Lokmat Sakhi >Food > राजा- राणीची जोडी नव्हे, राजा- राणी डोसा! वाचा सोशल मीडियात व्हायरल डोसा गोष्ट

राजा- राणीची जोडी नव्हे, राजा- राणी डोसा! वाचा सोशल मीडियात व्हायरल डोसा गोष्ट

Viral Recipe Of Raja Rani Dosa: डोसा प्रकारातली ही राजा- राणीची जोडी सध्या सोशल मिडियावर (social viral) चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे... तुम्ही पाहिला का राजा- राणी डोसा प्रकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 03:24 PM2022-06-03T15:24:41+5:302022-06-03T15:25:37+5:30

Viral Recipe Of Raja Rani Dosa: डोसा प्रकारातली ही राजा- राणीची जोडी सध्या सोशल मिडियावर (social viral) चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे... तुम्ही पाहिला का राजा- राणी डोसा प्रकार?

Food And Recipe: Have you heard or tasted Raja Rani Dosa? Viral video on social media | राजा- राणीची जोडी नव्हे, राजा- राणी डोसा! वाचा सोशल मीडियात व्हायरल डोसा गोष्ट

राजा- राणीची जोडी नव्हे, राजा- राणी डोसा! वाचा सोशल मीडियात व्हायरल डोसा गोष्ट

Highlightsहा डोसा खायचा असेल तर गुरगावच्या (Gurgaon) गीता काॅलनीतले डोसा सेंटर गाठावे लागेल. 

काही वर्षांपुर्वी डोसा प्रकारात फक्त साधा डोसा आणि मसाला डोसा हे दोन प्रकार बनवले जायचे. साध्या डोसाऐवजी मसाला डोसा मागवला तरी काहीतरी खास वाटायचं. आता त्यात पनीर डोसा, चायनिज डोसा, शेजवान डोसा असे अनेक प्रकार आले आहेत आणि खवय्यांना ते आवडतंही आहेत. आता या सगळ्या डोसा प्रकारांचं एक भन्नाट मिश्रण असलेला राजा- राणी डोसा सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल (viral video) झाला आहे. तुम्ही कधी टेस्ट करून बघितला आहे का अनोखा डोसा प्रकार?

 

हा डोसा तयार करण्याची आणि सर्व्ह करण्याची पद्धत खरोखरंच खूप वेगळी आहे. एकतर डोस्याचा आकार भला मोठा आहे. दुसरं म्हणजे त्यात एवढे वेगवेगळे पदार्थ टाकले आहेत की ते पाहूनच आपण क्षणभर चक्रावून जातो. पण अर्थातच एवढे निरनिराळे पदार्थ असल्यावर डोसा नक्कीच झकास लागत असणार. डोसा तयार करण्याची ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या that.foodygirl_ या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आली आहे. अवघ्या ३ दिवसांपुर्वी शेअर झालेल्या या डोसा व्हिडिओला तब्बल ४ लाखांच्या आसपास व्ह्यूज मिळाले आहेत. हा डोसा खायचा असेल तर गुरगावच्या (Gurgaon) गीता काॅलनीतले डोसा सेंटर गाठावे लागेल. 

 

कसा तयार होतो राजा राणी डोसा?
हा डोसा तयार करण्यासाठी सगळ्यात आधी त्या शेफने तव्याला तेल लावलं, पाणी शिंपडलं. पीठ टाकून ते संपूर्ण तवाभर पसरून घेतलं. नंतर भला मोठा बटरचा गोळा त्यावर ठेवला आणि सगळ्या डोसावरून फिरवला. त्यानंतर डोसाच्या मध्यभागी पत्ताकोबी, सिमला मिरची, टोमॅटो, कांदा अशा सगळ्या भाज्या टाकल्या. त्यावर जवळपास २ ते ३ प्रकारचे वेगवेगळे सॉस आणि तेवढ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या मिरच्या टाकल्या. भरपूर पनीर आणि चीज टाकलं. एवढंच नाही तर मनुका आणि इतर सुकामेवाही टाकला.


 हे सगळं मिश्रण डोसावर असतानाच व्यवस्थित हलवून मॅश करून एकत्र केलं आणि नंतर डोसाभर पसरवलं. यानंतर तव्यावरच डोसाचे चार काप केले. त्यापैकी २ कापांची गुंडाळी करून प्लेटवर मध्यभागी ठेवली आणि त्यावर चेरी लावून सजावट केली. बाकीचे काप प्लेटमध्ये आजूबाजूने ठेवले आणि त्यावर पुन्हा एकदा भरपूर चीज किसून टाकलं. असा हा चटपटीत डोसा त्यांनी खूपच उत्तम प्रकारे सजवून खवय्यांना सर्व्ह केला.. व्हिडिओ पाहून राजा राणी डोसा प्रकार आवडला असेल तर तो तुम्ही घरी नक्कीच ट्राय करून पाहू शकता. 


 

Web Title: Food And Recipe: Have you heard or tasted Raja Rani Dosa? Viral video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.