पावसाळा म्हटलं की एक सोडून अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. पावसाळ्यात होणारे फंगल इंन्फेक्शन्स, कपडयांना येणारा कुबट वास, घरातील लाकडी वस्तूंना लागणारी बुरशी, साठवणीचे पदार्थ खराब होणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यातील आर्द्रता, दमट वातावरण, ओलावा यांसारख्या वातावरणातील बदलांमुळे साठवणीच्या पदार्थांची विशेष काळजी घ्यावी लागते.
पावसाळ्यात साठवणीच्या पदार्थांबरोबरच आपल्या रोजच्या वापरातील अन्नपदार्थांना देखील बुरशी किंवा त्यात अळ्या, पोरकिडे होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात जर साठवणीच्या पदार्थांना अशा प्रकारे बुरशी आली किंवा पोरकिडे आले तर असे पदार्थ फेकून द्यावे लागतात. हे पदार्थ फेकून दिल्याने अन्नपदार्थांची नासाडी तर होतेच, सोबतच पैसेही वाया जातात. अशावेळी नेमके काय करावे हे सुचत नाही. रोजच्या वापरातील रवा, बेसन, तांदूळ, गव्हाचे पीठ, पोहे यांसारख्या अन्नपदार्थात पोरकिडे किंवा बुरशी होऊ नये म्हणून काही सोपे घरगुती उपाय, लक्षात ठेवूयात(Follow these easy home remedies to prevent semolina, maida and gram flour from getting worms).
साठवणीच्या अन्नपदार्थांना अळ्या, पोरकिडे, बुरशी लागू नये म्हणून...
१. पोहे :- पोहे आपण बरेचदा रोजच्या नाश्त्याला लागतात म्हणून पोहे घरात एकदमच आणून साठवून ठेवतो. अशावेळी पोहे बरेच दिवस तसेच ठेवल्याने त्यात पोरकिडे होण्याची शक्यता असते. अशावेळी पोह्यांमध्ये पोरकिडे होऊ नये म्हणून त्यात २ ते ३ तमालपत्राची पाने घालावीत. तसेच पोहे एका हवाबंद डब्यांत स्टोअर करून ठेवावेत, यामुळे पोह्यांमध्ये पोरकिडे होणार नाहीत.
विरजण न लावता १० मिनिटांत घरी दही करण्याची भन्नाट ट्रिक...
२. बेसन :- बेसनमध्ये पोरकिडे तयार होऊन ते खराब होऊ नये म्हणून बेसन नेहमी हवाबंद डब्यांत भरून फ्रिजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवावे. याचबरोबर बेसनमध्ये सुकलेली कडुलिंबाची पाने घालावीत जेणेकरून त्यात पोरकिडे किंवा अळ्या होणार नाहीत. कडुलिंबाच्या पानांसोबतच आपण त्यात तमालपत्र देखील घालू शकता.
गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!
३. रवा :- रवा खराब होऊ नये किंवा त्यात पोरकिडे होऊ नयेत म्हणून रवा नेहमी भाजून एका हवाबंद डब्यांत भरून मग तो फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवावा. यासोबतच एक टिश्यू पेपरचा छोटा तुकडा घेऊन त्यात दालचिनीच्या २ काड्या व ३ ते ४ छोट्या वेलची घेऊन त्याची एक छोटी पुरचुंडी बनवून ती रव्याच्या डब्यांत ठेवावी. यामुळे दालचिनी, वेलचीच्या वासाने रव्यात पोरकिडे होत नाहीत व महिनोंमहिने रवा चांगला टिकून राहतो.
फक्त १० मिनिटांत घरीच करा हलका-जाळीदार ढोकळा, मिश्रण न फेटता, न आंबवता करा ढोकळा...
साजूक तूप करण्यासाठी साय साठवण्याच्या ५ सोप्या टिप्स, तूप होईल शुभ्र- रवाळ...
३. तांदूळ :- बहुतेकवेळा आपण तांदूळ रोजच्या जेवणात लागतो म्हणून एकदम वर्षभरासाठी साठवून ठेवतो. परंतु असा साठवलेला तांदूळ काही कालांतराने खराब होऊन त्यात पोरकिडे व अळ्या होतात. असे होऊ नये म्हणून तांदूळ ओलावा असणाऱ्या जागेपासून दूर साठवून ठेवावेत तसेच तांदुळाच्या डब्यामध्ये ३ ते ४ सुक्या मिरच्या घालाव्यात यामुळे तांदुळामध्ये पोरकिडे तयार होत नाहीत. लाल सुक्या मिरच्यांसोबतच आपण यात सुकलेली कडुलिंबाची पाने देखील घालू शकता.
४. गव्हाचे पीठ :- गव्हाच्या साठवलेल्या पिठात पोरकिडे अळ्या होऊ नयेत म्हणून त्यात तमालपत्राची २ ते ४ पाने घालावीत. यासोबतच पीठ एका हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवावे. जर गव्हाचे पीठ किड्यांपासून वाचवायचे असेल तर आपण त्यात मीठ मिसळा, उदाहरणार्थ, जर पीठ १० किलो असेल तर त्यात चार ते पाच चमचे मीठ मिसळा. असे केल्याने पिठात किडे येणार नाहीत आणि ते पूर्णपणे ताजे राहील. यासोबतच जेव्हा आपण पीठ साठवाल तेव्हा डब्यात लवंग टाकण्याचा प्रयत्न करा.
घरच्याघरी करा परफेक्ट ढोकळा प्रिमिक्स, १० मिनिटांत लुसलुशीत ढोकळा तयार ! पीठ टिकते ६ महिने...