Join us  

पावसाळ्यात कांदा-लसूण खाऊ नये हे कितपत खरे? पचनाशी काय संबंध? आहारातज्ज्ञ सांगतात..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 12:28 PM

Foods to eat and avoid during monsoon : सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांच्यामते जेव्हा ऋतूमध्ये बदल होतो तेव्हा आहारातही बदल करण्याची आवश्यकता असते.

पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात आद्रता जास्त असल्यानं अनेक इन्फेक्शियस आजार उद्भवतात.  सर्दी, खोकला, डेग्यू मलेरिया किंवा टायफॉईड यांसारखे आजार वाढतात. खाण्यापिण्यात चुका केल्यानं तसेच अन्हेल्दी आहार घेतल्यानं आजार होत जातात. (Foods to eat and avoid during monsoon by Rujuta Diwekar) काहीजण पावसाळ्याच्या दिवसात १ ते २ महिने नॉनव्हेज, कांदा लसूण खाणं बंद करतात तर काहीजण आपल्या आहारात कोणताही बदल न करता नेहमीप्रमाणे तसाच आहार ठेवतात. (What foods should be avoided in monsoons) सेलिब्रिटी डायटिशियन ऋजुता दिवेकर यांनी पावसाळ्यात कांदा-लसूण का खाऊ नये. याचं कारण सांगितलं आहे. (Why do we avoid onion and garlic in moonsoon)

 

सिजनल फ्रुट्स खायला हवेत (A Guide to Eating Right During Monsoon)

सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांच्यामते जेव्हा ऋतूमध्ये बदल होतो तेव्हा आहारातही बदल करण्याची आवश्यकता असते.  पावसाळ्याच्या दिवसात शरीराला इम्यूनिटी वाढवण्यासाठी आणि आजारांपासून मुक्त राहण्यासाठी विशेष पोषणाची आवश्यकता असते. ऋजुता नेहमीच आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लोकल आणि सिजनल फ्रुट्स खाण्यावर जोर देतात. ऋजुता दिवेकर या बॉलिवूडची इव्हरग्रीन अभिनेत्री करिना कपूरच्या डायटिशियन आहेत. ऋजुता या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून डाएटबाबत लोकांना सजग करतात.

ऋजुता दिवेकर यांनी पावसाळ्यात काय खावे काय खाऊ नये याबाबत अधिक माहिती दिली आहे.  भारतीय घरांमध्ये पावसाळ्याच्या ४ महिन्यात नॉनव्हेज पदार्थ खाणं टाळलं जातं. खासकरून श्रावणात  हे पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. रुजुता दिवेकर यांच्यामते आहारात असा बदल करणं योग्य ठरतं. 

पावसाळ्यात कांदा, लसूण का खाऊ नये?

जे लोक शाकाहारी आहेत त्यांनाही रुजूता यांनी खास सल्ला दिला आहे की, लसूण-कांदा अजिबात खाऊ नये. हे दोन्ही पदार्थ पावसाळ्यात खाणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं. 

पावसाळ्यात रताळे खाण्याचे फायदे

रताळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे पावसाळ्यात पोटाशी सबंधित आजार दूर राहतात. याशिवाय यात फायबर्स आयर्न, व्हिटामीन सी आणि व्हिटामीन ए मोठ्या प्रमाणात असते. या वातावरणात गाजर, मका, भोपळासुद्धा तुम्ही खाऊ शकता. हे शरीरासाठी पोषक ठरते. यात फायटोकेमिकल्स  आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. 

कांदा-लसूण खाणं का टाळलं जातं?

लसूण आणि कांदा तामसिक जेवणाच्या श्रेणीत आहे.  हे पदार्थ गरम मानले जातात. असं म्हटलं जातं की हे पदार्थ खाल्ल्याने ब्लड सर्क्युलेशन कमी जास्त होते. अशा स्थितीत राग, एक्साइटमेंट्, आळस जास्त येतो.  पावसाळ्यात पोटात गडबड झाल्यानं इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून पावसाळ्यात हे पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यश्रावण स्पेशलमोसमी पाऊस