Join us

खाल्लंय कधी कांद्याचं लोणचं? चटकदार कांदा- मिरची लोणच्याची ही बघा चटपटीत रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2023 17:01 IST

Onion Chili Pickle Recipe: कांदा भजी, कांद्याचं थालीपीठ तर नेहमीचंच... आता करून बघा कांद्याचं चटपटीत लोणचं आणि त्याला द्या मिरचीचा झणका, बघा ही खास रेसिपी.

ठळक मुद्देकधी जेवणात भाजी नसली तरीही हे लोणचं चालून जातं आणि भाजीची जागा भरून काढतं. किंवा मग पराठा, भात, पोळी यासोबतही तुम्ही ते खाऊ शकता.

बरेचसे पदार्थ असे असतात की त्या पदार्थांमध्ये थोडासा जरी कांदा घातला तरी त्या पदार्थांची चव खुलते. कच्च्या कांद्याची तर एक वेगळीच खासियत असते. बऱ्याचशा भाज्यांमध्येही तो सहज चालून जातो. शिवाय कांदा भजी, कांद्याची थालीपीठं तर अनेकांची आवडीची. आता याच कांद्याचं चटकदार लोणचं करून बघा. त्याला थोडी मिरचीची जोड दिली की एकदम चवदार लोणचं तयार होतं (How to make pyaaj mirchi achar?). कधी जेवणात भाजी नसली तरीही हे लोणचं चालून जातं आणि भाजीची जागा भरून काढतं. किंवा मग पराठा, भात, पोळी यासोबतही तुम्ही ते खाऊ शकता. (tasty delicious onion chili pickle recipe)

 

कसं करायचं कांदा- मिरची लोणचं?ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या spoonsofdilli या पेजवर शेअर करण्यात आली आहे.साहित्य८ ते १० हिरव्या मिरच्या

८ ते १० लहान आकाराचे कांदे

मोहरी, बडिशेप प्रत्येकी २ टेबलस्पून

मेथी दाणे १ टेबलस्पून

लाल तिखट १ टेबलस्पून

गरम मसाला १ टीस्पून

हळद १ टीस्पून

कलोंजी १ टेबलस्पून

आलू पराठा करताना सारण सैल झाले, बटाटे खूप उकडले? ३ टिप्स- पराठा जमेल परफेक्ट

चवीनुसार मीठ 

मोहरीचं किंवा अन्य कोणतंही तेल

२ टेबल लिंबाचा रस किंवा १ टेबलस्पून व्हिनेगर 

 

कृती१. सगळ्यात आधी कांद्याची टरफलं काढून घ्या आणि त्याला वरच्या बाजुने मधोमध असे एक उभा आणि एक आडवा असा छेद द्या. कांद्याचे काप करू नका.

मुले शिकायला दूरदेशी गेली, माधुरी दीक्षित झाली हळवी! म्हणाली, आता आपल्या या घरात पूर्वीसारखं....

२. तसेच मिरच्यांनाही मधोमध छेद द्या.

३. आता एक कढई गॅसवर तापायला ठेवा. त्यात मोहरी, बडिशेप आणि मेथ्या टाका आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर ते थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्याची बारिक पावडर करा. 

 

४. ही पावडर एका भांड्यात काढून ठेवा. त्यात लाल तिखट, गरम मसाला, मीठ, कलोंजी, लिंबाचा रस किंवा व्हिनेगर टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की त्यात छेद दिलेल्या मिरच्या आणि कांदे टाका. सगळ्यात शेवटी त्यात गरम केलेलं तेल टाका. हे लोणचं काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती