नवरात्रीत उपवासाचे (navratri fast) पदार्थ सलग ९ दिवस खाताना कधी कधी खूप कंटाळा येऊन जातो. काही तरी चटपटीत, चटकदार खाण्याची इच्छा होते. असं काहीसं खावंसं वाटत असेल किंवा उपवासाच्या थालिपीट, पराठ्यांसोबत तोंडी लावायला काही स्वादिष्ट, झणझणीत पदार्थ पाहिजे असेल तर ही खास उपवासाची खमंग हिरवीगार चटणी (Green Chutney Recipe) करून बघा. ही रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. नवरात्रीच्या उपवासात कोणते पदार्थ चालतात आणि कोणते पदार्थ वर्ज्य असतात, हे प्रत्येक घराच्या प्रथा- परंपरा यावर अवलंबून असते. त्यामुळे ज्यांना नवरात्रीच्या उपवासात कोथिंबीर, पुदिना चालत असेल, त्यांनी ही चटणी करून पहावी. उपवासाव्यतिरिक्त अन्य दिवशीही पराठ्यांसोबत खायला ही चटणी चवदार लागते.
उपवासाची हिरवी चटणी
साहित्य
एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
हंसिका मोटवाणी की माधुरी दीक्षित? कोणाची रफल साडी तुम्हाला जास्त आवडतेय?
एक वाटी पुदिन्याची पाने
चवीनुसार साधे मीठ आणि काळे मीठ
१ टीस्पून जिरे
५ ते ६ हिरव्या मिरच्या
अर्धा टेबलस्पून अनारदाना पावडर किंवा ते नसेल तर अर्धे लिंबू पिळून टाकावे.
२ आईस क्युब
रेसिपी
१. सगळ्यात आधी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक चिरून घ्या.
२. त्यानंतर कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि वरील सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाका आणि हे मिश्रण चांगले बारीक वाटून घ्या.
३. उपवासाची चटणी झाली तयार. ही चटणी एका भांड्यात काढून घ्या. आवडत असेल तर या चटणीला वरतून फोडणी घाला.
४. फोडणी घालणार असाल तर जिरे मिक्सरमधून वाटू नका. जिऱ्याची फोडणी करून ती चटणीत टाका. चटणी आणखी खमंग होईल.