नाष्त्याला रोज नवीन काय बनवायचं हा प्रश्न घरोघरच्या बायकांसमोर असतो. पोहे, उपमा, इडली खाऊन घरातील मंडळींनाही कंटाळा येतो. बाहेरचं काहीतरी चटपटीत खावं असं प्रत्येकालाच वाटतं. फूड आऊटलेट्समधील चिजी स्नॅक्स आजकाल खूप जणांना आवडतात जातता. अगदी काही मिनिटात घरच्याघरीसुद्धा तुम्ही चिजी स्नॅक्स बनवू शकता. यासाठी तुम्हाला जास्त सामान लागणार नाही. घरच्याघरी उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून चटपटीत पदार्थ तयार करता येतील.
१) चिझ बॉल्स
साहित्य
उकडलेले बटाटे, २ चिरलेले कांदे, २ बारीक कापलेल्या शिमला मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1/4 कप ग्रेट केलेले चीज, 15 छोटे चीजचे क्यूब, 1 टिस्पून इटालियन सिझनिंग, 1 टिस्पून चिली फ्लेक्स, 1 टिस्पून बारीक मिरी पावडर, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 2 टेबलस्पून मैदा, 1 कप ब्रेड क्रम्स, 1/2 लिटर तेल, चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी बटाटे उकडून घ्या. मग सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे मॅश करून घ्या, त्यात सगळ्या बारीक चिरलेल्या भाज्या एकत्र करा, नंतर इटालियन सिझनिंग, चिली फ्लेक्स, मिरी पावडर एकत्र करा, ग्रेट केलेले चीज आणि चवीनुसार मीठ ॲड करा. हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या .
आता एक छोटासा गोळा घ्या त्यामध्ये चीज चा तुकडा घालून पुन्हा त्याला रोल करा. सगळे पोटॅटो बॉल्स करून घ्या आणि पंधरा मिनिटं तसेच ठेवा. त्यानंतर एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लॉवर, मैदा थोडेसे मीठ आणि पाणी घालून पेस्ट बनवून घ्या.
एका प्लेटमध्ये ब्रेडक्रम्स तयार करा. तयार केलेले पोटॅटो बॉल्स यामध्ये रोल करा. नंतर कॉर्न फ्लावर मैद्याच्या पेस्टमध्ये डीप करा. पुन्हा ब्रेडक्रम्स मध्ये चांगले रोल करून घ्या कढई मध्ये तेल गरम करत ठेवा. याला छान गोल्डन ब्राउन रंग येऊ द्या.
२) पनीर चीझ रोल
साहित्य
पनीर पाव वाटी, चीज पाव वाटी, सोया चंक्स १ वाटी, आलं लसूण हिरवी मिरची वाटून, आमचूर पावडर, चाट मसाला, मीठ, थोडा मैदा,रवा/ब्रेड क्रम्प/शेवया चुरा, तळायला तेल
कृती
सोया चंक कोरडे भाजून कोमट पाण्यात दहा मिनिटे भिजवून घ्या. दहाएक मिनिटांनी व्यवस्थित पिळून काढा, मोठे चंक असतील तर नीट कुस्करून घ्या. यात किसलेले चीज /पनीर आणि बाकी सर्व साहित्य घाला.
थोडा मैदा पाण्यात एकत्र करून सरसरीत करून घ्या. सोया मिश्रणाचे गोळे करून यात बुडवून रवा अथवा अन्य साहित्यात नीट घोळवून घ्या.
कडकडीत तापलेल्या तेलात लालसर होईपर्यंत तळून घ्या. तुम्हाला जर तळण नको असेल तर शॅलो फ्राय करू शकता, फक्त थोडा वेळ लागतो. शॅलो फ्राय करताना गोळे चपटे ठेवावेत.
३) चीझ चिली टोस्ट
साहित्य
८ ते १० ब्रेड स्लाईसेस, २ कप किसलेले चीज (मोझ्झारेला), ३-४ कमी तिखट मिरच्या, बारीक चिरून, बटर
कृती
ब्रेडचे स्लाईस व्यवस्थित कापून घ्या तोवर तवा तापवायला ठेवा. नंतर प्रत्येक स्लाईसला थोडेसे बटर लावा. त्यावर १/४ कप किसलेले चीज घालावे. आवडीनुसार असल्यास अजून चीज घातले तरी चालेल.
नंतर थोडी, थोडी हिरवी मिरची घाला. चीज वितळून थोडेसे लालसर होईस्तोवर बेक करा. तव्यातून बाहेर काढल्यानंतर प्रत्येक स्लाईसचे ४ तुकडे करा म्हणजे खायला सोपं पडेल.
गरमागरम चिली-चीज ब्रेड टॉमेटो केचअप किंवा मेयो सॉसबरोबर खायला तयार आहे.