हिवाळ्यात आपली पचनशक्ती अतिशय चांगली झालेली असते. त्यामुळे जे आपण खातो ते या दिवसात चांगलं पचतं. म्हणूनच तर शरीर कमविण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम ऋतू आहे, असं मानलं जातं. हिवाळ्याविषयीची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हिवाळ्यात खूप भुक लागते. सकाळचा पहिला चहा झाला की लगेच काहीतरी खावं वाटतं.. दिवसभरही सारखं काही ना काही पोटात टाकावं वाटतं.. अशावेळी आपल्याला आपलं डाएट आठवतं आणि मग आपण असं मध्ये मध्ये खाणं टाळतो.
पण हिवाळ्याच्या (winter food) दिवसांमध्ये भुक वाढलेली असताना अशा पद्धतीने भुक मारणे, काही न खाता उपाशी राहणे चांगले नाही. कारण या दिवसात अन्नाची गरज वाढणे हे अगदी नैसर्गिक आहे. अशामध्ये जर आपण खायला टाळाटाळ करत गेलो, तर मात्र नक्कीच अशक्तपणा येऊ शकतो. म्हणूनच तर दोन जेवणांमधली भुक भागविण्यासाठी हिवाळ्याच्या दिवसात खा आपला होम मेड प्रोटीन बार... म्हणजेच गुळ आणि शेंगदाण्यांचा वापर करून बनविण्यात आलेली गोड, चवदार शेंगदाणा चिक्की... चिक्की म्हणजे हिवाळ्यातला सुपर एनर्जी डोस.. नियमितपणे जर शेंगदाणा चिक्की खाल्ली तर त्याचे भरपूर फायदे होतील. आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनीही याविषयीची एक पोस्ट नुकतीच इन्स्टाग्रामला (instagram) शेअर केली असून हिवाळ्यात चिक्की खाणे किती आरोग्यदायी आहे, हे सांगितले आहे.
कशी करायची शेंगदाणा चिक्कीshengdana or peanut chikki recipe in marathi- शेंगदाणा चिक्की करण्यासाठी आपल्याला २०० ग्रॅम भाजलेले शेंगदाणे, १ मध्यम आकाराची वाटी भरून गुळ आणि १ चमचा तूप असं एवढंच साहित्य लागणार आहे. तुम्हाला चवीत बदल पाहिजे असेल, तुम्ही विलायची पावडर, सुंठ पावडर असं काही टाकू शकता.- चिक्की बनविताना कोणी शेंगदाण्याची सालं काढून टाकतात तर कुणी तशीच राहू देतात. यापैकी तुम्हाला जसं आवडेल तशा पद्धतीचे शेंगदाणे घ्या. - कढईत तुप टाका आणि गुळ फोडून त्यात टाकून पातळ करून घ्या. - गुळ चांगला पातळ झाला की त्यात विलायची पावडर आणि शेंगदाणे टाका. - हे मिश्रण व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या.- आता एका ताटलीला तुपाचा हात फिरवून घ्या. त्यामध्ये कढईतले सारण टाका आणि एखाद्या उचटणे किंवा उलथणे वापरून गरम गरम सारण ताटलीत थापून घ्या.- सारण गार झालं की त्याच्या वड्या पाडा.- चिक्की करण्यासाठी तुमच्या आवडीनुसार अख्खे, अर्धवट कापलेले शेंगदाणे किंवा मग दाण्याचा जाडाभरडा कुट असं काहीही वापरता येतं.
Video Credit- Ruchkar Mejwani. शेंगदाणा चिक्की खाण्याचे फायदे Benefits of eating shengdana or peanut chikki in marathi- शेंगदाणा चिक्कीमध्ये असणारे मोनो सॅचुरेटेड फॅटी ॲसिड कोलेस्टरॉल लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे चिक्की खाल्ल्यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो. - शेंगदाणा चिक्कीतून आपल्याला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई मिळतं. त्यामुळे त्वचा चांगली ठेवण्यासाठीही शेंगदाणा चिक्कीचा उपयोग होतो.- शेंगदाणा चिक्कीमध्ये मोठ्या प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात.- चिक्की खाल्ल्यामुळे डिम्नेशिया, अल्झायमर यासोबतच इतर मेंदू विकाराचा धोकाही कमी हेातो.- झिंक आणि मॅग्नेशियम हे दोन्ही घटक शेंगदाणा चिक्कीतून मोठ्या प्रमाणात मिळतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.