Lokmat Sakhi >Food > Food Tips : चहा थंड झाला तर पुन्हा पुन्हा गरम करून पिताय? मग हे ५ साईड इफेक्ट्सही माहीत करून घ्या

Food Tips : चहा थंड झाला तर पुन्हा पुन्हा गरम करून पिताय? मग हे ५ साईड इफेक्ट्सही माहीत करून घ्या

Food Tips : चहा वारंवार गरम करून पिण्याची सवय अनेकांना असते. आरोग्यावर तुमच्या सवयीचा वाईट परिणाम होऊ शकतो. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 02:01 PM2021-08-13T14:01:44+5:302021-08-13T14:18:45+5:30

Food Tips : चहा वारंवार गरम करून पिण्याची सवय अनेकांना असते. आरोग्यावर तुमच्या सवयीचा वाईट परिणाम होऊ शकतो. 

Food Tips : Why you should never reheat your tea read side effects | Food Tips : चहा थंड झाला तर पुन्हा पुन्हा गरम करून पिताय? मग हे ५ साईड इफेक्ट्सही माहीत करून घ्या

Food Tips : चहा थंड झाला तर पुन्हा पुन्हा गरम करून पिताय? मग हे ५ साईड इफेक्ट्सही माहीत करून घ्या

चहा हे आपल्या भारतीयांसाठी अमृतासमानच आहे.  घरात पाहुणे आले, कधी पाऊस पडला, थंडी, थकवा, डोकेदुखी किंवा आळस येत असेल या सर्वांसाठी आपल्याला एकच पर्याय सुचतो, तो म्हणजे चहा. जणू चहा म्हणजे चहा नाही, ब्रह्मास्त्र आहे. बरं प्रत्येकाला चहा आवडतो. परंतु आपण सर्वजण चहाच्या संदर्भात दररोज चूक करतो. एकदा कपात गाळलेला चहा थंड झाला की पुन्हा गरम केला  जातो. चहा वारंवार गरम करून पिण्याची सवय अनेकांना असते. आरोग्यावर तुमच्या सवयीचा वाईट परिणाम होऊ शकतो. 

पोषक तत्व आणि चव खराब होते

तयार केल्यानंतर चहा पुन्हा गरम करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे चहाची चव आणि सुगंध पूर्णपणे नाहीसा होतो. एवढेच नाही तर जेव्हा तुम्ही चहा पुन्हा गरम करता तेव्हा ते चहाच्या आत असलेले पोषक घटक पूर्णपणे नष्ट होतात.

आजारांचा धोका 

जेव्हा तुम्ही चहा गरम केल्यानंतर प्याल तेव्हा असे केल्याने चहाचे सर्व गुणधर्म आणि चांगले गुण बाहेर निघून जातात. त्यानंतर ते पिणं योग्य ठरत नाही. उलट ते आरोग्याचे नुकसान होते. गरम चहा प्यायल्याने अतिसार, उलट्या, पचनाच्या संबंधित समस्या होऊ शकतात. म्हणून चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिऊ नका.

मायक्रोबियल ग्रोथ

जर तुम्ही चहा दीर्घकाळ म्हणजेच सुमारे 4 तास तसाच ठेवला. तर या काळात अनेक जीवाणू आणि जंतू चहामध्ये प्रवेश करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही चहा गरम केलात, तर ते केवळ चव बदलत नाही. तर चहात असलेले सर्व फायदेशीर पोषक बाहेर फेकले जातात.

बहुतेक  लोक दुधाच्या चहाचे सेवन करतात. ज्यामध्ये सूक्ष्मजीव लवकर विकसित होण्याचा धोका असतो. जर तुम्ही गरम हर्बल चहा पित असाल तर त्याच्या आत असलेले सर्व गुणधर्म नाहिसे होतात. म्हणून चहा पहिल्यांदा बनवल्यानंतर लगेच  प्या.

टॅनिन बाहेर निघून जातं

जर तुम्ही चहाप्रेमी असाल, तर तुम्हाला चवीत कोणतीही तडजोड आवडणार नाही. पण जर तुम्ही चहा बराच काळ तसाच ठेवला तर ते  टॅनिन सोडते, ज्यामुळे चहाची चव पूर्णपणे कडू होते. अशावेळी चहा तुमच्या तोंडाची चव देखील खराब करेल. म्हणूनच चहाच्या सेवनाबाबत या ३ गोष्टी लक्षात ठेवा.

१) जर तुम्हाला चहा बनवून फक्त 15 मिनिटे झाली असतील तर तुम्ही पुन्हा गरम करून पिऊ शकता.

२) जर चहा ठेवून 4 तासांपेक्षा जास्त वेळ झाला असेल तर ते पुन्हा गरम करण्याची चूक अजिबात करू नका.

३) चहा बनवताना, त्याच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्या. आवश्यक तेवढाच चहा बनवा.

Web Title: Food Tips : Why you should never reheat your tea read side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.