Lokmat Sakhi >Food > कुकरची गॅस्केट वारंवार खराब होते, कुकर धड होत नाही? ५ टिप्स- कुकरच्या शिट्ट्या होतील पटपट...

कुकरची गॅस्केट वारंवार खराब होते, कुकर धड होत नाही? ५ टिप्स- कुकरच्या शिट्ट्या होतील पटपट...

Tips & Tricks To Use Loose Gasket Of Pressure Cooker : गॅस्केट सैल झाली की कुकरमधून पाणी उडते, भात-डाळ शिजत नाही, त्यावर हे झटपट उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2023 10:04 PM2023-03-17T22:04:28+5:302023-03-17T22:30:57+5:30

Tips & Tricks To Use Loose Gasket Of Pressure Cooker : गॅस्केट सैल झाली की कुकरमधून पाणी उडते, भात-डाळ शिजत नाही, त्यावर हे झटपट उपाय

Follow these methods when the gasket of the cooker is loose, the gasket will be tight in minutes | कुकरची गॅस्केट वारंवार खराब होते, कुकर धड होत नाही? ५ टिप्स- कुकरच्या शिट्ट्या होतील पटपट...

कुकरची गॅस्केट वारंवार खराब होते, कुकर धड होत नाही? ५ टिप्स- कुकरच्या शिट्ट्या होतील पटपट...

स्वयंपाक करताना आपल्याला किचनमधील काही भांडी ही दररोज न चुकता वापरली जातात. स्वयंपाकघरात कुकरचा वापर दररोज केला जातो. डाळ आणि तांदूळ यासारख्या सामान्य पदार्थापासून ते विशेष पदार्थ तयार करण्यापर्यंत, बहुतेक लोक फक्त प्रेशर कुकरच वापरतात. प्रेशर कुकर हा प्रत्येकाच्याच किचनचा अविभाज्य भाग आहे. प्रेशर कुकरचा वापर केल्याने जेवण बनविण्यासाठी लागणारा वेळही वाचतो आणि मेहेनतही कमी लागते. प्रेशर कुकरचा वापर कमी वेळात अन्न लवकर शिजविण्यासाठी केला जातो. असा हा सोयीस्कर प्रेशर कुकर इंधनाची देखील बचत करतो. 

प्रेशर कुकर जर नीट वापरला नाही तर तो लवकर खराब होतो. काहीवेळा प्रेशर कुकरची शिट्टी, प्रेशर कुकरचे झाकण, गॅस्केट (रबर) यांसारख्या कुकरशी संबंधित उपकरणांमध्ये बिघाड झाला की, प्रेशर कुकर नीट काम करत नाही. काहीवेळा शिट्टी व्यवस्थित होत नाही, कुकरचे रबर सैल होते त्यामुळे आपल्याला  स्वयंपाक करताना त्रास होऊ लागतो. कुकरमध्ये पदार्थ पटकन आणि चवदार बनतात परंतु कुकरच्या सैल रबरामुळे अन्न शिजण्यास खूप वेळ लागतो. अशा परिस्थितीत, कुकरचे सैल झालेले रबर कसे दुरुस्त करावे हा प्रश्न आपल्याला पडतो. आपण काही सोप्या पद्धती वापरून कुकरचे सैल झालेले रबर घट्ट करू शकतो(Follow these methods when the gasket of the cooker is loose, the gasket will be tight in minutes). 

नक्की काय काय उपाय करता येऊ शकतात? 

१. रबर थंड करुन घ्यावा :- कुकरचे गॅस्केट किंवा रबर सैल झाल्यावर ते घट्ट होण्यासाठी आपण ते रेफ्रिजरेट करू शकता. यासाठी कुकरचा रबर थोड्या वेळासाठी थंड पाण्यांत बुडवून ठेवा. तसेच रबर फ्रीजमध्ये १० ते १५ मिनिटांसाठी ठेवून द्यावा यामुळे रबर घट्ट होतो आणि कुकरच्या झाकणावर सहज बसते.  

२. कणकेचा वापर करा :- कुकरचे रबर सैल झाल्यावर आपण कणिक वापरून तात्पुरता कुकरचा रबर घट्ट करु शकतो. यासाठी कुकरच्या झाकणाभोवती कणकेचा गोळा लावावा आणि त्यानंतर त्यावर रबर बसवून घ्यावा. आता झाकण बंद करावे आणि दाब तयार होईपर्यंत झाकण धरुन ठेवावे. 

३. चिकटपट्टीचा वापर करा :- कुकरचे रबर घट्ट करण्यासाठी, आपण रबराभोवती सेलो टेप लावू शकतो. सेलो टेप लावल्याने, रबर झाकणाला चिकटून राहतो आणि कुकरमध्ये दाब सहज तयार होऊ लागतो. त्याच वेळी, जर रबर खूप सैल असेल तर तो रबर एका बाजूने कापून सुई व धाग्याने शिवू शकता. तसेच, मजबुतीसाठी रबर शिवल्यानंतर त्यावर सेलो टेप लावावी. 

४. तेल वापरा :- कुकरचे रबर सैल झाल्यामुळे व्यवस्थित काम करत नसल्यास त्या रबराला दोन्ही बाजुंनी थोडे तेल लावावे. कुकरचे रबर झाकणाला फिट बसवण्याआधी बोटांच्या मदतीने त्यावर थोडेसे तेल घासून लावावे. या ट्रिकमुळे कुकरचा रबर सैल न पडता झाकणाला व्यवस्थित फिट बसेल.    

५. प्लॅस्टिकच्या रबर बॅंडचा वापर करावा :- कुकरचा रबर जर जास्तच सैल पडला असेल तर अशावेळी आपल्या नॉर्मल लहान प्लॅस्टिकच्या रबर बॅंडचा वापर करावा. प्लॅस्टिकचा रबर बॅंड कापून तो गोलाकार आकारात कुकरच्या रबराच्या दोन्ही बाजूंनी गुंडाळून घ्यावा. यामुळे आपला कुकरचा रबर घट्ट होण्यास मदत होईल. 

कुकरची शिट्टी धड होत नाही, पाणी फसफसून बाहेर उडतं? ३ सोपे उपाय, कुकरचे कारंजे बंद...

कुकरच्या गॅस्केट संबंधित इतर महत्वाच्या टिप्स :- 

१. कुकरचा रबर खराब होऊ नये म्हणून काम झाल्यावर रबर पूर्णपणे स्वच्छ धुण्यास विसरू नये. 

२. भांडी धुताना कुकरचे गॅस्केट डिशवॉशरमध्ये ठेवू नका अन्यथा रबर सैल होऊ लागेल.

३. गॅस्केट सौम्य साबण आणि पाण्याने धुतल्यानंतर, संपूर्णपणे कोरडे होईपर्यंत वाळवून घ्या. 

४. कुकरचे काम झाल्यावर रबर तसाच झाकणात ठेवू नका. 

५. अनेक वेळा कुकर चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास सर्व दाब रबरावर पडून त्यामुळे कुकरचे रबर लवकर खराब होते. त्यामुळे काम झाल्यावर कुकर अशा स्थितीत ठेवावा की जेणेकरुन त्याच्या रबरावर जास्त दाब पडणार नाही. 

६. स्वयंपाक करताना, कुकर नेहमी सरळ आणि सपाट पृष्ठभागावर ठेवा. यामुळे रबर लवकर खराब होणार नाही.

Web Title: Follow these methods when the gasket of the cooker is loose, the gasket will be tight in minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न