Lokmat Sakhi >Food > एकदम मऊसूत आणि फुगलेली चपाती खायला हवीय? पीठ मळताना 'या' ४ स्टेप्स करा फॉलो

एकदम मऊसूत आणि फुगलेली चपाती खायला हवीय? पीठ मळताना 'या' ४ स्टेप्स करा फॉलो

काही सोप्या स्टेप्स फॉलो करा ज्यामुळे तुमच्या चपात्या मऊ होतील आणि जेवणाचा आनंदही द्विगुणित होईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:17 IST2025-02-24T18:16:14+5:302025-02-24T18:17:04+5:30

काही सोप्या स्टेप्स फॉलो करा ज्यामुळे तुमच्या चपात्या मऊ होतील आणि जेवणाचा आनंदही द्विगुणित होईल.

follow these 4 steps while kneading the dough you will get very soft and fluffy rotis | एकदम मऊसूत आणि फुगलेली चपाती खायला हवीय? पीठ मळताना 'या' ४ स्टेप्स करा फॉलो

एकदम मऊसूत आणि फुगलेली चपाती खायला हवीय? पीठ मळताना 'या' ४ स्टेप्स करा फॉलो

गरम, मऊसूत आणि फुगलेल्या चपात्या खायला सर्वांनाच आवडतात. चपाती कडक असेल तर ती चावण्यासाठी त्रास होऊ शकतो. विशेषत: जेव्हा पीठ व्यवस्थित मळलेलं नसतं तेव्हा असं घडतं. अशा वेळी काही सोप्या स्टेप्स फॉलो करा ज्यामुळे तुमच्या चपात्या मऊ होतील आणि जेवणाचा आनंदही द्विगुणित होईल.

पीठ कसं मळायचं?

- जर तुम्हाला मऊ चपाती बनवायची असेल तर ते पीठ कोमट पाण्याने चांगलं मळून घ्या. 

- पीठ मळताना मीठ घातल्यास चपाती मऊ तर होईल, शिवाय चविष्टही लागेल.

- पीठ मळल्यानंतर लगेच चपात्या लाटू नका. ते पीठ थोडा वेळ तसेच ठेवा. प्लेट किंवा कपड्याने झाकून ठेवा. यानंतर चपाती बनवा. यामुळे ती मऊ होईल आणि खातानाही मजा येईल. 

- तवा आधी चांगला गरम करून घ्या आणि नंतर चपाती तव्यावर ठेवा. यामुळे चपाती चांगली शेकली जाते. त्यानंतर चपात्या नेहमी नीट झाकून ठेवा.

शिळी चपाती खाण्याचे फायदे 

- शिळी चपाती खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते, पोट साफ होतं आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून सुटका होते.

-  शिळ्या चपातीचा जीआय (GI- glycemic index) खूप कमी असतो.

- ज्यांना आतड्यांशी संबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे. 

-  तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील हे चांगलं आहे.

- शिळी चपाती कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकते.

Web Title: follow these 4 steps while kneading the dough you will get very soft and fluffy rotis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.