भारतीय अन्नपदार्थांमध्य भाताचे खास महत्व आहे. खासकरून भारतात असं कोणतंही घर नसेल जिथे भात शिजत नाही. सर्वाधिक घरांमध्ये लोक कुकरमध्ये भात बनवतात तर काहीजण पातेल्यात. दोन्ही प्रकारे बनवलेल्या भाताची चव आणि सुगंध वेगवेगळा असतो. (Fluffy White Rice Recipe) कढईमध्ये तुम्ही फक्त साधा भात नाही तर जीरा राईस आणि वेगवेगळ्या प्रकारचे भात बनवू शकता. कढईमध्ये भात खाण्याची इच्छा तुमची सतत होईल. (How to make soft white rice in rice cooker)
पातेल्यात भात बनवण्याची योग्य पद्धत
कढईमध्ये भात बनवण्यासााठी सगळ्यात आधी भात व्यवस्थित धुवून घ्या आणि नंतर १ तासासाठी भिजवण्यासाठी ठेवा. जेव्हा तांदूळ व्यवस्थित भिजवले जातील तेव्हा, गॅसवर पातेलं ठेवून त्यात गरम तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात जीरं, लवंग, दालचिीनीचा तुकडा आणि काळी मिरीचे ३ दाणे घाला. व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात मीठ मिसळा आणि तांदूळ घाला.
पाणी योग्य प्रमाणात घाला अन्यथा तांदूळ जास्तच ओलसर दिसतील. गॅस मंद आचेवर ठेवून कढईवर झाकण ठेवा. १० मिनिटांनी तपासून पाहा तांदूळ व्यवस्थित शिजले आहेत की नाही. गॅस करून कमी त्यात चिरलेला कढीपत्ता घाला.
प्रेशर कुकरमध्ये भात बनवण्याची पद्धत
कमी वेळात भात बनण्याचा बेस्ट ऑपश्न म्हणजे प्रेशर कुकरमध्ये भात तयार करणं. लवकर जेवण बनवण्यासाठी प्रेशर कुकर उत्तम आहे. प्रेशर कुकरमध्ये दबाब निर्माण करण्यासाठी जेवण पटापट बनवण्यासाठी वापरला जातो. कुकर आतून वाफ सील करतो आणि अन्न पटकन शिजते. यासाठी सर्वप्रथम प्रेशर कुकर घ्या, त्यात तांदूळ आणि पाणी मिसळा. पाणी आणि तांदूळ यांचे प्रमाण नेहमी बरोबर ठेवा. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक कप तांदूळ घेतला असेल तर त्यात 1.5 कप पाणी ठेवा. प्रेशर कुकरमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी कधीही ठेवू नका. चवीनुसार भातामध्ये एक चमचा तूप, ऑलिव्ह ऑईल किंवा तुमच्या आवडीचे तेल घाला.
भात बनवण्याची चौथी पद्धत
भात बनवताना भांडे चांगले झाकून ठेवा आणि पाणी उकळायला लागल्यावर झाकण काढून भात शिजवा. मध्येमध्ये तपासत राहा नाहीतर तांदूळ भिजण्याची शक्यता आहे.
तांदूळ भिजवून ठेवा
तांदूळ धुतल्यानंतर ते एका मोठ्या भांड्यात तासभर भिजत ठेवावेत. आयुर्वेदात असे मानले जाते की तांदूळ, डाळी, काहीही बनवण्यापूर्वी पाण्यात भिजवल्यास त्यातील पोषक घटकांची संख्या वाढते.