Lokmat Sakhi >Food > एनर्जीचा सुपरडोस, रोज फक्त १ मखाना लाडू! मखाना अनेक आजारांवर गुणकारी, घ्या लाडू रेसिपी

एनर्जीचा सुपरडोस, रोज फक्त १ मखाना लाडू! मखाना अनेक आजारांवर गुणकारी, घ्या लाडू रेसिपी

Makhana or fox nuts Laddu Recipe रोज मध्यम आकाराचा एक मखाना लाडू खाल्ला तर अनेक आजारांपासून आपण सुरक्षित राहू शकतो. त्यामुळेच तर ही रेसिपी बघा आणि अतिशय पौष्टिक मखाना लाडू घरच्याघरी तयार करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 01:51 PM2021-11-22T13:51:06+5:302021-11-22T13:52:01+5:30

Makhana or fox nuts Laddu Recipe रोज मध्यम आकाराचा एक मखाना लाडू खाल्ला तर अनेक आजारांपासून आपण सुरक्षित राहू शकतो. त्यामुळेच तर ही रेसिपी बघा आणि अतिशय पौष्टिक मखाना लाडू घरच्याघरी तयार करा...

Food, Recipe: How to make Makhana or Lotus seed laddu, immunity booster laddu | एनर्जीचा सुपरडोस, रोज फक्त १ मखाना लाडू! मखाना अनेक आजारांवर गुणकारी, घ्या लाडू रेसिपी

एनर्जीचा सुपरडोस, रोज फक्त १ मखाना लाडू! मखाना अनेक आजारांवर गुणकारी, घ्या लाडू रेसिपी

Highlightsदररोज एक मध्यम आकाराचा मखाना लाडू खाल्ला तर निश्चितच रोगप्रतिकारक शक्ती वाढून आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. 

Makhana or Lotus seed laddu हिवाळा सुरु होताच घरोघरी मेथीचे, डिंकाचे, उडिदाचे लाडू बनविण्याची तयारी सुरू होते. यावर्षी हे सगळे लाडू तर बनवाच, पण त्यासोबत मखाना लाडू रेसिपीदेखील ट्राय करून बघा. ही रेसिपी अतिशय सोपी आहे. मखाना म्हणजे कमळाच्या बिया. ड्रायफ्रुट्सपैकीच एक असणारा हा पदार्थ अतिशय पौष्टिक मानला जातो. ज्याप्रमाणे आपण घरात शेंगदाणा लाडू, बेसन लाडू, रवा लाडू करून ठेवतो, त्याप्रमाणे तुम्ही मखाना लाडू देखील करून ठेवू शकता. एकदा लाडू तयार केले की ते ८ ते १० दिवस टिकतात. मखाना लाडू बनविताना त्यात मखानासोबतच अनेक पौष्टिक पदार्थही टाकले जातात. त्यामुळे या लाडवांचे पोषणमुल्य खूप जास्त वाढते. सकाळी दररोज एक मध्यम आकाराचा मखाना लाडू खाल्ला तर निश्चितच रोगप्रतिकारक शक्ती वाढून आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. 

 

मखाना खाण्याचे फायदे 
Benefits of eating Makhana

- मखानामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे राेगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे मखाना इम्युनिटी बुस्टर म्हणून ओळखले जातात.
- मखानामध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात.
- आजारी माणसाला मखाना निखमितपणे खायला दिल्यास अंगात ताकद येते.
- अशक्तपणा दूर करण्यासाठी मखाना अतिशय पौष्टिक आहे.


- वेटलॉससाठी मखाना हा एक उत्तम पर्याय आहे. कारण काही अभ्यासानुसार असे सांगण्यात आले आहे की मखानामध्ये असणारे काही घटक शरीरातील चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप उपयुक्त् ठरतात. त्यामुळे ज्य व्यक्तींना वजन घटवायचे आहे, त्यांनी नियमितपणे मखाना खावा.
- मखाना नियमित खाल्ल्यामुळे निद्रानाशाचा त्रास दूर होतो.
- अंगातील उष्णता वाढल्यास मखाना खावा.
- मखाना खाल्ल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

मखाना लाडू बनिवण्यासाठी लागणारे साहित्य
मखाना लाडू रेसिपी CookwithParul या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
२ वाट्या मखाना, एक चतुर्थांश काजू आणि बदाम, ३ टेबलस्पून खरबूजाची बी, २ टेबलस्पून तूप, एक टी स्पून काळी मिरेपूड, दिड वाटी किसलेलं खोबरं, अर्धी वाटी पिठीसाखर किंवा गुळ.

 

कसे करायचे मखाना लाडू?
How to make Lotus seed or Fox nut laddu

- सगळ्यात आधी तर मखाना घेऊन त्याची मिक्सरमधून जरा जाडसर पावडर तयार करून घ्या.
- यानंतर काजू, बदाम आणि खरबूजाची बी हे सगळे साहित्य मिक्सरमधून फिरवा आणि त्याचीही जाडसर पावडर तयार करून घ्या.
- यानंतर एका कढईत एक टेबलस्पून तूप टाका.
- तूप गरम झाल्यानंतर त्यात एक टीस्पून काळे मिरीपूड घालावी.
- त्यानंतर यात आपण मिक्सरमधून बारीक केलेली मखाना पावडर, काजू- बदाम- खरबूज बी पावडर टाका.
- त्यानंतर त्यात बारीक किसलेलं खोबरं टाका.


- हे मिश्रण कमी गॅसवर भाजून घ्या. पावडरचा रंग हलकासा सोनेरी झाला की गॅस बंद करा.
- मिश्रण हलवत असताना जर ते कोरडं वाटत असेल, तर त्यात गरजेनुसार तुपाचं प्रमाण वाढवावं
- यानंतर हे मिश्रण थोडं कोमट होऊ द्या. थंड होऊ देऊ नका.
- मिश्रण काेमट असतानाच त्यात पिठीसाखर किंवा गरम केलेला गूळ यापैकी काहीही घाला. तसेच स्वाद येण्यासाठी १ टीस्पून विलायची पावडर घाला. 
- साखर, गुळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेचच लाडू वळा.

 

Web Title: Food, Recipe: How to make Makhana or Lotus seed laddu, immunity booster laddu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.