Lokmat Sakhi >Food > ऐकलाय का कधी बिर्याणी पराठा? पाहा, बिर्याणीच्या सारणाचा कसा काय केलाय पराठा

ऐकलाय का कधी बिर्याणी पराठा? पाहा, बिर्याणीच्या सारणाचा कसा काय केलाय पराठा

Stuff Biryani Paratha Recipe: अनेक प्रकारचे पराठे तुम्ही पाहिले असणार, खाल्ले असणार.. पण हा असा पराठा कधी ऐकलाय का? (biryani paratha)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 06:06 PM2022-03-24T18:06:24+5:302022-03-24T18:07:00+5:30

Stuff Biryani Paratha Recipe: अनेक प्रकारचे पराठे तुम्ही पाहिले असणार, खाल्ले असणार.. पण हा असा पराठा कधी ऐकलाय का? (biryani paratha)

Food and Recipe: Have you ever heard of Biryani Paratha? How to make stuff biryani paratha from leftover biryani | ऐकलाय का कधी बिर्याणी पराठा? पाहा, बिर्याणीच्या सारणाचा कसा काय केलाय पराठा

ऐकलाय का कधी बिर्याणी पराठा? पाहा, बिर्याणीच्या सारणाचा कसा काय केलाय पराठा

Highlightsबिर्याणीच्या चवीमध्ये थोडा ट्विस्ट हवा असेल आणि बिर्याणीच्या तोडीसतोड दुसरा एखादा पदार्थ चाखून पाहायचा असेल तर उरलेल्या बिर्याणीपासून हा स्टफ बिर्याणी पराठा एकदा करून बघाच.. 

पराठा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा. पनीर, आलू, चीज असे पराठा तर त्यातल्या त्यात लहान मुलांच्या विशेष आवडीचे. पराठा बनवायचा म्हटलं की मुलांच्या आईही खूष असतात. कारण पराठ्यांच्या माध्यमातून मुले एरवी ज्या भाज्या खायला कंटाळा करतात, त्या भाज्याही आपोआप त्यांच्या पोटात जातात. त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा सकाळी नाश्त्यासाठी पराठा हा मेन्यू नेहमीच हिट ठरतो. आता असाच एक मस्त पराठा बघू या.. स्टफ बिर्याणी पराठा (How to make stuff biryani paratha)...

 

भाताचे प्रकार अनेकांच्या आवडीचे असतात. त्यातल्या त्यात जेव्हा बिर्याणीचा विषय निघतो, तेव्हा तर नाव ऐकूनच अनेकांना बिर्याणी खाण्याचं टेम्प्टेशन होऊ लागतं. आता हीच चवदार बिर्याणी जर उरली तर ती फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्यादिवशी खाल्ली जाते. पण दुसऱ्या दिवशीही तेच खाण्यापेक्षा बिर्याणीच्या चवीमध्ये थोडा ट्विस्ट हवा असेल आणि बिर्याणीच्या तोडीसतोड दुसरा एखादा पदार्थ चाखून पाहायचा असेल तर उरलेल्या बिर्याणीपासून हा स्टफ बिर्याणी पराठा एकदा करून बघाच.. 

 

स्टफ बिर्याणी पराठा तयार करण्याची रेसिपी (Recipe)
ही रेसिपी Priya's Menu - Yum Yum Yummy food for Food lovers या पेजवर शेअर करण्यात आली आहे. बिर्याणी पराठा करण्यासाठी आपल्याला उरलेली बिर्याणी, पराठ्यासाठी नेहमीप्रमाणे भिजवतो तशी कणिक, बारीक चिरलेली कोथिंबीर, पराठ्याला लावण्यासाठी बटर किंवा तूप आणि चवीनुसार मीठ असं एवढंच साहित्य लागणार आहे. बिर्याणीमध्ये भरपूर भाज्या आणि मसाले असतात. त्यामुळे पराठा करताना पुन्हा नव्याने टाकण्याची गरज नाही. केवळ कणिक भिजवताना त्यात गरजेनुसार मीठ टाकावे आणि कणिक भिजवावी.

 

बिर्याणीमध्ये कोथिंबीर टाका आणि सगळी बिर्याणी व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या. त्यातल्या भाज्या, मसाले व्यवस्थित एकजीव करा. आता कणिकेचा लहान गोळा घ्या. तो पुरीएवढा लाटा. आता त्यात बिर्याणीचे सारण भरा. सगळीकडून पुरी व्यवस्थित पॅक करून घ्या. पीठ लावून त्याचा पराठा लाटा. पराठा लाटून झाला की गरम तव्यावर टाकून भाजा. पराठा भाजताना त्याला खालून- वरून बटर किंवा तूप लावा. खरपूस भाजला गेला की खमंग स्टफ बिर्याणी पराठा झाला तयार. गरमागरम बिर्याणी पराठा लाेणचं, बटर, सॉस यासोबत चवदार लागतो.
 

Web Title: Food and Recipe: Have you ever heard of Biryani Paratha? How to make stuff biryani paratha from leftover biryani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.