Lokmat Sakhi >Food > तांदुळाला किड लागू नये, अळ्या होवू नयेत म्हणून ६ सोपे उपाय, बिंधास्त साठवा वर्षभराचे तांदूळ....

तांदुळाला किड लागू नये, अळ्या होवू नयेत म्हणून ६ सोपे उपाय, बिंधास्त साठवा वर्षभराचे तांदूळ....

Kitchen hacks: Keep bugs away from rice with these simple 6 tips : तांदूळ वर्षभरासाठी विकत घेऊन ठेवायचे की पहिली भीती वाटते अळ्या होण्याची, त्यासाठीचे हे असरदार उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2023 01:58 PM2023-05-02T13:58:35+5:302023-05-02T14:14:35+5:30

Kitchen hacks: Keep bugs away from rice with these simple 6 tips : तांदूळ वर्षभरासाठी विकत घेऊन ठेवायचे की पहिली भीती वाटते अळ्या होण्याची, त्यासाठीचे हे असरदार उपाय...

Follow This Simple Tips To Keep bugs away from rice | तांदुळाला किड लागू नये, अळ्या होवू नयेत म्हणून ६ सोपे उपाय, बिंधास्त साठवा वर्षभराचे तांदूळ....

तांदुळाला किड लागू नये, अळ्या होवू नयेत म्हणून ६ सोपे उपाय, बिंधास्त साठवा वर्षभराचे तांदूळ....

तांदूळ हे आपल्या रोजच्या गरजेच्या अन्नपदार्थांपैकी एक आहे. जवळपास रोजच आपण या तांदळाचा भात करुन रोजच्या जेवणात खातो. रोज लागणारा तांदूळ आपण महिन्याभरासाठीचा एकदम स्टोअर करुन ठेवतो. याउलट कधी कधी तांदूळ कमी दारात मिळाले की आपण ते वर्षभरासाठी घेऊन त्याचा साठा करुन ठेवतो. अशावेळी जर तांदूळ व्यवस्थित पद्धतीने स्टोअर केला गेला नाही तर, तो खराब होऊ शकतो. त्याचबरोबर कधी कधी या तांदळाला किडींचा प्रादुर्भाव लागू शकतो. यामुळे साठवून ठेवलेले तांदूळ लवकर खराब होण्याची शक्यता असते. 

वर्षभरासाठी स्टोअर करुन ठेवलेला तांदूळ हा प्रत्येक वेळी वापरासाठी काढताना तो आपल्याला स्वच्छ करुनच घ्यावा लागतो. ज्यामध्ये बराच वेळही वाया जातो. अशा परिस्थितीत, तांदूळ स्वच्छ करण्याचा प्रयत्न टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते योग्यरित्या स्टोर करून ठेवणे. कोणत्याही ऋतूमध्ये दमटपणामुळे बऱ्याचदा धान्यांना किड लागते. या किड्यांमुळे केवळ धान्यामधील पौष्टिकता कमी होते असं नाही तर त्या धान्याचा स्वादही बिघडतो. विशेषतः तांदळाला जर किड लागली तर संपूर्ण तांदूळ खराब होतो. किड लागल्यामुळे तांदूळ लवकर खराब होतो. म्हणूनच डाळी आणि धान्य हे नेहमी हवाबंद कंटेनरमध्ये ठेवावे.  तसेच तांदूळ खराब होऊ नयेत म्हणून ते सुक्या जागी व्यवस्थित स्टोअर करुन ठेवावेत. ज्यामुळे त्यात दमटपणा निर्माण होत नाही आणि किडही लागत नाही. पण कधी कधी इतकी काळजी घेतल्यानंतरही तांदळाला किड लागते आणि तांदूळ खराब होऊ लागतात. जास्तीचे तांदूळ वर्षभर स्टोअर करुन ठेवण्यासाठी काही सोपे उपाय लक्षात ठेवू(Kitchen hacks: Keep bugs away from rice with these simple tips). 

वर्षभरासाठी तांदूळ न खराब होता स्टोअर करुन ठेवण्यासाठी सोपे उपाय :- 

१. तांदूळ साठवताना त्यात तमालपत्र ठेवा :- तमालपत्र जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरात सर्रास वापरले जाते. पण जेवणाची चव वाढवणारी ही पाने किडे दूर ठेवण्याचेही काम करतात हे आपल्याला सहसा माहित नसते. अशा परिस्थितीत तांदूळ जास्त काळ किटकांपासून सुरक्षित ठेवायचे असेल तर तांदळाच्या डब्ब्यात तमालपत्र अवश्य ठेवा. तांदळाच्या डब्यात तमालपत्र ठेवल्याने तांदूळ वर्षभरासाठी व्यवस्थित स्टोअर करुन ठेवले जातात. यामुळे तांदळाला किड न लागता तांदूळ वर्षभरासाठी चांगले स्टोअर करुन ठेवले जाऊ शकतात. 

गुजराथी कढी पकोड्याची पारंपरिक रेसिपी, मारा फुरका - जेवण होईल मस्त पोटभर...

२. कडुलिंबाची पाने :- कडुलिंबाच्या कडू पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. इतकेच नाही तर त्याचा सुगंध अनेक प्रकारच्या किटकांना दूर ठेवण्याचे काम करतो. अशाप्रकारे, आपण तांदूळ किटकांपासून दूर ठेवण्यासाठी देखील कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकतो. तांदळाच्या डब्यांत १० ते १५ कडुलिंबाची पाने घालून ठेवा. त्यामुळे तांदळामध्ये किडे होत नाहीत, तांदूळ तुम्ही अगदी कितीही वर्षे स्टोर केले तरीही त्यात किडे होत नाहीत. 

३. लाल मिरच्या किंवा लसणांच्या पाकळ्यांचा वापर :- तांदळाचे किटकांपासून ते किडींपर्यंत संरक्षण करण्यासाठी तुम्ही लाल मिरची किंवा लसूण देखील वापरू शकता. यासाठी तांदळाच्या डब्यात ३ ते ४ लाल मिरच्या किंवा न सोललेल्या लसणाच्या पाकळ्या ठेवा. लसूण सुकल्यावर ते काही काळाने सतत बदलत राहा. असे केल्याने तांदळात किडे होत नाहीत आणि ते बराच काळ ताजे राहतात.

थालीपीठ करायचं पण भाजणीचं पीठच नाही? झटपट करा मिक्स पिठांचे खमंग मेथी थालीपीठ, पौष्टिक आणि पोटभर...

४. तांदूळ फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवा :- जर तांदूळ वर्षभरासाठी फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवले तर तांदूळ खराब न होता जास्त काळासाठी चांगले टिकून राहतात. यासाठी सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ हवाबंद डब्यात नीट भरुन ठेवा. नंतर हा डबा फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवा. यामुळे तांदूळ बराच काळ ताजे राहतात, तसेच त्यामध्ये किडही होत नाहीत.  

५. उन्हात वाळवा तांदूळ :- तांदळाला किड न लागण्यासाठी हा सर्वात सोपा आणि पारपंरिक उपाय आहे. जर तांदळाला किड लागली आहे आहे असे लक्षात आल्यावर तांदळाचा डबा एका मोठ्या परातीमध्ये रिकामा करा आणि ही परात उन्हात आणून ठेवा. असं केल्यामुळे किड  आणि त्याची अंडी दोन्ही नष्ट होतात. तुम्हाला तांदूळ जास्त काळासाठी साठवायचे असतील तर तुम्ही जास्त काळ उन्हात ठेऊ नका. अन्यथा तांदूळ तुटण्याची शक्यता असते. 

६. लवंगांचा वापर करावा :-  लवंग ही आपल्या प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात असते. लवंगांच्या जबरदस्त सुगंंधामुळे तांदळास लागलेली किड नष्ट करण्यास मदत मिळते. तुम्ही जर तांदळातून किड काढू इच्छित असाल तर तुम्ही तांदळाच्या डब्यात साधारण १० ते १२ लवंग घालून ठेवा. तांदळाला किड लागली असेल तर ती निघून जाण्यास यामुळे मदत मिळते. जर किड लागली नसेल तर त्यात किड होऊ नये यासाठीही लवंगांचा उपयोग करता येतो. किटाणुनाशक म्हणून लवंगेचा फायदा होतो. केवळ लवंगच नाही तर तांदळाच्या डब्यात तुम्ही लवंग तेलाचे काही थेंब टाकले तरीही तुम्हाला त्याचा फायदा मिळतो.

Web Title: Follow This Simple Tips To Keep bugs away from rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.