घरात असे अनेक पदार्थ असतात जे एक्सपायर झाल्यानंतर त्याचा कोणताही वापर होत नाही. फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो. पण एक्सपायर झालेले अन्नपदार्थ तुम्ही घरातील इतर कामांसाठी वापरू शकता. खाण्यापिण्याच्या प्रत्येक वस्तूंची एक्सपायरी डेट असते. त्यानंतर याचा वापर केल्यास आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. म्हणून लोक तारीख निघून गेली की वस्तू फेकून देतात. अशा पदार्थांचा वापर तुम्ही घरातील इतर कामांसाठी करू शकता.
ज्या खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर एक्सपायरी डेट लिहिली जाते, त्यानंतर ते वापरता येत नाहीत. एक्सपायर झाल्यानंतर, काही खाद्यपदार्थांची चव बदलत नाही, तर त्यांच्या रंगात बदल होतो. अनेक खाद्यपदार्थांनाही वास येऊ लागतो. त्याच वेळी, या खराब झालेल्या खाद्यपदार्थांचा इतर कामांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो.
मेयोनिज
मेयोनिज जेव्हा खराब होते तेव्हा ते फेकण्यापेक्षा त्याचा वापर स्टील एप्लाइंसेस स्वच्छ करण्यासाठी होऊ शकतो. फ्रिज किंवा किचनच्या ट्रॉलीला लागलेला गंज, डाग साफ करण्यासाठी मेयोनिजचा वापर तुम्ही करू शकता.
असा करा वापर
स्टिलच्या भांड्यांवर मेयोनिज लावून वापरात नसलेल्या ब्रशच्या मदतीनं पसरवून घ्या. त्यानंतर १० मिनिट तसंच राहू द्या. नंतर स्प्रे बॉटलनं पाणी शिंपडा आणि एका स्वच्छ कापडानं धुवून घ्या. त्यामुळे भांड्यांवरील डाग सहज निघून जाण्यास मदत होईल.
योगर्ट
एक्सपायर झालेलं योगर्ट फेकण्याऐवजी तुम्ही त्वचेवर वापर करू शकता. त्वचा हेल्दी राहण्यासाठी योगर्टचा वापर करा. त्यातील लॅक्टिक एसिड त्वचेचा रंग उजळवण्याचे काम करते. याचा वापर करून तुम्ही स्क्रब, फेसमास्क तयार करू शकता.
असा करा वापर
फेस मास्क तयार करण्यासाठी १ चमचा योगर्टमध्ये १ चमचा मध मिसळा, या दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्र करा. त्यानंतर आपल्या त्वचेला लावा आणि १५ मिनिटांसाठी असचं ठेवून द्या, त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ करा.
कॉफी ग्राऊंड
त्वचा आणि झाडं निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही एक्सपायर झालेल्या कॉफी ग्राऊंडचा वापर करू शकता. कॉफी ग्राउंड्स वनस्पतींसाठी खत म्हणून काम करतात. दुसरीकडे, त्वचेसाठी, तुम्ही ते फेस पॅक आणि स्क्रब दोन्हीसाठी वापरू शकता.
असा करा वापर
जर तुम्ही ते झाडांसाठी वापर करत असाल तर पद्धत अगदी सोपी आहे. एका भांड्याच्या मातीमध्ये 1 चमचे कॉफी ग्राउंड मिसळा. त्यानंतर कोणत्याही झाडासाठी ही माती वापरू शकता. याशिवाय, आपण पाण्यात द्रावण तयार करून कीटकनाशक म्हणून देखील वापरू शकता.
त्वचेवर जर तुम्हाला स्क्रब करायचा असेल तर 2 चमचे एलोवेरा जेल एक चमचा कॉफी ग्राउंडमध्ये मिसळा. आता हे मिश्रण चांगले मिसळल्यानंतर चेहऱ्यावर स्क्रब करा आणि 20 मिनिटे तसंच राहू द्या. यानंतर आपला चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ करा.
दूध
बहुतेक लोकांना असे वाटते की दुधाला एक्सपायरी तारीख नाही. दूध खराब झाल्यावर फाटते. तर ते कित्येक वेळा नासते,सौम्य आंबटपणा येऊ लागतो. अशा परिस्थितीत जेव्हाही दुधाची चव थोडी आंबट होते, तेव्हा समजून घ्या की ते खराब होऊ लागले आहे. अशावेळी, ते पिण्याऐवजी, आपण ते इतर मार्गांनी वापरू शकता. दुधाची चव आंबट झाल्यावर बेकिंगसाठी वापरा. हे बिस्किटं, पॅनकेक्स, खवा इत्यादी गोष्टी बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते.
ब्राऊन शुगर
घरात ठेवलेली ब्राऊन शुगर कडक होते, म्हणून काही लोक ते फेकून देतात. आपण त्वचा निरोगी ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता. कडक झालेली ब्राऊन शुगर बारीक करून बाटलीत भरा. फेस स्क्रब किंवा बॉडी स्क्रबमध्ये ब्राऊन शुगर वापरा. यासाठी तुम्हाला एका भांड्यात ब्राउन शुगरसह गुलाब पाणी आणि तेल मिसळावे लागेल. आंघोळ करण्यापूर्वी शरीराला या मिश्रणानं स्क्रब करा. या उपायानं त्वचा मऊ होईल आणि मृत त्वचेपासून सुटका होईल.