Join us

फूड कंपन्या तुमच्या मेंदूशी खेळतात, खिसा होतोय रिकामा! पाहा ३ गोष्टी, तुमचं ‘असं’ होतंय का..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2025 20:15 IST

Food Companies Play With Your Brain, See Their 3 Strategies : जाहिराती बघताना सावध राहा. डोक्यात विचार सुरू होतील तुम्हाला कळणारही नाही.

एखादा पदार्थ खुप जास्त प्रसिद्ध होतो. त्याची हाईप भरपूर असते. आर्थात त्याची चव काही फार जगा वेगळी नसते. तो तयार करण्यासाठी वापरलेल्या पदार्थांचा दर्जा काही फार चांगला नसतो. (Food Companies Play With Your Brain, See Their 3 Strategies )तरी लोकं विकत घेतात. पण ग्राहक असं का करतात? स्वास्थ्यासाठी हानिकारक पदार्थ जास्तीचे पैसे देऊन का विकत घेतात? याचे कारण म्हणजे कंपनीची मार्केटिंग स्ट्रेटेजी. (Food Companies Play With Your Brain, See Their 3 Strategies )सगळा खेळ या मार्केटिंगचा असतो. लोकांना आकर्षित करता येत असेल तर, उत्पादनाचा दर्जा कमी असला तरी विक्री भरपूर होते. कंपनींच्या जाळ्यात आपण फसतो. त्यांच्या तीन अशा स्ट्रेटेजी आहेत, ज्याबद्दल कळल्यावर तुमचे स्वास्थ्य आणि पैसे दोन्ही वाचतील. जाणून घ्या.

तीन अशा स्ट्रेटेजी ज्या पॅकेट फूड इंडस्ट्रीसाठी फार महत्त्वाच्या ठरतात.(Food Companies Play With Your Brain, See Their 3 Strategies )  १. बरेचदा कंपनीच्या जाहिरातींमध्ये मोठ्या सेलिब्रिटीज असतात. जसं की क्रिकेटर, बॉलिवूडमधील स्टार इंस्टाग्रामवर व्हायरल झालेली व्यक्ती. ज्यांच्याकडे ग्राहक आकर्षित होतील, अशा लोकांना जाहिरातीत घेतात. त्यामुळे चाहत्यांच्या डोक्यात त्या पदार्थाविषयी विचार सुरू होतात. आणि त्यांनाही खायची इच्छा होते. जाहिरातींवर करोडो रुपये कंपनी खर्च करते. त्यातूनच त्यांचे पदार्थ नावारूपाला येतात.

२. जर तुम्ही जाहिरातींचे निरीक्षण केलेत तर लक्षात येईल की, ते बाल कलाकारांना काम देतात. समजा चॉकलेटची जाहिरात आहे. तर त्यात भरपूर लहान मुलं ते चॉकलेटचा आनंद लुटताना दाखवतात. त्या मुलांकडे बघून घरातील मुलं त्या चॉकलेटसाठी पालकांकडे हट्ट करतात. यात कंपनी पूर्णपणे चाईल्ड सायकलॉजीचा वापर करते. तो खात आहे ते मला पण हवं अशी मानसिकता लहान मुलांची असते. मुलांचा हट्ट पूर्ण करणं पालकांना भाग असतं. कंपनीची विक्री वाढते.

३. कंपन्या सर्वच पदार्थांत चव आणतात. जे पदार्थ चवीला फार छान लागत नाहीत, असे पदार्थही काही रसायने घालून चविष्ट करून कंपन्या विकतात. आपल्याला सांगताना फक्त त्यातील अर्ध्या गोष्टी सांगतात. ज्या पौष्टिक असतील. पण ज्या हानिकारक आहेत त्या सांगत नाहीत. अगदी कारल्यासारखे पदार्थही चविष्ट करून विकतात. त्यावर प्रक्रिया करून बाजारात आणतात. हे पदार्थ स्वास्थ्यासाठी प्रचंड वाईट.

त्यामुळे अशा जाहिरातींना बळी पडू नका. काळजी घ्या.                 

टॅग्स :जाहिरातअन्नबाजारसेलिब्रिटी