नवरात्रीच्या उपवासांमध्ये (navaratri fast) तेच ते पदार्थ खाऊन अनेक जणींना कंटाळा येतो. कधी वेगळं काहीतरी खावंसं वाटतं. अशा वेळी रताळ्याच्या (ratale or sweet potato) गोड फोडी करून पाहा. काही ठिकाणी या फोडींना रताळ्याच्या चकत्या म्हणतात तर काही ठिकाणी रताळ्याचे काप म्हणून हा पदार्थ ओळखला जातो. सलग उपवास केल्याने अनेकदा गळून गेल्यासारखं होतं. अशावेळी रताळ्याच्या या गोड फोडी फराळात असल्या की एनर्जी वाढते. शिवाय रताळ्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. हा पदार्थ सकाळी नाश्त्याला खाल्ला तर दिवसभर उर्जा टिकून राहते. फक्त ३ पदार्थ वापरून हा अतिशय चवदार पदार्थ करता येतो. (sweet dish for fast)
रताळ्याच्या गोड फोडी करण्याची रेसिपी
साहित्य
४ ते ५ मध्यम आकाराचे रताळे
उपवासाच्या दिवसांत रताळी खायला विसरू नका, ५ जबरदस्त फायदे, तब्येतही सांभाळली जाईल- उपवासही होईल
दिड वाटी गूळ किंवा साखर. तुम्ही एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर असं मिक्स कॉम्बिनेशनही या पदार्थासाठी घेऊ शकता.
३ ते ४ टेबलस्पून साजूक तूप
कृती
१. सगळ्यात आधी रताळी स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्या गोलाकार चकत्या करा.
२. त्यानंतर एक कढई गॅसवर तापायला ठेवा. कढई तापली की त्यात तूप घाला.
दसरा- दिवाळीसाठी सुंदर गालिचा घ्यायचा? बघा वजनाला हलके आणि देखणे ५ गालिचे, किंमतही कमी
३. तूप तापल्यानंतर त्यात रताळ्याच्या फोडी टाका आणि व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर कढईवर झाकण ठेवा आणि वाफ येऊ द्या.
४. फोडी थोड्या मऊ झाल्या की त्यात गूळ आणि साखर घाला. फोडी मऊ झाल्यावरच त्यात साखर किंवा गूळ घाला. नाहीतर फोडी कडक होऊन जातात.
हिरवी नजाकत, बघा साड्यांचे हे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का?
५. काही मिनिटातच साखरेचा किंवा गुळाचा पाक होतो. आता त्या पाकात फोडी चांगल्या शिजू द्या. बराचसा पाक आटला आणि अगदी थोडा कढईत उरला की मग गॅस बंद करा.