्याची आवड असणार्या मलायकाला स्वयंपाक येतो का? असं कुतुहल तिच्या फॉलोअर्सना होतंच. एका मुलाखतीत तिने आपल्या स्वयंपाककलेबद्द्लही सांगितलं आहे. मलायका म्हणते, ‘पूृर्वी मला फक्त खायलाच आवडायचं. स्वयंपाक जमायचा नाही. पण एक दिवस मुलगा शाळेतून आला आणि मला तक्रारीच्या सूरात म्हणाला, ‘शाळेत मुलांच्या डब्यात त्यांच्या आईनं तयार केलेले टेस्टी पदार्थ असतात पण तुला तर स्वयंपाकच येत नाही!’ मग त्याला दाखवून देण्यासाठी मीही स्वयंपाक शिकले.’ आता आपल्यला उत्तम स्वयंपाक जमतो हे सांगणार्या मलायकाला भाज्या निवडणं आणि कापणं मात्र आवडत नाही. पण विविध गोष्टी एकत्र करुन वेगवेगगळ्या चवीचे पदार्थ करायला तिला आवडतं. ती स्वत्: जेव्हा काही करते तेव्हा नेहमीच्या पदार्थांंना मॉर्डन टच देऊन ते पदार्थ स्टायलिश आणि रुचकर करण्यावर मलायकाचा भर असतो.
घरच्या जेवणाची आवड जपणारी मलायका प्रवासात असते तेव्हा फास्ट फूडपेक्षा फळं आणि सुकामेवा जवळ बाळगते. स्वयंपाकघरातील तुझ्या आवडीच्या तीन गोष्टी कोणत्या असं विचारलं तर ती हळद, कोरफडचा गर आणि डार्क चॉकलेट सांगते. हे घटक नुसते खायचे. यामुळे त्वचेसोबतच आपले केसही छान राहातात असं मलायका जेव्हा सांगते तेव्हा खाताना देखील तिच्या डोक्यात फिटनेस आणि लूकचा विचार असतोच हे मात्र प्रामुख्याने लक्षात येत.