Lokmat Sakhi >Food > Kairi Chutney: कैरीचा रसरशीत ठेचा... ५ मिनिटांत तयार, जेवणात येईल न्यारी रंगत, बघा फक्कड रेसिपी 

Kairi Chutney: कैरीचा रसरशीत ठेचा... ५ मिनिटांत तयार, जेवणात येईल न्यारी रंगत, बघा फक्कड रेसिपी 

Kairi Chutney Recipe: कैरीचा असा चवदार ठेचा (kairi thecha) एकदा खाऊन बघाच.. एकदा केला की वारंवार कराल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 07:32 PM2022-04-30T19:32:03+5:302022-04-30T19:32:49+5:30

Kairi Chutney Recipe: कैरीचा असा चवदार ठेचा (kairi thecha) एकदा खाऊन बघाच.. एकदा केला की वारंवार कराल..

Food And Recipe: Tasty and delicious Kairi chutney, How to make raw mango chutney? | Kairi Chutney: कैरीचा रसरशीत ठेचा... ५ मिनिटांत तयार, जेवणात येईल न्यारी रंगत, बघा फक्कड रेसिपी 

Kairi Chutney: कैरीचा रसरशीत ठेचा... ५ मिनिटांत तयार, जेवणात येईल न्यारी रंगत, बघा फक्कड रेसिपी 

Highlightsसाधारणपणे एकदा केलेला ठेचा व्यवस्थित झाकण लावून फ्रिजमध्ये ठेवल्यास तो २ ते ३ दिवस आरामात टिकू शकतो.

उन्हाळ्यात वरण- भात- भाजी- पोळी असं सगळं ताटात असलं तरीही कैरीची एखादी फोड किंवा कैरीपासून केलेला एखादा आंबटचिंबट पदार्थ ताटात असल्याशिवाय ताट पुर्ण वाटत नाही. शिवाय जेवणात म्हणावी तशी रंगतही येत नाही. म्हणूनच तर उन्हाळ्यात कैरीच्या पदार्थांची भलतीच रेलचेल असते. कैरीचं लोणचं, तक्कू, मेथांबा असं सगळं तुम्ही करून पाहिलंच असेल. आता कैरीचा ठेचा करून बघा.. झटपट तयार होणारा हा ठेचा तुमच्या जेवणाची चव आणखी खुलवेल हे निश्चित. (raw mango chutney)

 

कसा करायचा कैरीचा ठेचा?
- कैरीचा ठेचा करण्याची ही रेसिपी इन्स्टाग्रामच्याmammi_ka_dhaba या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आली आहे. यासाठी आपल्याला एक मध्यम आकाराची आंबट कैरी, १० ते १५ पुदिन्याची पानं, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, सात ते आठ हिरव्या मिरच्या, ७ ते ८ लसूण पाकळ्या, एक टीस्पून जीरे, मीठ, गुळाचा खडा असं साहित्य लागणार आहे. 
- कैरीच्या बारीक फोडी करून घ्या. पुदिना, मिरच्या आणि कोथिंबीर चिरून घ्या.


- आता कैरीच्या फोडी, पुदिना, मिरच्या, कोथिंबीर, जीरे, मीठ, लसूण हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्या.
- हा झाला ठेचा तयार. आता ठेचा बाऊलध्ये काढल्यानंतर त्यात तेल- मोहरी- हिंग असलेली खमंग फोडणी घाला. चवदार ठेचा तुम्ही चटणीप्रमाणे तोंडी लावू शकता. 
- हा ठेचा खूप जास्त करून ठेवू नये. कारण तो लगेचच खराब होण्याची शक्यता असते.
- साधारणपणे एकदा केलेला ठेचा व्यवस्थित झाकण लावून फ्रिजमध्ये ठेवल्यास तो २ ते ३ दिवस आरामात टिकू शकतो.

 

Web Title: Food And Recipe: Tasty and delicious Kairi chutney, How to make raw mango chutney?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.