Join us  

Home Made Ice Cream: ना दूध आटवायचा त्रास, ना बर्फ होण्याचा, फक्त 3 गोष्टी-झटपट गारेगार आइस्क्रीम तयार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2022 1:22 PM

How To Make Ice Cream at home: अशा पद्धतीने एकदा आईस्क्रिम करून बघा.. विकतचं आईस्क्रिम खाणं जणू विसरूनच जाल. अगदी बाजारात मिळतात तसे ब्रॅण्डेड आईस्क्रिम घरच्याघरी तयार (Ice Cream Recipe)

ठळक मुद्देफक्त ३ गोष्टी आणि आईस्क्रिम तयार... ना दूध आटवायचं, ना वारंवार सेट करायचं.. बघा सोपी रेसिपी

उन्हाळ्यात आईस्क्रिम पाहिजेच असतं.. अगदी सकाळ, दुपार, संध्याकाळ मिळालं तरी आपण ते खाऊ शकतो. बच्चे कंपनीची पण आईस्क्रिमसाठी नेहमीच विशेष डिमांड असतेच (summer special recipe). म्हणूनच तर प्रत्येक वेळी बाहेर जाऊन आईस्क्रिम खाण्यापेक्षा घरीच एकदा या खास रेसिपीने आईस्क्रिम (simple recipe for ice cream) करून बघा. इतर रेसिपींप्रमाणे जेव्हा आपण आईस्क्रिम बनवतो, तेव्हा त्यात खूप वेगवेगळ्या पावडर टाकाव्या लागतात आणि विशेष म्हणजे त्यांचं माप परफेक्ट जमलं तरच आईस्क्रिम छान सेट होतं..

 

मेजरमेंटमध्ये चूक झाली की आईस्क्रिमचीही पुर्णच वाट लागते. शिवाय आधी दूध आटवा नंतर वेगवेगळ्या पावडर घालून ते ४ तास सेट करा. नंतर पुन्हा फ्रिजरमधून बाहेर काढून पुन्हा ब्लेंडर फिरवा आणि नंतर सेट करा.. असे अनेक कुटाणेही करावे लागतात. एवढं करूनही आईस्क्रिम छान सेट होईल किंवा मग त्यात बर्फ जमणार नाही, याची काही गॅरेंटी नसतेच.. त्यामुळे मग अशा पद्धतीने आईस्क्रिम करण्याचा खरोखरंच कंटाळा येऊ लागतो. म्हणूनच तर आईस्क्रिम तयार करण्याची ही सोपी रेसिपी एकदा बघा आणि लगेचच ट्राय करून पहा..

 

आईस्क्रिम बनविण्यासाठी लागणारं साहित्यएक ग्लास व्हिप्ड क्रिम (whipped cream), १ ग्लास दूध आणि अर्धी वाटी मिल्क पावडर (milk powder)..कसं करायचं आईस्क्रिम?- आईस्क्रिम तयार करण्यासाठी दूध आधी उकळून थंड करून घ्या.- साधारण एक ग्लास दूध असेल तर त्यात अर्धी वाटी मिल्क पावडर टाका.- मिल्क पावडर एकदम ओतू नका. हळू हळू टाका जेणेकरून त्यात गोळे होणार नाहीत.- आता एक ग्लास व्हिप्ड क्रिम एका भांड्यात घ्या आणि ब्लेंडरने फेटून ते सेट करून घ्या.- व्हिप्ड क्रिम छान फुलून आले आणि त्यात थोडा स्टिफनेस आला की ते तयार झाले आहे असे समजावे.- नंतर त्यात मिल्कपावडरचं दूध घाला. पुन्हा एकदा सगळं मिश्रण फेटून घ्या.- हे झालं प्लेन व्हॅनिला आईस्क्रिम तयार.- व्हिप्ड क्रिममध्ये जेव्हा मिल्क पावडर घातलेलं दूध टाकाल तेव्हा तुम्हाला पाहिजे तो फ्लेवर टाका आणि सगळं मिश्रण एकत्र फेटा. एअर टाईट डब्यात घालून आईस्क्रिम सेट करायला ठेवून द्या. ७ ते ८ तासांत उत्कृष्ट आईस्क्रिम तयार.

फ्लेवर आईस्क्रिम तयार करण्यासाठी काय टाकावे?चॉकलेट फ्लेव्हर- कोको पावडर आणि चोको चिप्सकोकोनट फ्लेव्हर- नारळाचं दूध आणि नारळाचे कापमँगो फ्लेव्हर- आंब्याचा रस, आंब्याचे तुकडे आणि खाण्याचा पिवळा रंगगुलकंद फ्लेव्हर- गुलकंद आणि खाण्याचा गुलाबी रंगफ्रुट ओव्हरलोड- वेगवेगळे ड्रायफ्रुट्स, फळं 

 

टॅग्स :अन्नसमर स्पेशलपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.