Join us  

प्रत्येक पदार्थावर लिंबू पिळून खाता? फूड इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त; पोट बिघडेल - होईल त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2024 5:29 PM

Foods you should avoid pairing with lemon : 'या' ५ पदार्थांवर लिंबू पिळून खाणं पोटासाठी ठरू शकतं विषारी; तब्येत बिघडेल

गोल - पिवळे फळ जे प्रत्येक ऋतूमध्ये अनेकांच्या घरात असते, ते म्हणजे लिंबू (Health Tips). हे एक व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध असलेले चवदार आणि आरोग्यदायी फळ आहे (Lemon). लिंबाचा वापर सहसा पदार्थाची चव वाढवण्यासाठी होतो. आपण पदार्थात लिंबाचे रस मिसळतो, किंवा पदार्थावरून लिंबू पिळून खातो (Food Combination). पण प्रत्येक पदार्थावरून लिंबू पिळून खाणं योग्य आहे का? काही लोक प्रत्येक पदार्थात लिंबू पिळून खातात, पण याचे काही दुष्परिणाम आहेत का?

टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटनुसार, लिंबू आरोग्यासाठी फायदेशीर. पण काही पदार्थांसोबत खाणं टाळावे. कोणत्या पदार्थांवर लिंबू पिळून किंवा आधी आणि नंतर खाऊ नये हे पाहूयात(Foods you should avoid pairing with lemon).

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिड असते.  जे थेट दूध किंवा दुग्धजन्य पदार्थासोबत खाल्ल्यास दुधाचे दही होऊ शकते. ज्यामुळे पोटाचे विकार आपल्याला छळू शकतात. याशिवाय दुग्धजन्य पदार्थ खाण्याआधी किंवा खाल्ल्यानंतर लिंबाच्या रसाचा पदार्थात समावेश केल्यास अॅसिडीक रिअॅक्शन होते. ज्यामुळे छातीत जळजळ आणि अॅसिडिटी होऊ शकते.

पावसाळ्यात मुलं अंथरुण ओलं करतात? ५ टिप्स, डॉक्टर सांगतात त्रास कमी करायचा तर..

मसालेदार पदार्थ

लिंबू हे आम्लयुक्त असते. जे मसालेदार पदार्थांची उष्णता वाढवू शकते. त्यामुळे मसालेदार पदार्थांमध्ये लिंबाच्या रसाचा वापर शक्यतो टाळावा. ज्यामुळे पदार्थाची चवही बिघडू शकते.

गोड फळे

लिंबाच्या रसाची ही विशिष्ट आंबट चव असते. जी गोड फळांची चव बिघडवू शकते. काही लोक फळावर लिंबू पिळून खातात. पण फळं खाण्याची ही पद्धत चुकीची आहे. विशेषतः आंबा, स्ट्रॉबेरी आणि खरबूज या फळांवर लिंबाच्या रसाचा वापर करू नये. आपण त्याऐवजी मधाचा वापर करू शकता.

पावसाळ्यात ४ पदार्थ न चुकता खा, सुधारेल पचन आणि मेटाबॉलिजम वाढल्याने वजनही घटेल पटकन

टोमॅटो

टोमॅटोचा वापर अनेकदा सॅलॅडमध्येही होतो. सॅलॅडमध्ये अनेक जण लिंबाचा रस पिळतात. जे चुकीचे फूड कॉम्बिनेशन आहे. ज्याचा आपल्या पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. टोमॅटो आणि लिंबू या दोन्हीचे गुणधर्म पूर्णपणे वेगळे आहे. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने अपचन गॅस, अॅसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सहेल्थ टिप्स