Join us  

५ मिनिटांत करा खमंग चवीची कांद्याच्या पातीची भाजी, सकाळच्या घाईत डब्यात देण्यासाठी मस्त चवदार पदार्थ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2023 6:05 PM

Cooking Tips: सकाळी- सकाळी डब्यांची खूप गडबड असते. अशावेळी कांद्याच्या पातीची झटपट होणारी भाजी तुम्ही अगदी ५ मिनिटांत करू शकता...(How to do kandychya patichi bhaji or spring onion sabji?)

ठळक मुद्देअगदी झटपट ही भाजी करता येते. शिवाय ती करण्यासाठी खूप सारे पदार्थ लागतात असंही काहीच नाही.

कांद्याची पात आपण अनेक चायनिज पदार्थांमध्ये खातो. चिवडा, पोहे अशा पदार्थांवरही आपण अनेकदा कांद्याची पात टाकतो. बऱ्याचदा जेवणात तोंडी लावायला कांद्याऐवजी कांद्याची पात (onion paat) घेतली जाते. त्यामुळे जेवणात छान चव येते. किंवा मग काकडी, टोमॅटो यांच्या कोशिंबीरीमध्येही कांद्याची पात टाकतात. आता एकदा या कांद्याच्या पातीची भाजी करून पाहा. अगदी झटपट ही भाजी करता येते (How to do kandychya patichi bhaji?). शिवाय ती करण्यासाठी खूप सारे पदार्थ लागतात असंही काहीच नाही. त्यामुळे सकाळच्या गडबडीत डब्यात देण्यासाठी कांद्याच्या पातीची भाजी (Kandyachya patichi bhaji or spring onion sabji) हा एक चांगला पर्याय आहे.

 

कांद्याच्या पातीची भाजी करण्याची रेसिपी

साहित्य

कांद्याची पात

लसूणाच्या ४ ते ५ पाकळ्या

२ टेबलस्पून दाण्याचा कूट किंवा मूग डाळ

दसरा- दिवाळीसाठी ५०० रुपयांत घ्या काठापदराची सुंदर साडी, बघा एकापेक्षा एक देखण्या साड्या 

चवीनुसार तिखट आणि मीठ

फोडणीसाठी तेल, मोहरी आणि हिंग

 

रेसिपी 

१. सगळ्यात आधी कांद्याची पात स्वच्द धुवून घ्या आणि व्यवस्थित कोरडी करून बारीक चिरून घ्या.

२. त्यानंतर कढई गॅसवर तापवायला ठेवा आणि तेल तापवून फोडणी करून घ्या.

३. फोडणी झाली की त्यात लसूण टाकून परतून घ्या.

केसांना तेल लावून मालिश केली की केस जास्तच गळतात? ६ टिप्स, तेल लावताना ‘या’ चुका टाळा

४. लसूण चांगला लालसर परतून झाला की कढईमध्ये चिरलेली कांद्याची पात टाकावी.

५. यानंतर मीठ, तिखट टाका आणि सगळी भाजी हलवून घ्या. कढईवर झाकण ठेवून एखादा मिनिट चांगली वाफ येऊ द्या.

६. नंतर भाजीमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालावा. काही जण शेंगदाण्याच्या कुटाऐवजी भिजवलेली मुगडाळ घालतात. यापैकी जे तुम्हाला आवडत असेल ते घालावे.

७. पुन्हा एखादा मिनिट झाकण ठेवून वाफ आली की झाली भाजी तयार. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती