Lokmat Sakhi >Food > सिंधी दाल टोस्ट ! नाश्त्याला काहीतरी चटकमटक हवं, खा सिंधी टोस्ट

सिंधी दाल टोस्ट ! नाश्त्याला काहीतरी चटकमटक हवं, खा सिंधी टोस्ट

Breakfast Recipe: सॅण्डविज, ब्रेड कटलेट किंवा ब्रेड- बटर- जॅम असे पदार्थ आपण नेहमीच खातो... म्हणूनच घरात ब्रेड (bread)असतील तर सिंधी दाल टोस्ट हा पदार्थ करून बघा (How to make Sindhi Dal Toast) ... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 05:59 PM2021-11-28T17:59:44+5:302021-11-28T18:01:25+5:30

Breakfast Recipe: सॅण्डविज, ब्रेड कटलेट किंवा ब्रेड- बटर- जॅम असे पदार्थ आपण नेहमीच खातो... म्हणूनच घरात ब्रेड (bread)असतील तर सिंधी दाल टोस्ट हा पदार्थ करून बघा (How to make Sindhi Dal Toast) ... 

Food: How to make Sindhi Dal Toast? spicy and tasty dish | सिंधी दाल टोस्ट ! नाश्त्याला काहीतरी चटकमटक हवं, खा सिंधी टोस्ट

सिंधी दाल टोस्ट ! नाश्त्याला काहीतरी चटकमटक हवं, खा सिंधी टोस्ट

Highlightsतेच ते पदार्थ खाऊन खूपदा कंटाळा येतो. म्हणूनच तर मग नाश्त्यासाठी सिंधी दाल टोस्ट हा एक चटपटीत पदार्थ करून बघा.

रविवारचा नाश्ता किंवा सुटीच्या दिवसाचा नाश्ता कसा खास (special breakfast) असला पाहिजे...कारण या नाश्त्यातूनच सुटीचा फिल येते, असे अनेकांचे म्हणणे असते... हे काही अंशी खरेही असते म्हणा. कारण एरवी आठवड्याच्या इतर दिवसांत आपण खूप मन लावून, वेळ काढून नाश्ता बनवत नाही. जे पटकन होईल, ते फटाफट केलं जातं, खाल्लं जातं आणि जो- तो आपापल्या कामाला पळून जातो. त्यामुळेच तर रविवारचा किंवा सुटीच्या दिवसाचा नाश्ता कसा निवांत करावा आणि चटकदार (spicy and tasty) असावा, अशी घरातल्या मंडळींची अपेक्षा असते.. 

 

आता असा मस्त नाश्ता (perfect breakfast dish) बनवायचा म्हणजे मग पदार्थही खासच असायला हवा. तेच ते पदार्थ खाऊनही खूपदा कंटाळा येतो. म्हणूनच तर मग नाश्त्यासाठी सिंधी दाल टोस्ट हा एक चटपटीत पदार्थ करून बघा. हा पदार्थ ब्रेडपासून तयार करण्यात येतो. मुगाच्या डाळीचा यामध्ये वापर करण्यात येतो. त्यामुळे हा पदार्थ खाऊन बऱ्यापैकी पोट भरते. त्यामुळेच जर तुम्हाला रात्रीच्या वेळी वन डीश मिल (one dish meal)हवे असेल, तरीही तुम्ही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. ही बघा या पदार्थाची चवदार, चटकदार रेसिपी (recipe- How to make Sindhi Dal Toast) ....

 

सिंधी दाल टोस्ट करण्यासाठी लागणारे साहित्य 
Ingredients for making Sindhi Dal Toast

१ कप मुगडाळ (Moong dal), एक टीस्पून हळद, चवीपुरते मीठ, २ ब्रेडचे स्लाईस, २ लहान आकाराचे उकडलेले बटाटे, २ टीस्पून कोथिंबीर, २ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा, १ टीस्पून डाळींबाचे दाणे, अर्धा टिस्पून चाट मसाला, १/४ टिस्पून मिरेपूड, १ टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून चिंचेची चटणी, १ टीस्पून पुदिना चटणी, थोडीशी शेव किंवा भुजीया

कसे करायचे सिंधी दाल टोस्ट?
How to make Sindhi Dal Toast

- हा पदार्थ तयार करण्यासाठी सगळ्यात आधी तर मुगाची डाळ अर्धा तास भिजत घाला. 
- यानंतर ही डाळ कुकरमध्ये घालून शिजवून घ्या. शिजवताना डाळीत मीठ आणि हळद टाका.


- डाळ शिजेपर्यंत उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, चाट मसाला टाका आणि हे सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.
- आता हे बटाट्याचे सारण दोन ब्रेड स्लाईसच्या मध्ये भरा आणि ते सॅण्डविज करतो त्याप्रमाणे ग्रील करून घ्या. ओव्हन किंवा सॅण्डविज मेकर नसेल तर तव्यावर बटर टाकून खालून- वरून खरपूस भाजून घ्या.
- आता शिजलेली मुग डाळ एका बाऊलमध्ये काढा आणि त्याला मस्त तुपाची फोडणी द्या.
- आपण ग्रील केलेले ब्रेड एका प्लेटमध्ये घ्या. ब्रेडवर डाळ टाका. त्यावर थोडी पुदिना चटणी आणि चिंचेची चटणी टाका.
- त्यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, डाळींबाचे दाणे, शेव असं सगळं  साहित्य टाका आणि गरमागरम सिंधी दाल टोस्ट खाण्याचा आनंद घ्या...   


 

Web Title: Food: How to make Sindhi Dal Toast? spicy and tasty dish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.