(Image Credit- You Tube, Gujrati Rasoi)
देशातील जवळजवळ प्रत्येक घरात पनीरचे पदार्थ कुटुंबातील सदस्यांच्या आवडीनुसार तयार केले जाते. सणासुदीला पनीरची भाजी त्या दिवसाचं महत्व वाढवते. पनीरपासून तयार केलेले जाणारे पदार्थ सोपे आणि तितकेच स्वादिष्ट असतात. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पनीरच्या असंख्य डीशेसची नावं ऐकायला, वाचायला मिळतात. घरात बनवताना मात्र त्याच कॉमन चवीची भाजी बनवली जाते.
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हॉटेल स्टाईल पनीर घोटालाची रेसिपी सांगणार आहोत. टोमॅटो, कांदे आणि मसाल्यांनी बनवलेल्या जाडसर लाल ग्रेव्हीमध्ये कापलेले पनीर मिसळून ही डीश तयार केली जाते. तुम्ही यात क्रीम, शिमला मिर्च, लोणी घालू शकता किंवा त्याशिवायही बनवू शकता.
साहित्य
250 ग्रॅम पनीर
2 सिमला मिरची
3 -4 टोमॅटो
2 चमचे लाल तिखट
1 चमचा कसूरी मेथी
2 चमचे धने जिरा पावडर
2 क्यूब चीज
चवीनुसार मीठ
फोडणीसाठी
जीरे
हिंग
हळद
कृती
सगळ्यात आधी पनीर किसून घ्या. पनीरमधील सर्व पाणी काढून मगच पदार्थ बनवायला घ्या. टोमॅटो आणि सिमला मिरची मिक्सर मध्ये फिरवून घ्या.
अळूवड्या खाल्ल्यानं फर्टिलिटी वाढण्यासह मेंदूलाही होईल फायदा; तज्ज्ञांनी सांगितले अळूवड्यांचे फायदे
कढईत तेल तापत ठेवा जीरं, हळद लाल तिखट घाला हिंग टाका परतून घ्या आता आता ग्राइंड करून घेतलेले टोमॅटो आणि ग्राइंड करून घेतलेली सिमला मिरची घाला आणि दोन ते तीन मिनिटे परतून घ्या एक चमचा बटर घाला.
या मिश्रणाला तेल सुटल्यानंतर त्यात कसुरी मेथी धने-जिरेपूड चवीपुरतं मीठ घाला नंतर त्यात दोन चमचे पावभाजी मसाला घालावा. नंतर यात किसलेलं पनीर घाला.
...म्हणून पितृपक्षाच्या पारंपरिक स्वयंपाकात वापरत नाहीत 'या' ४ गोष्टी; चुकूनही करू नका सेवन
या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालून दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्या. झाकण ठेवून दोन मिनिटे शिजू द्या. दहा मिनिटात हॉटेल स्टाईल पनीर घोटाला तयार होईल. वरून चीज किसून घ्या आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
पनीर घोटाला पावाबरोबर खूप अप्रतिम लागतो किंवा नान, रोटी, गरमागरम भाकरीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता.