Join us  

क्रिस्पी क्रंची कुरकुरीत पालक; पालकाची मिळमिळीत भाजी आता विसरा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 8:16 PM

How to make Crispy, cruchy spinach: पालकाची भाजी, सूप, पराठे असं सगळं खाऊन बोअर झालं असेल तर ही क्रिस्पी, क्रंची आणि कुरकुरीत पालक रेसिपी करून बघा.. टेस्ट मे बेस्ट असणारी ही झकास रेसिपी...

ठळक मुद्देतुम्ही स्टार्टर म्हणूनही हा पदार्थ खाऊ शकता किंवा जेवणात तोंडी लावायलाही हा पदार्थ साईड डिश म्हणून चालू शकतो.

पालकाची पीठ लावून केलेली आणि वरतून लसणाची खमंग फोडणी घातलेली पातळ भाजी आपण नेहमीच खातो. पालक पराठे, पालकाचं सूप असंही मध्ये मध्ये असतंच. फारच मुड आला तर पालक पनीरही बनविण्यात येते. पण आता पालकाचे हे नेहमीचे रूटीन प्रकार खाऊन कंटाळा आला असेल आणि थोडा चेंज हवा असेल, तर खाऊन बघा ही मस्त क्रिस्पी, कुरकुरीत क्रंची पालक रेसिपी. (Crispy, cruchy spinach recipe in Marathi) तुम्ही स्टार्टर म्हणूनही हा पदार्थ  (easy and quick recipe) खाऊ शकता किंवा जेवणात तोंडी लावायलाही हा पदार्थ साईड डिश म्हणून चालू शकतो. काय म्हणून आणि कसा खायचा, हे तुम्ही ठरवा. पण हा पदार्थ चवदार होतो, एवढं मात्र अगदी खरं.. क्रंची, क्रिस्पी पालकाची ही रेसिपी इन्स्टाग्रामच्याchefkunal या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

 

क्रंची, क्रिस्पी पालक करण्यासाठी लागणारं साहित्यपालकाची ताजी पाने ६ कप, कॉर्न स्टार्च अर्धा कप, तेल, अद्रकाची पेस्ट, ३ ते ४ टेबल स्पून कापलेला लसूण, एक हिरवी मिरची, एक लाल मिरची, सोया सॉस ४ टेबल स्पून, व्हिनेगर १ टेबलस्पून, तीळ २ टेबलस्पून आणि चवीनुसार मीठ.

फोडणीचा भात तर नेहमीचाच, आता शिळ्या भाताला द्या स्पाईसी तडका; करा मस्त पनीर पुलाव

क्रंची, क्रिस्पी पालक रेसिपीHow to make Crispy, cruchy spinach- सगळ्यात आधी पालकाची पाने स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या. त्यानंतर ती पाने लांब लांब आकारात कापा.

- यानंतर त्यावर कॉर्न स्टार्च किंवा कॉर्न फ्लॉवर टाका आणि पालकाची पाने त्यात व्यवस्थित घोळून घ्या. कॉर्न स्टार्चचे कोटींग पानांवर व्यवस्थित लागायला हवे.- कढईत तेल तापत ठेवा आणि त्यात पालकाची पाने टाकून डिप फ्राय (deep fry) करून घ्या. एखाद्या मिनिटातच पालकाची पाने क्रिस्पी होतील. पानं छान कुरकुरीत झाल्यावरच कढईतून बाहेर काढा.- पालक तळून काढल्यावर तेल निथळून घ्या. 

- त्यानंतर दुसऱ्या एका कढईमध्ये २ टेबलस्पून तेल घ्या. तेल तापल्यावर त्यात लसूण, अद्रक, हिरव्या मिरचीचे तुकडे, लाल मिरचीचे तुकडे असं सगळं टाकून परतून घ्या.- त्यात आता सोया सॉस आणि व्हिनेगर टाका. आणि मध्यम आचेवर हे सगळे साहित्य एकदा हलवून व्यवस्थित एकत्र करून घ्या. 

गाजर हलव्याचा चिखल होतो? नेमकं काय चुकतं म्हणून गाजर हलवा नाही लगदा होतो? करा फक्त ५ गोष्टी

- त्यानंतर त्यात आपण तळून काढलेला पालक टाका आणि मंद आचेवर १० ते १५ सेकंद पालक परतून घ्या. त्यानंतर त्यावर तीळ टाका आणि चवीनुसार मीठ टाका.- व्यवस्थित हलवून झालं की गरमागरम क्रिस्पी क्रंची पालक खाण्यासाठी झाला तयार..

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सइन्स्टाग्रामआरोग्य