मटार पनीर ही डिश उत्तर भारतीय जरी असली, तरी भारतात मात्र या रेसिपीला आवडीने खातात. ही रेसिपी मटार आणि पनीर पासून बनवली जाते. ही डिश आपण भात, पोळी, पराठा, नान, किंवा पुरी सोबत देखील सव्र्ह करू शकता.
बरेच लोकं ही डिश मेन कोर्समध्ये खातात. पार्टी असो या कार्यक्रम प्रत्येक सोहळ्यात ही डिश रंगत आणते. सध्या मटारचा सिझन आहे. या हिवाळ्यात आपण घरच्या घरी ढाबा स्टाईल मटार पनीरची रेसिपी करू शकता. चला तर मग या रेसिपीची कृती जाणून घेऊयात.
मटार पनीर रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
पनीर
१ कप मटर
पाणी
जिरे
हळद
लाल तिखट
गरम मसाला पावडर
मलाई
साखर
तेल किंवा तुप
कोथिंबीर
चविनुसार मीठ
मसाला बनवण्याकरिता लागणारी सामग्री
३ बारीक चिरलेले टोमॅटो
१ बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली हिरवी मिरची
आलं
लसूण
कोथिंबीर
काजु
काळी मिरी
लवंग
कोथींबीर
कृती
सर्वप्रथम, मसाला तयार करून घ्या, यासाठी मसाला बनवण्याकरिता लागणारी संपूर्ण सामग्री भाजून घ्या. यांनतर मिक्सरमधून सगळी सामग्री वाटून घ्या. पाणी आवश्कतेनुसार घाला. मिश्रणाची चांगली पेस्ट तयार करून घ्या.
दुसरीकडे एका कढईत तेल किंवा तुप गरम करा. त्यात अर्धा चमचा जिरे टाका. जिरे भाजल्यानंतर त्यात तयार केलेला मसाला टाका. मसाला चांगले तेलात मिक्स करा. यानंतर झाकण झाकून मिश्रणाला शिजवून घ्या. आता त्यात सगळे मसाले टाका. हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर, टाकल्यानंतर चांगले मिक्स करा.
मिक्स झाल्यानंतर त्यात मलाई टाका आणि पुन्हा मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात पाणी आणि मीठ टाका. झाकण झाकून मिश्रणाला एक वाफ द्या. वाफ दिल्यानंतर त्यात वाफवलेले मटार आणि पनीर टाका. झाकण झाकून पुन्हा एक वाफ द्या.
वाफ दिल्यानंतर त्यात थोडी साखर टाका. आपल्या आवडीनुसार साखर टाकू शकता. अशा प्रकारे मटार पनीर खाण्यासाठी रेडी.