खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळे प्रयोग करणं यात काही नवीन नाही. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले खाद्य प्रयोग फारच अधुनिक आणि विचित्र असतात. फॅन्टा मॅगी, न्यूडल्स समोसा, टोमॅटो चाट असे प्रकार पाहून नक्की या लोकांना काय करायचंय, असा प्रश्न पडतो. असेच काही अतरंगी पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
टोमॅटो चाट
chatore_broothers या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडियो काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. दिल्ली ईस्ट ( Delhi East) येथील चित्रा विहार परिसरातील हा व्हिडियो आहे, असे सांगण्यात आले आहे. या व्हिडियोमध्ये असे दिसते की रस्त्यावर एक छोटीशी गाडी लावून तेथे एक तरूण मुलगा हा टोमॅटो चाट बनवत होता. हा चाट बनविण्याची पद्धत अतिशय हटके आहे. टोमॅटो चाट बनविण्यासाठी या मुलाने सगळ्यात आधी तर एक मोठी कढई तापायला ठेवली आहे. या मोठ्या कढईमध्ये भरपूर वाळू टाकण्यात आली आहे. वाळू खूप तापल्यावर या मुलाने त्यामध्ये चांगले १० ते १२ टोमॅटो टाकले आणि चांगले घोळून घेतले. थोडक्यात सांगायचं तर त्या मुलाने या वाळूचा उपयोग टोमॅटो रोस्ट करण्यासाठी केला. मग हे पान बनवायला सुरूवात केली.
फॅन्टा मॅगी
फॅन्टा मॅगीचा हा व्हिडीओ 18 नोव्हेंबरला शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओला सुमारे 2.8 दशलक्ष व्हिव्हज मिळाले आहेत. तर या व्हिडीओवर लोकांनी खूप कमेंट्सचा वर्षावही केला आहे. काही फूड ब्लॉगर्सनी सहमती दर्शवली आणि डिश चांगली चव येईल असे वाटले, तर इतरांनी असहमत दर्शवली. ट्यूब पेज फूडी इनकार्नेटचे फूड ब्लॉगर अमर सिरोही यांनी व्हिडिओ पोस्ट केला होता. यात गाझियाबादमधील एक स्ट्रीट फूड विक्रेता हा अत्यंत सोपी पण आगळी वेगळी डीश बनवताना दिसून येत आहे.
ओरिओ बिस्कीट भजी
बेसन पीठात ओरिओची बिस्कीट टाकणारी एक व्यक्ती व्हिडीओत दिसली. त्याने ही बिस्कीटे पीठात घोळवून थेट तेलात सोडली आणि भजींप्रमाणेच त्याला तळून काढले. यानंतर रितसर मिरचीसोबत ही भजी ग्राहकांना दिली. रमण या व्यक्तीच्या धुवाधार नावाने केलेल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडियो पोस्ट करण्यात आला होता. ओरिओ के पकोडे फ्रॉम अहमदाबाद, गुजरात अशी कॅप्शन देत या व्हिडियोवर आश्चर्यकारक आणि रडणारे स्माईलीही टाकण्यात आले.
रसगुल्ला चाट
रसगुल्ल्याचे नाव ऐकताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. याचे एक कारण म्हणजे सर्वाधिक भारतीयांना गोड पदार्थ खूप आवडतात. रसगुल्ल्याचा रसाळ गोडवा जीभेसह मनालाही खूश करतो. मिठाई, पेठे तसंच रसगुल्ल्यांमध्येही वेगवेगळे प्रयोग केले जातात. अनेकदा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या रसगुल्ल्यांची चव अनुभवली असेल. पण कधी कधी फारच सुमार दर्जाचे प्रयोग खाद्यपदार्थांमध्ये केले जातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुम्हालाही राग अनावर होईल.
इडली आइस्क्रिम
पोळी, भात या भारतातल्या मुख्य पदार्थांचं रुप बदलू शकतं, नवीन रुपातली पोळी,भाताचे वेगवेगळे प्रकार खायला मजा येते तर मग इडलीचं रुप बदललं तर काय बिघडलं असा सवाल करत काडीवरील इडलीला काहींनी जोरदार सर्मथन दिलं आहे.
व्हायरल काजू कतली सूप